महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये शौर्या अंबुरे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार
शौर्या अंबरे हिची राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड
ठाणे ः कौन्सील फोर इंडियन स्कुल सर्टीफिकेट (सी.आय.एस.सी.ई.) ची ९ वी झोनल ॲथलेटिक चॅम्पियनशीप स्पर्धा ६ आणि ८ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत मुंबई येथील प्रियदर्शनी पार्क येथे पार पडली. सदर स्पर्धेमध्ये मुंबई झोनमध्ये सहभागी ३५० हुन अधिक शाळांच्या २६०० विद्यार्थ्यांमधून ठाणे-ब्रम्हांड येथील युनिव्हर्सल हाय शाळेत इयत्ता ८ वीत शिकणाऱ्या शौर्या अंबुरे हिने (१४ वर्षांखालील मुली) ८० मीटर अडथळा शर्यतीत यापूर्वीचा १५.९८ सेकंद प्रति मीटर रेकॉर्ड मोडून १४.७ सेकंद असा नवा रेकॉर्ड करीत सुवर्णपदक मिळविले आहे. तसेच १०० मी धावणे स्पर्धेत रौप्य पदक मिळवले.
या झोनल स्पर्धेनंतर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये देखील शौर्या अंबुरे हिने महाराष्ट्रातील इतर शाळांमधील झोनल स्तरावर पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आपला ठसा कायम ठेवला. सदर स्पर्धेमध्ये सहभागी शौर्या अंबुरे हिने ८० मीटर अडथळा शर्यतीत यापूर्वीचा स्वतःचाच मीटरचा रेकॉर्ड (१४.७ सेकंद) मोडून नवीन रेेकॉर्ड (१४.१ सेकंद) प्रस्थापित केला. तसेच १०० मीटर धावणे स्पर्धेत रौप्यपदक मिळविले. शौर्या अंबुरे हिचे ॲथलेटिक्स प्रशिक्षण मागील ७ वर्षापासून प्रशिक्षक अजित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एम्स ॲकॅडमी-ठाणे येथे चालू आहे. सदर कामगिरीबद्दल शौर्या अंबुरे हिची आता येत्या ४ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत बालेवाडी-पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेमध्ये शौर्या अंबुरे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.