महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
यश प्राप्तीसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करा - प्रवीण तांबे
ऐरोली : ज्या गोष्टीची आवड आहे. त्यात आपले भविष्य उज्वल करण्याची महत्वकांक्षा ठेवा. त्या ध्येयाच्या मागे लागा. दिवसरात्र मेहनत करा. यश प्राप्तीसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली तरच तुमचे भविष्य उज्वल असेल असे मार्गदर्शन क्रिकेट खेळाडूंना आयपीएल मधील राजस्थान संघातील माजी खेळाडू प्रवीण तांबे यांनी ऐरोली येथे केले.
युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली आयोजित श्री स्वामी समर्थ सेवेकरी ग्रुप ऐरोली पुरस्कृत आई लताई पाटील व प्रदीप पाटील श्रद्धांजली चषक २०२२चे आयोजन ऐरोली सेक्टर १० येथील फोर्टी प्लस मैदानावर केले होते. त्यावेळी पारितोषिक वितरण करताना स्पिनर बॉलर प्रवीण तांबे बोलत होते. यावेळी १९ वर्षाखालील आतल्या महिला रणजी संघाचे प्रशिक्षक अजय कदम, सुरेश रानाजी, नवी मुंबई पोलीस राम पोळ, नरेंद्रजीत खल्ला, रणजित पिल्ले, सलवराज मनी, प्रकाश चव्हाण, अरुण राज भोज, आयोजक जितेंद्र पाटील, संजय पाटील, सुनील मढवी आदी उपस्थित होते.
रविवारी दिवसभर खेलवल्या गेलेल्या पावसाळी क्रिकेट स्पर्धा मध्ये ऐरोली, दिघा, मुलुंड परिसरातील आठ संघ सामील झाले होते. यामध्ये पहिला क्रमांकावर साई सागर युनायटेड ऐरोली संघाने मोहर उमटवली व पंचवीस हजाराचे प्रथम पारितोषिक प्राप्त केले. तर द्वितीय क्रमांकावर ट्रायडेंट स्पोर्ट्स यांनी पटकावून पंधरा हजाराचे बक्षीस पटकावले. या सामन्यांच्या मध्ये उत्कृष्ठ गोलंदाज सुरेश राणाजी, उत्कृष्ठ फलंदाज चिन्मय धवन तर मालिकावीर अजिंक्य लाडू यांना गौरविण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ जाधव, मंदार परब, गणेश जाधव आदींनी मेहनत घेतली.