चित्रकलेच्या माध्यमातून निर्जीव भिंती बोलू लागल्या 

नवी मुंबई: एकविसाव्या शतकातले अत्याधुनिक व भारतातील स्वच्छतेचा प्रथम क्रमांकाचा मान पटवणारे शहर म्हणून नव्या मुंबईची ओळख आज जगभर एक सुंदर शहर म्हणून होत आहे. या शहराच्या वैभवात चित्रकलेच्या माध्यमातून सिंहाचा वाटा असणारे चित्रकार मात्र प्रसिद्धीमाध्यमा पासून दूरच आहेत त्यांची दखल घण्याचे काम ’दैनिक वाशिम संदेश’ ने घतली असून अशा कलाकारांचे कौतुक करून त्यांच्या कार्याची दखल घत त्यांची भेट घतली व त्यांच्या कार्याची प्रचिती बातमी द्वारे दिली आहे. 

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शासकीय-निमशासकीय इमारतींच्या सभोवतालच्या भिंती, शाळा, इस्पितळे, बस डेपो, रेल्वे स्टेशन लगतच्या भिंतींना चित्राच्या माध्यमातून रंगरंगोटी करून एकापेक्षा एक सरस ३्‌ चित्र, निसर्ग चित्र, कोरोना विषयी जनजागृती, प्रदूषण, स्वच्छतेचे संदेश अशा अनेक विषयांवरील चित्र जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून पदवीधर झालेले ख्यातनाम चित्रकार दिलीप काकनाटे यांच्या मार्गदर्शनात आ|पता जयस्वाल, अनिता गव्हाणे अक्षदा गायकवाड, दृष्टी ठक्कर, ओमकारा आनेराव, रोशल मॅथ्यू आदींसह सहकारी भिंतींवर रेखाटत आहेत. 

या माध्यमातून नवी मुंबईतील स्थानिक आगरी कोळी रहिवाशांचे सण, पारंपारिक वेशभूषा, भौगोलिक माहिती, खारफुटीची जंगले, खाडीकिनारी वास्तव करणारे जीवजंतू, पशुपक्षी, यांचे जिवंत दर्शन नवी मुंबईतील नागरिकांच्या दृष्टीस पडत आहे. अशा कलाकारांचा यथोचित मानसन्मान व गौरव नवी मुंबई महानगरपालिकेने करावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

नाट्य प्रेमींसाठी पनवेलमध्ये रंगणार ' रंगछटा 2022 '