महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बेलापूर शाखेतर्फे एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न

नवी मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बेलापूर शाखेच्या वतीने रविवार बेलापूर येथील पीपल्स एज्युकेशन डी.एड कॉलेजमध्ये कार्यकर्त्यांसाठी एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात वैज्ञानिक दृष्टीकोन, बुवाबाजी प्रात्यक्षिके आदी विषयावर व्याख्यान, प्रत्यक्षिक, केस स्टडीजच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे प्रबोधन करण्यात आले.   

शिबिराच्या पहिल्या सत्राच्या वैज्ञानिक दृष्टीकोन या विषयाला घेऊन अनिसचे डोंबिवली शाखेचे कार्यकर्ते श्रीप्रसाद खुळे यांनी व्याख्यान देताना वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या बाबत अनेक उदाहरणे देऊन कार्यकारणभाव लक्ष्यात घेतला पाहिजे असे मत मांडले. तर फलज्योतिष या विषयाला घेऊन रेखा देशपांडे यांनी कुंडली मधील ग्रह, नक्षत्रे यांची स्थिती दाखवून आकाशातील लाखो कि.मी अंतरावर असणाऱया निर्जीव ग्रहांना मानवी स्वभाव वैशिष्टÎे देऊन कशा प्रकारे सर्व सामान्य नागरिकांना फसवले जाते हे स्पष्ट करुन सांगितले.  

त्यानंतर दुपारच्या सत्रात बुवाबाजी प्रात्यक्षिक या याविषयाला घेऊन अनिसच्या जेष्ठ कार्यकर्त्या वंदना शिंदे यांनी चळवळीच्या गाण्याच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष चमत्काराच्या प्रात्यक्षिकेच्या माध्यमातून बुवाबाजी करणारे बुवा, बाबा कसे चमत्काराच्या सहाय्याने फसवणूक करतात हे सांगतिले. तसे त्यांनी चमत्काराचे प्रात्यक्षिक सादर केले. 

दरम्यान,  शेवटच्या सत्रात मन मनाचे आजार..देवी अंगात येणे, भुताने झपाटणे आदी विषयांवर रेखा देशपांडे यांनी वेगवेगळ्या केस स्टोरीच्या माध्यमातून हा विषय अतिशय प्रभावीपणे उलगडून मांडला. त्यानंतर उपस्थित शिबिरार्थींनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना श्रीप्रसाद खुळे, रेखा आणि माईंनी उत्तरे दिली आणि शंका दूर केल्या.  

सदर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा समारोप बेलापूर शाखेच्या उपाध्यक्षा त्रिशिला कांबळे यांनी केला. यानंतर हम होंगे कामयाब या प्रेरणादायी व आशादायी गाण्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शिबिराचे सूत्रसंचालन बेलापूर शाखेचे प्रधान सचिव विजय खरात यांनी केले. सदर शिबिराला मुंबई, नवी मुंबई, पनवेल विभागातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिबिराच्या सुरुवातीला बेलापूर शाखेचे अध्यक्ष बी. बी.पवार यांनी बेलापूर शाखेच्या कार्याची माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र अनिसचे संस्थापक व दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रा. एन.डी.पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

लांब अंतराच्या एनएमएमटी बसेसमध्ये आता चालते-फिरते ग्रंथालय (#BooksInBus)