स्थानिक भूमीपुत्रांच्या रोजगारासाठी मनसे आक्रमक 

उरण : महाराष्ट्र शासनाने स्थानिक बेरोजगारांना नोकरीं देण्यासाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली होती. मात्र या केंद्रातर्फे प्रत्येक आस्थापना मध्ये असलेल्या रिक्त पदांची माहिती देण्यात येत नव्हती. तसेच प्रभावी असे अंमलबजावणी या केंद्रमार्फत होत नव्हती. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक आस्थापना मध्ये असलेल्या रिक्त पदाची माहिती सर्वांना द्यावी तसेच सेवा योजन कार्यालये अधिनियम 1959 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनसेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागातर्फे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, कोकण भवन, सिबिडी बेलापूर, नवी मुंबई येथे उपायुक्त दिलीप पवार यांना याबाबत निवेदन देण्यात आले. या निवेदनद्वारे कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून आस्थापनाची तात्काळ नोंदणी करण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात यावी असा इशारा देण्यात आला. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर रिक्त पदाची सर्व माहिती देण्याचे, आस्थापनाची माहिती देण्याचे, व प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आश्वासन तसेच नोकर भरती करण्याचे आश्वासन मनसेच्या शिष्ट मंडळाला उपायुक्त दिलीप पवार यांनी दिले आहे.

यावेळी पक्षाचे प्रवक्ते संदीप देशपांडे, मनसे रोजगार स्वयंरोजगार विभाग अध्यक्ष महेंद्र बैसाणे, रायगड जिल्हा रोजगार अध्यक्ष नावडे विभाग तळोजा एम आय डी सी विभाग -रामदास पाटील,उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, चिटणीस केसरीनाथ पाटील, उपजिल्हा अतुल चव्हाण, उपजिल्हा दीपक कांबळी, महीला जिल्हाध्यक्ष अदीती सोनार, नाविक  सेनेचे अध्यक्ष संदेश ठाकूर,जिल्हा उपसंघटक रितेश पाटील, तालुका उपाध्यक्ष उरण मंगेश वाजेकर,पनवेल उरण तालुका अध्यक्ष अविनाश पडवल, उरण ता अध्यक्ष अभिजित कडु, शहर अध्यक्ष प्रसाद परब, शहर अध्यक्ष संजय मिरकुटे, शहर अध्यक्ष अमोल बोचरे, शहर अध्यक्ष रोहीत दुधवडकर,  तालुका अध्यक्ष राकेश भोईर,कामगार सेना संघटक-जयसिंग,व्यापारी सेना नितीन काळे, वाहतूक पनवेल सेना राहुल चव्हाण,सहकार सेना गिरीश तिवारी,सत्यवाण भगत,नवीन पनवेल शहर अध्यक्ष पराग बालाड,वर्षा पाचबाई-महीला पनवेल अध्यक्ष आदी मनसेचे पदाधिकारी मनसैनिक उपस्थित होते.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न