साडी साडी रे

साडी खरेदीची संख्या कमी झाली आहे. पण साड्यांचे महत्त्व मात्र कमी झालं नाही. मित्राने भरपूर बक्षीस दिले तरी तो खास विशेष इंटरेस्ट मैत्रिणीमध्ये ठेवतो हे दाखवण्यासाठी बहुतांशी तो तिला साडी भेट घेतो. साडी घालून महीला छान दिसते .साडीवर प्रेम करा.

बायका म्हणे केवळ नवरात्रीतच नवरंगाच्या साड्या नटण्यासाठी घालतात. बाकी त्या साडीची उपयुक्तता काही उरली नाही. अशी चर्चा मी महिलांच्या, रेल्वे गाडीतील, लोकल डब्यातल्या बायकांमध्ये ऐकली. वर्तमानपत्रात एकदम जोरात बातमी गाजत होती. ती अशीः एका बाईला साडी नेसून आल्यामुळे हॉटेलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला!
त्यावरून माझ्या मनात आलं की साडी ही आता इतकी कालबाह्य झाली आहे? माझी एक तशी काकू बाईच असलेली मैत्रीण मला एकदा म्हणाली होती...

"कशा काय बायका साड्या नेसतात मला नवलच वाटते! आणि तूसुद्धा त्यातलीच, आधुनिक हो.”

 ड्रेस भोंगळ का होईना घातला, तरी ती व्यक्ती मॉडर्न ठरते. पण साडी घातलेली व्यक्ती मात्र अडाणी गावठी ठरते. बावरी काकू अशा शब्दात हेटाळणी करून अपमानित केली जाते. साधारणपणे तीस वर्षापूर्वी सणा समारंभाला तरी निदान साड्या घातल्या जायच्या .आता तर सणा समारंभांना सुद्धा साड्या घालून जाणे जवळ जवळ कमी झालेले आहे.

मी मध्यंतरी एकदा केळीवाल्याकडे फळ विकत घ्यायला गेले.  पैसे दिले आणि पिशवी तिकडेच विसरून आले. परत जायचा कंटाळा केला. मात्र वॉचमन माझ्या दारात ती केळीची पिशवी घेऊन आला आणि म्हणाला..

"मॅडम तुम्ही विसरलात.”
"पण त्या ठेलेवाल्याला माझं घर कसं काय माहिती?” -मी
"तो म्हणाला साडी घालणाऱ्या बाईंना द्या.”

 म्हणजे साडी घालणारी बाई ईतकी एकमेव रेअर की तेवढ्या एका माहितीवर बरोबर ती वस्तू माझ्या दारात आली. एका मालिकेमध्ये  एक घरगुती बाई एकदम बिझनेस करायला लागल्यावर शोभत नसतानाही पॅन्ट शर्ट घालून वावरताना दाखवली होती. का? एक्झिक्यूटिव्ह चांगल्या पोस्टवरच्या पी आर ओ, ग्रेसफुल बायका साड्या घालत नाहीत ? केवळ शर्ट पॅन्ट घातली म्हणजे काय साडीवाली पेक्षा अधिक काही ग्रेट केलं असं काही असतं का? सोयीच्या दृष्टीने साडीपेक्षा अन्य ड्रेस उपयोगी पडतात. कारण फ्रोजन शोल्डर असलं की खांदा वर उचलता येत नाही आणि ब्लाऊज घालायला खांद्यावर पदर पिनअप करायला त्रास होतो त्या मनाने ड्रेसेस डोक्यातून चढवले की झालं.

पण साडी नेसण्याचे खूप फायदे पण असतात. साडीला साईज नसते. त्यामुळे कुणाचीही साडी कोणीही घालू शकते. फॅशनच्या नावाखाली आपल्या घरात असलेला कोणत्याही रंगाचा ब्लाऊज घालून ती साडी वापरली तरी चालते. अडीअडचणीला ड्रेस वर पांघरायला, देह झाकायला, थंडी वाऱ्यात किंवा अन्य काही इमर्जन्सी आल्यास ओढायला काहीच नसतं. साडीचा पदर अंगभर गुंडाळून घेता येतो.

