उरण तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी आँनलाईन वकृत्व स्पर्धेचे आयोजन

 जेएनपीटी : उरण तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांतील लहान गट १ ली ते ५ वी व मोठा गट ६ वी ते ८ वी च्या  विद्यार्थ्यांसाठी तसेच खुला गट  शिक्षकांसाठी हिन्दुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेने तर्फे ऑनलाईन वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .

  सदर स्पर्धेकाने दिलेल्या विषयावर व वेळेवर आपल्या भाषणाचा व्हिडिओ शाळेच्या गणवेशात व व्हिडिओ खाली स्वतःचे नाव ,इयत्ता ,व शाळेचे नाव टाकून लहान गटाने  रमणिक म्हात्रे सर मो ९८७०९४८८४१  या नंबरवर  व मोठा गट तसेच खुला गट बबन पाटील सर मो.९००४६२७८५६ या नंबरवर व्हिडिओ दिनांक २२ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत पाठवावा .या स्पर्धेत लहान गटास व मोठ्या गटास   प्रथम क्रमांकास रोख बक्षिस ५०० रु व सन्मान चिन्ह , द्वितीय क्रमांकास रोख बक्षिस ३०० व  सन्मानचिन्ह , तृतीय क्रमांकास रोख बक्षिस २०० रू  सन्मानचिन्ह व उत्तेजनार्थ सन्मानचिन्ह देण्यात येईल तसेच   खुल्या गटास प्रथम , द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांकास सन्मानचिन्ह बक्षिस सोमवार दिनांक २४ जानेवारी २०२२ ला होणाऱ्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते देण्यात येईल . 

  सदर स्पर्धेचे विषय लहान गट  १) छ्त्रपती शिवाजी महाराज , वेळ ३ मिनीटे ,मोठा गट १) राष्ट्रमाता जिजाऊ ,वेळ  ४ मिनीटे ;खुला गट १) हिन्दु हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे, वेळ ५  मिनीटे ; तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेश मोकाशी,संपर्क प्रमुख निर्भय म्हात्रे , सरचिटणीस बबन पाटील, उपाध्यक्ष तथा उरण शिक्षक पतपेढी संचालक रमणिक म्हात्रे, तालुका अध्यक्ष बळीराम पाटील , रायगड जिल्हा महिला संघटक सौ.संपदा चव्हाण,  कोषाध्यक्ष के.आर. म्हात्रे , सल्लागार हि.सो. म्हात्रे ,बी.जे.म्हात्रे, अनिल म्हात्रे जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी यांच्या कडून करण्यात आले आहे.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा