महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
न्यूरोलॉजिकल समस्यांची लक्षणे
मेंदू, पाठीचा कणा किंवा नसा प्रभावित करणाऱ्या परिस्थिती उद्भवतात तेव्हा ती न्यूरॉलॉजिकल समस्या असू शकते. यांची अनेक वेगवेगळी शारीरिक, संवेदी आणि मानसिक लक्षणे असतात. मज्जासंस्थेतील जटिलता यामध्ये दिसून येते. संभाव्य न्यूरोलॉजिकल विकार ओळखण्यासाठी आणि वेळेवर वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी या लक्षणांच्या पॅटर्न ओळखणे अत्यंत महत्वाचे आहे.
न्यूरोलॉजिकल समस्यांची सामान्य लक्षणे
१. वेदना, डोकेदुखी (सतत, तीव्र किंवा अचानक सुरू होणे) पाठ किंवा मान दुखणे, विशिष्ट मज्जातंतू मार्गांवर वेदना (उदा. सायटिका)
२. संवेदी विकार : शरीराच्या एका बाजूला किंवा एकाच अवयवात बधीरपणा, मुंग्या येणे किंवा पिन आणि सुया टोचल्यासारखी संवेदना होणे, त्वचेतील संवेदना कमी होणे किंवा बदललेली संवेदना
दृश्य बदल : दुहेरी दृष्टी, दृष्टी कमी होणे, अंधुक दृष्टी
ऐकण्यात बदल : कानात वाजणे, ऐकण्यात कमी होणे
बदललेली चव किंवा वास
३. स्नायू आणि हालचालींमध्ये असामान्यता : एका भागात किंवा संपूर्ण शरीरात कमकुवतपणा, स्नायूंची ताकद कमी होणे किंवा स्नायू कमकुवत होणे अर्धांगवायू (आंशिक किंवा पूर्ण) कडकपणा, ताठरपणा (उदा. पार्कन्सिन आजरात) थरथरणे (अनैच्छिक थरथरणे) धक्का बसल्यासारख्या किंवा अनियंत्रित हालचाली संतुलनात अडचण, अस्थिर चालणे, वारंवार पडणे खराब समन्वय किंवा वेंधळेपणा
४. आकलन, तर्क, स्मृती या क्षमतांमध्ये आणि मानसिक बदल : स्मरणशक्ती कमी होणे, गोंधळ होणे किंवा नवीन माहिती शिकण्यात समस्या, विचार करण्यात अडचण येणे, समस्या सोडवण्यात किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे.
भाषेतील अडचणी : बोलण्यात, समजण्यात अडचण येणे, अस्पष्ट बोलणे किंवा बोलण्यास असमर्थता (ॲफेझिया)
भ्रम, जे समोर नाही ते दिसणे, ऐकू येणे किंवा विचारांमधील अव्यवस्थितपणा (काही डिमेंशिया किंवा एन्सेफॅलोपॅथीसह उद्भवू शकते), लक्षणीय मूड स्विंग्स, नैराश्य, चिंता किंवा वागणुकीतील बदल
५. फिट येणे आणि संबंधित लक्षणे
शरीराची अनियंत्रित थरथर, शरीर किंवा एखादा, काही अवयव आकुंचन पावणेअचानक जाणीव कमी होणे, डोळ्यासमोर काळोख पसरणे, किंवा काहीच प्रतिसाद देऊ न शकणेऑरा (आभा) (जसे की असामान्य वास, दृश्य विकृती किंवा स्पष्टपणे व्यक्त करता येणार नाहीत अशा भावना, इतर लक्षणे दिसण्यापूर्वी)
६. इतर वैशिष्ट्ये : गिळण्यास त्रास होणे किंवा घशात गाठ जाणवणे
झोपेचा त्रासः निद्रानाश किंवा खूप जास्त झोप येणे, अनैच्छिक शारीरिक कार्यांमध्ये समस्या (उदा. हृदय गती नियंत्रणात न राहणे, घाम येणे किंवा डोळे सतत मिचकावणे)
न्यूरोलॉजिकल समस्या ओळखण्यासाठी : बहुतेक न्यूरोलॉजिकल लक्षणे मध्यवर्ती (मेंदू आणि पाठीचा कणा) किंवा परिधीय (मेंदू/पाठीच्या कण्याबाहेरील नसा) मज्जासंस्थेमध्ये अडथळ्यांमुळे उद्भवतात. लक्षणे अनेकदा विशिष्ट पॅटर्नने होतात, वाढत जातातःअचानक सुरुवात, जसे की अचानक कमकुवतपणा किंवा दृष्टी कमी होणे, स्ट्रोकसारख्या आपत्कालीन परिस्थिती येऊ शकतात. हळूहळू स्मरणशक्ती कमी होणे यासारखी प्रगतीशील लक्षणे, अल्झायमर किंवा डिमेंशियासारख्या इतर परिस्थिती दर्शवू शकतात.
मल्टिपल स्क्लेरोसिस किंवा फंक्शनल न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरसारख्या विकारांमध्ये लक्षणांमध्ये बराच चढ-उतार दिसून येतो
वैद्यकीय मदत कधी घ्यावी? : काहीवेळा न्यूरोलॉजिकल लक्षणे सौम्य असतात, विशिष्ट वाटत नाहीत, तर काहीवेळा ती गंभीर आणि जीवघेणी असू शकतात, यासाठी सतर्क रहा :अचानक येणारी कमजोरी, सुन्नपणा, दृष्टी कमी होणे किंवा बोलण्यात अडचण येणे (संभाव्य स्ट्रोक) गंभीर किंवा अपरिचित डोकेदुखी अचानक फिट येणे (जे पूर्वी कधीच झालेले नाही) किंवा अधिकाधिक गंभीर होत जाणाऱ्या फिट, शरीराची चेतना, वर्तन किंवा मानसिक कार्यात अचानक बदल होणे. अशी लक्षणे दिसून आल्यास, त्वरित डॉक्टरांना दाखवा.
-डॉ. यतीन सागवेकर, कन्सल्टन्ट, न्यूरोलॉजी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई