मालमत्तांवर बँकांकडुन जप्तीच्या कारवाईस तातपुरती स्थगिती द्यावी - मनसे कामगार सेना

नवी मुंबई -: मागील दीड वर्षांपासून राज्यात कोविडची महामारी सुरू असल्याने अनेक जणांचे व्यवसाय व रोजगार हिरावले आहेत. त्यामुळे अशा नागरीकांना आपल्या मालमत्तांचे सुरळीत कर्ज फेडता आले नाही. मात्र अशा मालमत्तांवर बँकांकडुन जप्ती सुरू केली आहे. त्यामुळे सदर मलमत्तांच्या जप्तीच्या कारवाईस तातपुरती स्थगिती द्यावी अशी मागणी मनसे कामगार सेनेतर्फे ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

   मार्च २०२० मध्ये आलेली कोरोना महामारी आणी आता सुरू असलेल्या ओमायक्रोन ( कोविड) या आजाराने रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस  वाढ होत आहे . आधीच अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम गेल्या दोन वर्षांपासून झालेले असून , त्यात ओमायक्रोन च्या प्रादुर्भावाने  अजून वाढ झाली आहे. त्यामुळे नागरीकांचा रोजगार पुरता बुडाला आहे आणि अशा परिस्थितीत सर्व सामान्य नागरिकांना कर्जाचे हप्ते भरताना मोठी अडचण येत आहे.मात्र या कर्जदारांच्या मालमत्ता सध्या बँकांकडून जप्त केक्या जात आहेत.अशा परिस्थितीत लोकांना त्यांच्या दुकानातून किंवा घरातून, मालमत्तेची  जप्ती करून बाहेर काढणे माणुसकीच्या तसेच सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. तसेच ह्यापैकी घरात राहणाऱ्या लोकांना जप्ती करिता  बाहेर काढल्यास सदर लोकांना  ओमीक्रोन (कोविड) ची लागण होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. त्यामुळे आधीप्रमाणे मा. कोर्टाकडील आदेशाप्रमाण माजिल्हाधिकारी यांनी  प्रकरणाची दखल घेऊन त्यावर योग्य तो निर्णय पारित करावा. माणुसकीच्या तसेच लोकांचे आरोग्य जपण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या जप्तीच्या कारवाया ह्या ओमीक्रोन (कोविड) चा प्रादुर्भाव कमी होई पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात याव्यात अशी मागणी मनसे कामगार सेनेतर्फे ठाण्याचे  जिल्हाधीकारी राजेश नार्वेकर यांच्या कडे निवेदन देऊन केली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे , महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे विभाग अध्यक्ष अरुण पवार   व विनायक जाधव ,आशिष मोरे,संकेत निवडुंगे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोव्हीड सेंटर्स पुन्हा कार्यान्वित करण्याचे आयुक्तांचे निर्देश