स्वःपक्षीयांकडून विकास कामात खो घालण्याचे प्रयत्न - आमदार मंदाताई म्हात्रे

नवी मुंबई ः मतदारसंघात नागरी विकास कामे करताना, स्वःपक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून खोडा घालण्याचे काम केले जात असल्याचा गंभीर आरोप आमदार सौ. मंदाताई म्हात्र यांनी केला आहे. तसेच आपण नागरिकांच्या प्रश्नासाठी कोणत्याही पक्षाच्या नेत्यांची भेट घऊन सदरचा प्रश्न सोडवण्यासाठी विनंती संबंधितांना करु असे सांगत त्यांंनी अप्रत्यक्षपणे बंडाचे निशाण फडकविले आहे.

आ. सौ. मंदाताई म्हात्र यांनी १ कोटी रुपयांचा स्थानिक आमदार विकास निधीतून वाशी येथील सिडको एक्झिबिशन कोव्हीड सेंटर येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचे उद्‌घाटन आ. सौ. मंदाताई म्हात्र यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सद्यस्थितीत कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी नवी मुंबईत सुसज्ज असे वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि नर्सिग कॉलेज उभारणीची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घऊन, महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्याच्या मागणीची पूर्तता करण्याची त्यांना विनंती केली होती. या मागणीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यांनी सिडकोला महाविद्यालय आणि रुग्णालयसाठी भूखंड महापालिकेला देण्यास सांगितले आहे, असे आ. सौ. मंदाताई म्हात्र म्हणाल्या.

राज्य सरकारच्या आदेशानुसार ‘सिडको’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय मुखर्जीं यांनी बेलापूर किल्ल्याशेजारी असलेला भूखंड महापालिकेकडे हस्तांतरण करण्याची तयारी केली आहे. तसेच महापालिका आयुक्त अभिजीत बांगर सदर भूखंड हस्तांतरीत करुन घण्यासंदर्भात सकारात्मक असताना ‘भाजपा’च्याच ऐरोलीतील आमदारांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात ‘सिडको’ने भूखंडावर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची इमारत बांधून देण्याची मागणी करीत आपण करीत असलेल्या प्रयत्नांमध्ये खो घालण्याचा प्रकार केला आहे, असा आरोप देखील आमदार सौ. मंदाताई म्हात्र यांनी यावेळी केला.

दरम्यान, सुसज्ज शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालय उभारण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घऊन आ. सौ. मंदाताई म्हात्र यांनी स्वःपक्षाला बंडाचा इशारा दिला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईत 10 जानेवारीपासून कोरोना योध्दे, सहव्याधीग्रस्त 60 वर्षावरील नागरिक यांना प्रिकॉशन डोस