खारघर येथे मोठ्या प्रमाणावर कांदळवनांची कत्तल

नवी मुंबई ः खारघर येथे किमान २ कि.मी. खाडी पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर कांदळवनांचा नाश करुन जमीन घशात बळकाण्याचे सत्र सुरु असून त्यासंबंधीची तक्रार पर्यावरणवाद्यांनी मुख्यमंत्री तसेच उच्च न्यायालय नियुक्त कांदळवन समितीकडे केली आहे. दरम्यान,  खारघर क्षेत्रात कांदळवनांचा नाश आणि भराव होत असल्याची तक्रार हरितप्रेमींकडून आल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देखील तातडीने दखल घतली असून त्यांनी वन सचिवांना बी. वेणूगोपाल रेड्डी यांना सदर प्रकाराकडे  लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. खारघर येथे किमान २ कि.मी. खाडी पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर कांदळवनांचा नाश करण्याच्या प्रयत्नातून कांदळवनांच्या क्षेत्रात जो भराव टाकण्यात आला, तो एकसमान करण्यात आलेला आहे. काही ठिकाणी कोळंबीची अनधिकृत पैदास करण्यात येत असून त्यावर कोणताही अंकुश नाही. सदर प्रकार बेकायदेशीर असून भरतीच्या प्रवाह मार्गात कोणीही हस्तक्षेप करु शकत नाही, असे तक्रारीत नमूद करण्यात आल्याचे ‘नाटकनेक्ट फाऊंडेशन’चे संचालक बी. एन. कुमार आणि ‘श्री एकविरा आई प्रतिष्ठान’चे नंदकुमार पवार यांनी सांगितले.

सदर क्षेत्र सिडको अंतर्गत येत असून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कांदळवनांचे जतन करण्याकरिता ते वन विभागाकडे हस्तांतरीत करण्यात दिंरगाई होत आहे. दुसरीकडे कांदळवने लवकरात लवकर वन विभागाकडे हस्तांतरीत करण्यात यावेत, असे निर्देश राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. पण, संदर्भात एका दिवसाची दिंरगाई झाल्यास कांदळवनांचे कधीही भरुन न काढता येणारे नुकसान होणार आहे, अशी भिती बी. एन. कुमार यांनी व्यक्त केली आहे.

अशाप्रकारे जर कांदळवनांचा होणारा ऱ्हास वेळीच थांबवला नाही तर त्याचा विपरीत परिणाम खारघर, कळंबोली, कामोठे सारख्या नोडवर दिसेल. त्याचवेळी शहरी विकासामुळे प्रभावित झालेल्या मच्छीमार समुदायाची गणना करुन त्यांच्यावर होणाऱ्या अतिक्रमणाला मूक संमती दर्शवण्यापेक्षा त्यांचे सन्मानपूर्वक पुनर्वसन करण्याची विनंती आम्ही केली आहे, असे बी. एन. कुमार म्हणाले.

खारघर मधील कांदळवनावर जेसीबी यंत्राच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर भराव टाकून जमिनी सपाट करण्याचे काम चालले आहे. याचा परिणाम या क्षेत्रातील जैवविविधतेवर होणार आहे. तरंग सरीन यांच्यासारख्या संशोधकांनी पक्षी आणि फुलपाखरांच्या अनेक प्रजाती, त्याशिवाय कोल्ह्याची गोल्डन जॅकल प्रजाती या भागात पाहिली आहे, अशी माहिती खारघर मधील कार्यकत्र्या ज्योती नाडकर्णी यांनी दिली.

तर आमच्यासारखे सजग नागरिक अनेकदा विविध प्रशासकीय प्राधिकरणांकडे तक्रारी नाेंदवून थकून गेले आहेत. खारघर नोड जणू काही अधिकाऱ्यांसाठी अस्तित्वात नाही. पर्यावरणाच्या हानीकरिता अधिकाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे, असे खारघरमधील नरेश चंद्रा म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडून झटपट निर्देश...
खारघर क्षेत्रात कांदळवनांचा नाश आणि भराव होत असल्याची तक्रार हरितप्रेमींकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्याचे वन सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांना तातडीने याप्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. त्याची माहिती आम्हाला अवघ्या बारा तासात मुख्यमंत्री कार्यालयाने दिली असल्याचे ‘नाटकनेक्ट फाऊंडेशन’चे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ’भूमिपुत्र परिषद’ मध्ये पुन्हा एकदा जाहीर करण्यात आला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, यासाठी दिबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून १३ जानेवारीला रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर या जिल्ह्यातील समस्त भूमिपुत्रांची ’भूमिपुत्र परिषद’ तर २४ जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर पोलीस प्रशासनाने कृती समितीला चर्चेला बोलावले होते. कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव पाहता हे परिषद व आंदोलन रद्द करावी, अशी सूचना व आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली,  त्याचबरोबर  पोलिसांनी या प्रश्नासंबंधी सिडको व्यवस्थापकीय सचांलकाबरोबर २० जानेवारी पूर्वी बैठक घण्याचे आश्वासित केले आहे. त्यामुळे आजची भूमिपुत्र परिषद मर्यादित स्वरूपात करण्याचे कृती समितीने जाहीर केले होते, त्या नुसार आजची भूमिपुत्र परिषद दिलेल्या शब्दांप्रमाणे कोरोनाचे नियम पळून झाली. मात्र सिडको व्यवस्थापकीय सचांलकाबरोबर भूमिपुत्रांच्याबाबतीत प्रश्न मार्गी न लागल्यास २४ जानेवारी रोजी काम बंद आंदोलन करण्याचा गर्भित इशारा देण्यात आला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

हर घर दस्तक' आणि 'लसीकरण आपल्या दारी' मोहीमेअंतर्गत 55 हजाराहून अधिक नागरिकांचे लसीकरण