लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विरंगुळा केंद्राचे उद्घाटन

पनवेल : शहरातील हुतात्मा स्मारक उद्यानात दर्शना भगवान भोईर यांच्या नगरसेविका निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राचे उद्घाटन रविवारी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक - नगरसेविका नागरिकांना सातत्याने विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहेत. त्यालाच अनुसरून प्रभाग क्रमांक 19 मधील नगरसेविका दर्शना भोईर यांनी आपल्या नगरसेविका निधीतून ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र उभारून दिले आहे. या विरंगुळा केंद्राच्या उद्घाटन समारंभास सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका रूचिता लोंढे, तसेच मधुकर उरणकर, गोपीनाथ लोखंडे, चंद्रकांत मंजुळे, राजू कोळी, हरिश्चंद्र भगत, अंजली इनामदार, अस्मिता गोसावी, कविता पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. पनवेल महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका दर्शना भोईर या एक क्रियाशील लोकप्रतिनिधी असून, प्रभागातील नागरिकांच्या समस्या मार्गी लागाव्यात, तसेच त्यांना विविध सेवा-सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी तत्पर असतात. त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवे शैक्षणिक धोरण संधीची समानता आणि समान दर्जा नाकारणारे - डॉ डोंगरगावकर