महापालिकेने विद्यार्थ्यांची शालेय साहित्य डीबीटीच्या रकमेत १०% नी वाढ

महापालिका विद्यार्थ्यांची शालेय साहित्य वस्तू खरेदीची रक्कम त्यांच्या खात्यात १०% नी वाढ करुन वर्ग करणार

नवी मुंबई  :  नवी मुंबई महानगर पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय वस्तू, गणवेशाचे डीबीटी धोरणाअंतर्गत खात्यात पैसे दिले जातात. पंरतु करोना कालावधीत गणेवश खरेदी झाली नाही. करोनाआधी ते आतापर्यंत गणवेश रक्कम जैसे थे वैसेच आहे. त्यात आता महागाई वाढली आहे, त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे गणेवश डीबीटी धोरणाअंतर्गत मनपाच्या वतीने गणवेश रक्कम १०% वाढविण्यात आलेली असून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि गणवेश घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्यावतीने उत्तम शिक्षण देण्याची विविध उपयोजना करण्यात येतात. डिजिटल शिक्षण, सीबीएसई बोर्ड यांसारख्या नवं नवीन योजना आणत आहे. मात्र करोना आधीच्या वर्षी विद्यार्थ्यांना दोन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना गणवेश खरेदीला विलंब झाला होता. शैक्षणिक वर्षाखेर त्यांना गणेवश देण्यात आले होते. त्यांनतर करोना सुरू झाला. त्यामुळे शाळा ऑनलाइन सुरू झाल्याने गणवेश खरेदी कमी झाली होती. आता पुन्हा जूनपासून शाळा झाल्या आहेत.  प्रत्यक्ष लाभार्थी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी आधी स्वःखर्चाने शालेय साहित्य खरेदी करून त्याचे वस्तू व सेवाकर सहित असलेले पावती शाळेत जमा करावयाचे आहेत. त्यांनतरच विद्यार्थ्यांना त्यांच्या वस्तू खरेदीची रक्कम  त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल अशी योजना लागू आहे. विद्यार्थ्यांना ८ प्रकारच्या शैक्षणिक शालेय वस्तूंची पूर्तता करण्यात येते.  शालेय गणवेश २, पिटी गणवेश १, स्काऊट गाईड गणवेश १,  शूज २ , वह्या, पाठ्यपुस्तके, दप्तर, रेनकोट यांचा समावेश आहे. यासाठी प्रति विद्यार्थ्यांला  ३ ते ४ हजार खर्च येत होता आता त्यामध्ये डीबीटी रक्कमेत आता  १०% वाढ  करण्यात आलेली आहे. अशी माहिती शिक्षण अधिकारी जयदीप पवार यांनी दिली आहे.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

जसखार काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व वह्या वाटप