ठाण्यात रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत दुसरे पुष्प देवदत्त पट्टनायक गुंफणार

ठाणे : ठाण्यात नौपाडा येथील सरस्वती सेकंडरी स्कुलच्या हॉल मध्ये रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत  भारतीय पुराणकथांचे विवेचन करणारे प्रसिद्ध लेखक, व्यक्ते  देवदत्त पट्टनायक हे कृष्ण ब्रह्मांड रूप या विषयावर रविवार ९ जानेवारी रोजी रात्री ८.१५ वा व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफणार असल्याची माहिती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर यांनी दिली आहे.

कोविडबाबत शासकीय आचारसंहिता सध्या चालू राहिल्यामुळे हा बदल यंदा अनिवार्य झाला. दो गजकी दूरीमास्क है जरुरी ही परिस्थिती कायम असल्यामुळे आपण यंदा ८ ते १४ जानेवारी २०२२ या काळात रोज रात्री ८.१५ वा  virtually भेटुयात. लिंक.....

Facebook : https://www.facebook.com/rambhaumhalgivyakhyanmala तसेच Youtube channel Link https://www.youtube.com/channel/UCPTF5TXBx3FVgFXwJXtGoZw या लिंकवर क्लिक करून व्याख्यानमाला पाहता येईल. अधिक माहितीसाठी शरद पुरोहित -9322210424 किंवा सुहास जावडेकर यांच्याशी 9820528355 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन समितीने केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोव्हीडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोसायट्यांकरिता सुधारित नियमावली जाहीर