जात वैधता प्रमाणपत्रासाठी ठाणे जिल्हयातील इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना आवाहन

जात वैधता प्रमाणपत्रासाठी 15 डिसेंबरपूर्वी प्रस्ताव सादर करावेत

नवी मुंबई :- ठाणे जिल्हयातील इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरीता आवश्यक असणाऱ्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी दि.15 डिसेंबर,2022 पूर्वी संबंधित महाविद्यालयांच्या माध्यमांतून आवश्यक पुराव्यांसह प्रस्ताव सादर करावे अशी माहिती ठाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य वासुदेव पाटील यांनी दिली.

विज्ञान शाखेतील इयत्ता 11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच इतर व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी विविध महाविद्यालयांमध्ये आरक्षित जागांवर प्रवेश मिळविण्याकरीता जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. जात वैधता प्रमाणपत्राच्या अभावी विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, याकरीता सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील जात प्रमाणपत्रधारक मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयांच्या माध्यमातून www.bartievalidity.maharastra.gov.in या संकेतस्थळावर आवश्यक त्या परिपूर्ण पुराव्यांसह ऑनलाईन अर्ज करावे. तसेच महाविद्यालयांनी देखील इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव  दि.15 डिसेंबर, 2022 पूर्वी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,ठाणे, कोकण भवन, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई यांचे तळमजला, दालन क्र.9 व 10 येथील समिती कार्यालयाच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये सर्व मुळ दस्ताऐवजांसह व स्वाक्षांकित, छायांकित प्रतींसह प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन ठाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा वैदेही रानडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन