शिष्यवृत्ती पासून हजारो विद्यार्थी वंचित


विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वितरीत करण्याची माजी नगरसेविका कोमल वास्कर यांची मागणी

नवी मुंबई ः यंदाच्या वर्षात नवी मुंबई महापालिका समाजविकास विभाग मार्फत देण्यात येणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्ती पासून अद्यापही हजारो विद्यार्थी प्रशासकीय गलथान कारभारामुळे वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणी व्यवतीशः लक्ष घालून शिष्यवृत्ती पासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने त्याच्या लाभाचे धनादेश वाटप होण्यासाठी कार्यवाही करा, अशी मागणी माजी नगरसेविका तथा शिवसेना शहर संघटक सौ. कोमल सोमनाथ वास्कर यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.


महापालिका समाजविकास विभाग मार्फत महापालिका हद्दीतील इयत्ता पहिली ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेचा हजारो विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे. परंतु, यावर्षी प्रशासकीय गलथान कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांना उशिरा शिष्यवृत्तीची रवकम प्राप्त झाली. तर अद्याप हजारो विद्यार्थी शैक्षणिक शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. कोरोना कालखंडात अनेक कुटुंब रस्त्यावर आली, बहुतांश पालकांचा रोजगार बुडाला. त्यामुळे साधारणतः ५० % पालकांनी आजही आपल्या पाल्यांची शैक्षणिक फी भरलेली नसल्याने अनेक खाजगी शाळांनी त्यांच्या पाल्यांचा निकाल राखून ठेवलेला आहे, असे सौ. कोमल वास्कर यांनी महापालिका आयुवतांना दिेलेल्या पत्रात नमूद केले आहे.
आजमितीस सानपाडा विभागासह नवी मुंबई मधील हजारो विद्यार्थी शैक्षणिक शिष्यवृत्ती पासून वंचित आहेत. विशेष म्हणजे यासंदर्भात समाजकल्याण विभागाकडून माहिती घेतली असता काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या अर्जासोबत तीन वर्षांऐवजी फवत दोन वर्षाची गुणपत्रिका जोडलेली आहे, प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांना ईबीसी सवलत मिळत असल्याने, अशी विविध कारणांमुळे सदर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांवर येनकेन प्रकारे अन्यायच आहे, अशी खंत देखील सौ. कोमल वास्कर यांनी सदर निवेदनातून व्यक्त केली आहे.


त्यामुळे आपण प्रशासक-आयुक्त म्हणून सदर प्रकरणाची माहिती घेऊन शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वाटप होण्यासाठी संबंधितांना आदेश देऊन विद्यार्थ्यांबद्दल न्यायिक भूमिका घ्यावी, अशी मागणी सौ. कोमल वास्कर यांनी महापालिका आयुक्ताकडे केली आहे. 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा वार्षिक योजना निधीतून लोणिवलीत अंगणवाडी