12 व 13 एप्रिल 2023 रोजी वाशी येथील सिडको कन्वेन्शन सेंटर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

सिडको कन्वेन्शन सेंटर वाशी नवी मुंबई येथे बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा

       नवी मुंबई, दि. 10:- कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता  विभागीय आयुक्तालय, मुंबई विभाग व ब्रॅण्ड कनेक्ट नेटवर्क प्राइवेट लिमिटेड, नवी मुंबई याच्या संयुक्त विद्यमाने बुधवार व गुरुवार दिनांक 12 व 13 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10.00 ते 4.00 या वेळेत वाशी नवी मुबंई येथील सिडको कन्वेन्शन सेंटर, वाशी, नवी मुंबई येथे बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती  उप आयुक्त कोशल्य विकास रोजगार व उद्योजकता  यांनी दिली. 

          या रोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवाराच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार असून या मेळाव्यात उपस्थित राहणाऱ्या  10 वी पास/नापास, 12 वी. आय.टी.आय, पदवी, पदविका, पदवीधर, अभियात्रिकी विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या रोजगार मेळाव्याच्या दिवशी उपस्थित उदयोजकांच्या आवश्यक शैक्षणिक अर्हतेनुसार (मागणीनुसार) उमेदवारांची निवड केली जाईल.

          मेळाव्यात सहभाग घेण्यासाठी इच्छूक‍ उमेदवारांनी या विभागाच्या https://mahaswayam.gov.in  या वेबपोर्टलला भेट देऊन आपली  नोंदणी व अद्यावतीकरण करणे आवश्यक आहे.  स्वतः चा बायोडाटा आणि शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्रांसह मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहावे.  इच्छुक उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई विभाग कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता  विभागीय आयुक्तालयाचे उप आयुक्त  शा.गि.पवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

सीकेटी महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर वर्षाच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन