रोग पसरवरणारे कबुतरखाने बंदच करा

परदेशांप्रमाणे भारतात कबुतरांच्या नसबंदीचीसुद्धा कोणतही सोय नाही, त्यामुळे कोणत्याही देशांतील कबुतरखान्यांचे उदाहरण कोणी देऊ नये. कारण असे देश कबुतरांना नसबंदीचे औषध देऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवत असतात. त्याचप्रमाणे तेथे प्रचंड प्रमाणात स्वच्छाता राखली जाते. लोक त्यांना दाणे न देता फक्त सरकारी यंत्रणाच त्यांना खाद्य पुरवत असते. जे आपल्याकडे होत नाही. म्हणूनच असे कबुतरखाने बंद व्हायलाच हवेत.

  दादरमधील भरवस्तीत आणि रस्त्याच्या मध्येच वाहतुकीला अडथळा असलेला कबुतरखाना बंद करण्याचा विषय बराच तापत चालला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने दादरच्या कबुतरखान्यावर कारवाई करून हा कबुतरखाना बंद केला. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना धान्य खायला घालण्यासही मनाई केली आहे. कबुतरांचा वावर परिसरात असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. तसेच कबुतरांना दाणे, खाद्य देणाऱ्या लोकांविरुद्ध थेट एफआयआर दाखल करण्याचे मुंबई महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत.

 कबुतरखान्याविरोधातील या कारवाईला काही नागरिकांनी विरोध केला. जैन समाज यावर नाराज होऊन त्यातल्या काही लोकांनी दादर कबूतरखान्यावर प्लास्टिक वेष्टन आणि जाळी टाकण्याला विरोध केला. रात्री महापालिका अधिकाऱ्यांना पाहून नागरिकांनी सकल रस्त्यावर उतरत विरोध केला. बांबू आणि वेष्टण हटवण्याचा प्रयत्न केला गेला. खरंच जैन समाज न्यायालयापेक्षा श्रेष्ठ आहे का, असा प्रश्न येथे पडतो.   

  शांतीचा संदेश  देणाऱ्या जैन धर्माचे नागरिक एवढे आक्रमक का झाले आहेत? एकत्र येऊन कबूतरखान्यावर लावलेली ताडपत्री देखील त्यांनी कशी काढून टाकली? तेव्हा इतरत्र लाठीमार करणाऱ्या पोलिसांनी कार्यवाही न करता त्यांना दाणे टाकायलाही विरोध कासा काय केला नाही. जैन धर्मातील नागरिकांना शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी नाही का? त्यांच्यावर शासकीय कामात अडथळे आणण्याचा, न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करण्याचा गुन्हा महाराष्ट्र शासनाने अद्यापही दाखल का केला नाही?

 मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी मीरा-भाईंदर येथे मोर्चा काढण्यास परवानगी नाकारणाऱ्या महाराष्ट्र सरकारने, यांच्यापुढे हार का मानली आहे? त्यांच्यावर कारवाई का  केली जात नाही? महाराष्ट्र सरकार मराठी माणसांचे आहे ? की परप्रांतीयांचे आहे ? महाराष्ट्र शासनाच्या अशा भूमिकेमुळे असे प्रश्न मराठी माणसे आणि महाराष्ट्रातील जनता आता विचारात आहे.

     अनेक मुंबईकर बुधवारी ६ ऑगस्ट रोजी रस्त्यावर उतरले. काहींच्या मते कबुतरांना अन्न देणे ही धार्मिक भावना आहे. तर काहींनी हा न्यायालयाचा आणि प्रशासनाचा हा निर्णय अमानवी असल्याचा आरोप केला. मुळात कबूतर हा विष्कीर प्राण्यांपैकी आहे की जो जमीन उकरून त्याच्यामध्ये मिळणारे जे काही कीटक असतील किंवा तेथून निघणारे काही घटक असतील ते खाऊन त्यावर आपला उदरनिर्वाह करणारा पक्षी आहे. पण इथे असलेल्या काही धर्मांध लोकांनी कबुतराला खायला घातलं की आपली सगळी संकटे दूर होतात आणि आर्थिक संकट दूर होतात या पद्धतीचे थोतांड डोक्यात घेतल्यामुळे ते कबुतरांना ज्वारी, बाजरी, मका यासारखे धान्य खायला घालतात. ते कबुतरांना स्वतः शोधावं लागत नाही. लोकं जाऊन रोज एक किलोपासून, ते दहा किलोपर्यंत धान्य त्यांना खायला घालतात  की जो त्याचा मूळ आहार नाही. तो आहार त्यांनी खाल्ल्यामुळे त्यांच्या पचनशक्तीवर परिणाम होऊन त्याच्यातून जे मल, विष्ठा तयार होते ती दूषित असते. सोबतच एक  गठ्ठयाने कबूतरे एका जागी जमा होत राहतात. हीच कबूतरे जिथे अन्न टाकले जाते त्या ठिकाणच्या जागेमध्ये जाऊन बसतात ,मग गाळ्याच्या, दुकानाच्या शटरवर किंवा ज्या खाचा, इमारतीचे कोपरे असतील किंवा घरांच्या खिडक्या, ग्रील यांच्या आसपास लपण्यासाठी जागा शोधतात, बहुतांश वेळी तिथेच विष्ठा टाकतात आणि अंडीही घालतात. घरटी करतात, पिल्लांना जन्म देतात आणि त्या कबुतरांच्या शरीरातील पिसांमधून बारीकशी धूळ, जीवजंतू आणि घाण बाहेर वातावरणात पसरते, हवेत पसरली जाते.तसेच त्यांच्या विष्ठेतूनही अनेक जिवाणू वातावरणात पसरत असतात. ते श्वसनाच्याद्वारे फुपफुस गेल्यावर फुफुसाचे आणि श्वसनाचे मोठे आजार जडतात. फुफुसाचा निमोनियासारखा गंभीर आजार होतो आणि श्वास घ्यायला त्रास होणे यासारख्या तक्रारीमुळे लोकांचा मृत्यूदेखील ओढवतो.

    डॉ. विजय वारद सांगतात, की कबुतरांच्या विष्ठेमुळे, राइनायटिस, त्वचेची एलर्जी, डोळे लाल होणं, सायनसायटिस यांसारखे आजार होण्याची शक्यता असते.कबुरतांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे विकार वाढल्याचे दिसून आले आहे. या आजारांचे वेळीच निदान आणि उपचार केले नाहीत तर श्वसनमार्गाचे गंभीर आजार होऊ शकतात. हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया, श्वसननलिकेला सूज येणे फुपफुसांना सूज येणे, क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (श्वसनमार्गाचे गंभीर आजार) यांसारखे गंभीर आजार उद्भवतात. श्वसननलिकेला सूज आल्याने अस्थमाग्रस्त रुग्णांना गंभीर स्वरूपाचा शॉक येण्याची शक्यता असते.

एका प्राणीशास्त्रात पीएचडी केलेल्या व्यक्तीने सांगितले आहे की, "कबुतरांना देवाने पंख दिले आहेत. ते त्यांचं खाद्य शोधतात. तुम्ही त्यांना सवय लावली आहे, तुम्ही दाणे टाकता म्हणून ते तिथे येतात. तुम्ही अन्य ठिकाणी धान्य टाका, कबुतरे आपोआप तिकडे येतील, त्यांना सवय लागले. जेव्हा गुजरातमध्ये पतंग महोत्सव असतो. त्या पतंग महोत्सवात कबुतरांबरोबर अनेक पक्षी मांजाने मान कापून मरुन पडतात. पक्ष्यांचे हात-पाय कापले जातात. तिकडे रुग्णवाहिका उभ्या असतात. मग तेव्हा धर्माचा विषय येत नाही का? कबुतरांमुळे होणारा त्रास हा वैज्ञानिक विषय आहे, यामध्ये धर्म आणू नये. कबुतरं फक्त दाणे खात नाहीत, कीटकही खातात. कबुतरांना दाणे टाकायचे असतील तर स्वतःच्या इमारतीमधील टेरेसवर टाका. यांच्या विष्ठेतून निर्माण होणाऱ्या जीवाणूंमुळे इतके लोक मरतात. त्यांच्या मृत्यूला कोण जबाबदार? जे लोक मेलेत या आजारपणामुळे त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे ? म्हणून  जैन समाजाला विनंती आहे की, हा अतिरेकीपणा थांबवायला हवा.

मुंबईसारख्या शहरात न्यायालयाचा अवमान करीत आणि पोलिसांना न जुमानता कबुतरांबाबत असे आंदोलन होत असताना; डोंगराळ भागात कडे-कपाऱ्यात राहणारी कबुतरे मात्र इतस्ततः फिरतात. त्यांची उपजिविका ही प्रामुख्याने  जमिनीतील किडे, मुंग्यांवर अवलंबून असते. परंतु ज्या पद्धतीने आपण पुण्य कमावण्याच्या नादात त्यांना चुकीचे अन्न पुरवत आहोत, त्यामुळे त्यांच्या संपूर्ण जीवनशैलीवर त्याचा परिणाम होत आहे. ही कबुतरे नैसर्गिकरित्या थोड़ी आळशी असल्यामुळे कमी श्रमांत मिळणारे अन्न खाण्याकडे त्यांचा कल असतो. या कबुतरांचा विणीचा हंगाम हा नैसर्गिकरित्या फक्त वर्षातून एकदा म्हणजेच पावसाळ्यात आहे. परंतु शहरात या कबुतरांना दानशूर धार्मिक लोकांकडून फुकट दाणापाणी मिळत असल्यामुळे  ही कबुतरे वर्षाचे बाराही महीने अंडी घालत आहेत. त्याची संख्या वाढत चालली आहे. कबुतरांच्या शारीरिक दृष्टीने विचार केल्यास आपण त्यांना चुकीचे अन्न पुरवत आहोत. त्यामुळे त्यांच्या पचनशक्तीवर त्याचा परिणाम होऊन त्यांच्या विष्ठेमुळे अनेक आजार मुख्यत्वे श्वसनाचे आजार समाजात वाढत आहेत. लोकांच्या आरोग्यापेक्षा धर्म काही मोठा नाही. कारण धर्माचे अधिष्ठान हे ”सर्वे जंतू सुखीनः असे असले तरी माणसाचे जगणे आणि आरोग्य राखणे हे महत्त्वाचे आहे .त्यामुळे लोकांच्या आरोग्याला अहितकारक असलेले कबुतरखाने कोठेही असू नयेत. जर कुणाल जास्त पुळका येत असेल आणि जास्त पुण्य कमवायचे असेल तर अशा लोकांनी घरात पोपटाप्रमाणे कबुतरे पाळावयास कुणीही हरकत घेणार नाही.

मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय न्यायालयाने दिल्यावर प्रशासनाने प्रशासनाने केलेल्या कार्यवाही विरोध करत अनेक अंधश्रद मुंबईकर बुधवारी रस्त्यावर उतरले. काहींच्या मते कबुतरांना अन्न देणे ही धार्मिक भावना आहे. तर काहींनी प्रशासनाचा हा निर्णय अमानवी असल्याचा आरोप केला. मात्र, मुंबईतील बेसुमार वृक्षतोड, हवा प्रदूषण, नदी, तलाव यांची दुरवस्था, ”कांदळवनांचा ऱ्हास याबाबत अपवादानेच मुंबईकर एकवटल्याची उदाहरणे आहेत. यामुळे गंभीर विषयावर मुंबईकर गप्प का बसतात?

 खाडीजवळील कांदळवने मोठ्या प्रमाणावर नष्ट  होत आहेत. तेथील पशू, पक्षी मानवी वस्तीत शिरत आहेत किंवा मृत्यू होत आहेत. परिसंस्थेतील अनेक प्रजाती धोकादायक स्थितीत आहेत. मात्र, त्यांच्यासाठी मुंबईकरांचा आवाज उठताना दिसत नाही. मुंबईतील नदी, तलाव प्रदूषणाच्या विळख्यात आहेत. तेथील जीवसृष्टीही ऱ्हास  होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, त्याबाबत ठराविक संस्था, कार्यकर्ते वगळता चर्चाही होताना दिसत नाही.कबुतरांसाठी जीव तळतळणाऱ्या या लोकांना ही जीवसृष्टी महत्वाची वाटत नाही का? हे जैनधर्मियांना कसे काय कळत नाही; हा प्रश्न उरतो.

     परदेशांप्रमाणे भारतात अशा कबुतरांच्या नसबंदीचीसुद्धा कोणतही सोय नाही, त्यामुळे कोणत्याही देशांतील कबुतरखान्यांचे उदाहरण कोणी देऊ नये. कारण असे देश कबुतरांना नसबंदीचे औषध देऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवत असतात. त्याचप्रमाणे तेथे प्रचंड प्रमाणात स्वच्छाता राखली जाते. लोक त्यांना दाणे न देता फक्त सरकारी यंत्रणाच त्यांना खाद्य पुरवत असते. जे आपल्याकडे होत नाही. म्हणूनच असे कबुतरखाने बंद व्हायलाच हवेत.जे रोगराई पसरण्याचे अड्डे झाले आहेत. - शिवाजी गावडे , ठाणे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मीही हुतात्माच!