‘स्वच्छ सर्वेक्षण' अंतर्गत लघुपट, जिंगल, भित्तीचित्र, पथनाट्य, चित्रकला स्पर्धांचे आयोजन

नवी मुंबई ः ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२२'मध्ये देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान मिळविण्यात नवी मुंबईकर नागरिक यांच्या सक्रिय सहभागाचा तसेच सफाई कामगारांच्या नियमित कामाचा महत्वाचा वाटा असल्याचे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी वेळोवेळी जाहीर केले आहे. त्याअनुषंगाने ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'ला सामोरे जाताना व्यापक लोकसहभागावर विशेष भर दिला जात आहे.

याकरिता स्वच्छताविषयीच्या नागरिकांच्या मनात असलेल्या विविध संकल्पनांना मुक्त व्यासपीठ मिळावे आणि या माध्यमातून स्वच्छतेचा प्रचार-प्रसार व्हावा यादृष्टीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लघुपट, जिंगल, भित्तीचित्र, पथनाट्य आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रत्येक स्पर्धेकरिता आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून स्पर्धांविषयीच्या अधिक माहितीसाठी नवी मुंबई महापालिकेच्या फेसबुक, टि्‌वटर आणिइंन्टाग्रामच्या ॅहस्स्म्दहत्ग्हा या अधिकृत सोशल मिडीया पेजला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

चित्रकला स्पर्धेकरिता माझे शहर-माझा सहभाग, प्लास्टिकमुक्त नवी मुंबई आणि थ्री आर (Rा्‌ल्म, Rाल्ेा, Rाम्ब्म्त) असे ३ विषय जाहिर करण्यात आलेले आहेत. २४ नोव्हेंबर २०२२ रोजी कोपरखैरणे, सेक्टर-१४ येथील निसर्गौद्यानामध्ये या स्पर्धा सकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आल्या आहेत. चित्र काढण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने कागद देण्यात येईल. चित्रांकरिता लागणारे रंग आणि साहित्य स्पर्धकाने स्वतः आणायचे आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट ३ स्पर्धकांना १० हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपये रक्कमेची पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. स्पर्धेतील सहभागासाठी ेप्दीूल्ीत्.ीू/ेल्न्न्भ्९ या लिंकचा वापर करावयाचा आहे.

भित्तीचित्र स्पर्धेकरिता माझे शहर-माझा सहभाग, प्लास्टिकमुक्त नवी मुंबई आणि थ्री आर (Rा्‌ल्म, Rाल्ेा, Rाम्ब्म्त) या ३ विषयांपैकी एका विषयावर २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता महापालिका मुख्यालय आवारातील निश्चित केलेल्या भिंतीवर अडीच तासाच्या अवधीत २ X २ आकारात भित्तीचित्र काढावयाचे असून सर्वोत्कृष्ट ३ स्पर्धकांना १० हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपये रक्कमेची पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. स्पर्धेतील सहभागासाठी ेप्दीूल्ीत्.ीू/ेल्न्न्भ्९ या लिंकचा वापर करावयाचा आहे.

पथनाट्य स्पर्धेकरिता ७ ते १० मिनिटांच्या कालावधीत माझे शहर-माझा सहभाग, प्लास्टिकमुक्त नवी मुंबई आणि थ्री आर  (Rा्‌ल्म, Rाल्ेा, Rाम्ब्म्त) या ३ विषयांपैकी एका विषयावर २५ आणि २६ नोव्हेंबर २०२२ रोजी पथनाट्य सादर करावयाचे आहे. पथनाट्य समुहात किमान ५ आणि जास्तीत जास्त ७ कलावंत असणे आवश्यक आहे. पथनाट्य सादरीकरणामध्ये कुठल्याही राजकीय, धार्मिक, हिंसक किंवा अपशब्दांचा वापर नसावा. दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर विहित वेळ मर्यादेतच सादरीकरण करावयाचे असून २४ नोव्हेंबर पर्यंत ेप्दीूल्ीत्.ीू/ेल्न्न्भ्९ या लिंकवर अर्ज भरावयाचा आहे. सर्वोत्कृष्ट ३ स्पर्धकांना १० हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपये रक्कमेची पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.

जिंगल स्पर्धेकरिता स्वच्छ-सुंदर नवी मुंबई या विषयावर आधारित १ ते ३ मिनिटे कालावधीची मराठी भाषेतील जिंगल श्झ्-३ फॉर्मेटमध्ये सादर करावयाची असून त्यामध्ये निश्चय केला-नंबर पहिला असे घोषवाक्य अंतर्भूत असणे गरजेचे आहे. सर्वोत्तम ३ जिंगल्सना अनुक्रमे १५ हजार, १० हजार, ७ हजार रुपये अशी पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. जिंगल स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी ेप्दीूल्ीत्.ीू/ेल्न्न्भ्९ या लिंकवर २४ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी करावयाची आहे.  

 लघुपटाच्या माध्यमातून स्वच्छ-सुंदर नवी मुंबईचे चित्र मांडले जावे आणि स्वच्छताविषयक जागरुकता निर्माण व्हावी याकरिता लघुपट स्पर्धा (एप्दीू इग्त्स् ण्दस्जूग्ूग्दह) आयोजित करण्यात आली असून यामध्ये सहभागाकरिता माझे शहर-माझा सहभाग, प्लास्टिकमुक्त नवी मुंबई, थ्री आर (Rा्‌ल्म, Rाल्ेा, Rाम्ब्म्त) या ३ पैकी एका विषयावर लघुपट निर्मिती करावयाची आहे. यामधील पहिल्या ३ क्रमांकाच्या लघुपटांना अनुक्रमे १५ हजार, १० हजार आणि ७ हजार रुापये रक्कमेची पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. लघुपटाचे छायाचित्रीकरण महापालिका क्षेत्रातच करणे बंधनकारक असून लघुपटाचा कालावधी नामावलीसह २ ते ५ मिनिटांचाच असणे बंधनकारक आहे. ेप्दीूल्ीत्.ीू/ेल्न्न्भ्९ या लिंकवर २४ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यंत लघुपट स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख आहे.

शहर स्वच्छतेत नवी मुंबईकर नागरिकांचा नेहमीच महत्वाचा सहभाग राहिला आहे. विशेषत्वाने युवक आणि विद्यार्थी यांच्यामार्फत नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'च्या अनुषंगाने नागरिकांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहित करावे, त्यामधून स्वच्छता जनजागृती कार्यामध्ये हातभार लागावा यादृष्टीने लघुपट, जिंगल, भित्तीचित्र, पथनाट्य आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे. यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी सदर उपक्रम नेहमीप्रमाणेच यशस्वी करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.
-राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

इच्छुक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ - मंत्री लोढा