एफ.जी. नाईक महाविद्यालयात महारक्तदान शिबिर संपन्न

नवी मुंबई : रा .फ.नाईक विद्यालय व एफ जी नाईक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व ऐरोली विधानसभा मतदार संघाचे प्रथम आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त  गणेश नाईक ब्लड डोनर चेन यांच्या माध्यमातून ४ ऑगस्ट 2022  रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.  सदर शिबिराचे उद्घाटन संजीव नाईक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. 

 ह्या कार्यक्रम प्रसंगी माजी शिक्षण सभापती नवी मुंबई महानगरपालिका इ.ए पाटील सर , शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  देविदास म्हात्रे, माजी नगरसेवक  केशव म्हात्रे (अंकल) ,  शंकर मोरे , लीलाधर नाईक,  रविकांत पाटील, माजी नगरसेविका  सौ. भारती ताई पाटील,  सौ. वैशाली नाईक म्हात्रे,  सौ. लताताई मढवी, इंदुमती तिकोने
समाजसेवक  संदीप म्हात्रे,  आत्माराम पाटील,  दाजी सणस,  शिरीष पाटील, शरद पाटील,   भालचंद्र मढवी,  रॉबिन मढवी, माजी शिक्षण समिती सभापती  रवी अय्यर,  टी. के. टी. नाईट कॉलेज प्रा. डॉक्टर प्रकाश सावंत समाजसेवक  विनायक नाईक, श्रमिक शिक्षण मंडळ सदस्य सदानंद म्हात्रे, नितीन म्हात्रे, एम.जी.एम हॉस्पिटल डॉक्टर सुभाष जाधव, रा.फ.नाईक विद्यालय मुख्याध्यापक सुधीर थळे,  रा.फ.नाईक उपमुख्याध्यापक नरेंद्र म्हात्रे, एफ जी नाईक महाविद्यालय प्राचार्य  प्रताप महाडिक , सर्व विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक व हितचिंतक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
 
आपल्या प्रास्ताविकपर भाषणामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक सर यांनी श्रमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय  संदीप नाईक  यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आजवर महाविद्यालयाने संपन्न केलेल्या विविध समाज उपयुक्त उपक्रम जसे की सातत्याने  घेत असलेले रक्तदान शिबिर , मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर, मोफत पॅन कार्ड व मोटर वाहन परवाना वाटप, नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मा वाटप, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती जनजागृती इत्यादी उपक्रमांची माहिती देत महाविद्यालयाची  कौतुकास्पद कामगिरी विशद केली. तसेच मागील पंधरा दिवसापासून राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी जे नवी मुंबईत विविध ठिकाणी आपल्या पथनाट्यद्वारे रक्तदाना संदर्भात जनजागृती करत होते त्याचंही त्यांनी आपल्या भाषणामध्ये कौतुक केले.

      सदर कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संजीव नाईक यांनी आपल्या भाषणातून श्रमिक शिक्षण मंडळ हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना विविध कार्यक्रमातून मार्गदर्शन व संधी देऊन त्यांना समाजामधील एक आदर्श नागरिक बनवते याबद्दल समाधान व्यक्त केले, तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा उल्लेख करत त्यांचे कौतुक केले, त्याचबरोबर येणाऱ्या कालखंडात समाजहिताचे व त्याला जोडणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी हिरीहिरीने सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
  
 या शिबिराच्या माध्यमातून नवी मुंबई शहरातील सदृढ व सुजान नागरिकांना तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रक्तदानाचे विनम्र आवाहन करण्यात आले. या आवाहनाला मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रक्तदाते नागरिक व विद्यार्थ्यांनी ३२५ रक्त पिशव्यांचे रक्तदान केले.

  सदर कार्यक्रमांतर्गत  संदीप नाईक  यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक मा केशव म्हात्रे यांनी महाविद्यालयातील ग्रंथालयाला  स्पर्धा परीक्षा अभ्यासाची पुस्तके भेट  दिली. श्रमिक शिक्षण मंडळाचे माजी सचिव स्वर्गीय सुरेश नाईक यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकं  वितरण करण्यात आली.

 सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महाविद्यालयातील जयश्री दहाट व संगीता वास्कर यांनी केले.
 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

प्रभात कोळीची उत्तुंग कामगिरी