‘नारी जीवन की है कहानी आचल मे है दूध आखो मे है पानी” हे वाक्य  प्रसिद्ध आहे. म्हणजे मध्यंतरीच्या काळात स्त्रिया ह्या साडी घालणार आणि पदराने लहान मुलांची तोंड पुसणार, आपली अब्रू झाकणार आणि घाम पुसत येणार अशी एक इमेज होती.

मध्यंतरी एका नटीने असं म्हटलं की साडीवर घातले जाणारे ब्लाऊज हे एक अतिशय चीप शरीर प्रदर्शन करणारा प्रकार आहे. पण लांब ब्लाऊज घालता येतो. साडी अशीच नेसायला हवी, झंपर तोकड हवं असं काही नसतं. हल्ली तर टी शर्टवर साडी घालतात. जुन्या साडीच्या गोधड्या आणि दुपटीसुद्धा बनवली जातात. ओढणी करतात. जरा घट्ट पोताची साडी असेल तर ड्रेस शिवतात.

वस्त्रात साडी हे पारंपरिक आणि अतिशय खानदानी वस्त्र आहे. हे शुभशकुन पूजा यासाठी चांगल्या कार्यासाठी मुहूर्तमेढ इ साठी वापरतात. ओटी शक्यतो साडीत घ्ोतली जाते. एका मॉल मध्ये मी साडी खरेदी करायला गेलेली असताना तो विक्रेता मला मला म्हणाला...

"मॅडम एक लक्षात ठेवा, साडी बदलून ड्रेस मिळणार नाही. साडी बदलून साडीच मिळेल. लग्नात आहेर,अन्य घेतलेल्या साड्या बदलायला म्हणे लोक परत जातात (साडीच्या दुकानात ) आणि म्हणतात याच्याबद्दल ड्रेस द्या !”

सोयी सुविधा, सुटसुटीतपणा या दृष्टीने ड्रेस घालणं, पंजाबी ड्रेस हे ठीक आहे. बरे असेल पण! पण म्हणून काय साडीचा तिरस्कार कसा करावा? असं मला तरी वाटत नाही. पूर्वीच्याकाळी तर बायकांचा वॉर्ड रोब साड्यांनी भरलेला असायचा. एका पांढऱ्या कापडाला चिंधी म्हटले जायचे आणि त्याचे मध्ये भारी भारी ठेवणीतल्या साड्या बायका, गठुडे बांधून ठेवायच्या.

साडी घालणे आणि वेळप्रसंगी ते बघण्यात पण त्यांना आनंद वाटायचा. नंतर काही काळाने या विकत घेतलेल्या साड्यांची रवानगी कपाटात हंँगरवर झाली. आता हळूहळू ड्रेसेसचे दिवस आल्यामुळे साड्यांची कपाट कमी झाली आहेत. तोहफा सिनेमा बायका फक्त साड्या बघायला वारंवार बघत. त्या साडी खरेदीची संख्या कमी झाली आहे. पण साड्यांचे महत्त्व मात्र कमी झालं नाही असं मला वाटतं. मित्राने भरपूर बक्षीस दिली तरी तो खास विशेष इंटरेस्ट मैत्रिणीमध्ये ठेवतो हे दाखवण्यासाठी बहुतांशी तो तिला साडी भेट घेतो. साडी घालून महीला छान दिसते.

साडीवर प्रेम करा. स्त्री बाबतचे साडीचे महत्व आणि साडी प्रेम कधी कमी होईल असे देखील नाही. -  शुभांगी पासेबंद 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

स्वस्थ नारी, सशक्त परिवार : महिलांचे आरोग्य, राष्ट्राची प्रगती