गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा महोत्सव

महाराष्ट्र राज्याचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव हा आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून घोषित केला. तसेच देशात आणि जगात गणेशोत्सवाची व्याप्ती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटीबद्ध राहिल असे स्पष्ट केले. "गणेशोत्सव महाराष्ट्राचा महोत्सव” असे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी पावसाळी अधिवेशनात घोषित केले आहे. त्यामुळे  महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा आगामी काळात  "महाराष्ट्र राज्याचा महोत्सव” म्हणून ओळखला जाईल.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेला गणेशोत्सवाला अवघे काही महिने शिल्लक राहिले असताना आता महाराष्ट्रातील गणेशभक्तांसाठी ही एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी आहे. सध्या राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी भाजप आमदार हेमंत रासणे यांनी सभागृहात गणेशोत्सवाचे महत्त्व सांगण्यावर भर दिला आहे. तसेच सध्या राज्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. गणेश मंडळे अनेक सामाजिक कार्य करत असतात. आता या उत्सवावर काही बंधने आली आहेत. पण आता महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून जाहीर करावा, तसेच त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या या मागणीला मंत्री आशिष शेलार यांनी दुजोरा देत महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा १८९३ रोजी लोकमान्य टिळकांनी सुरू केला. त्यापूर्वी घरोघरी हा उत्सव सुरू होता. महाराष्ट्र राज्याचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव हा आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून घोषित केला. तसेच देशात आणि जगात गणेशोत्सवाची व्याप्ती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटीबद्ध राहिल असे स्पष्ट केले.

       या अनुषंगाने सरकारने  पीओपी (POP) मूर्तींवरील निर्बंध हटविले असून, विसर्जन परंपरागत पद्धतीनेच व्हावे, असे धोरण सरकारने न्यायालयासमोर मांडले आहे. तसेच राज्य सरकारचे धोरण गणेशोत्सवासाठी कोणत्याही प्रकारे आडकाठीचे असणार नाही. या घोषणेमुळे राज्यातील गणेश मंडळांमध्ये आणि गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारची ही भूमिका गणेशोत्सवाच्या पारंपरिक आणि भव्य आयोजनाला प्रोत्साहन देणारी ठरणार आहे.

      युवकांना संघटित करण्यास आणि समाजकार्य करण्यास एकत्र आणण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव सण सुरू केला. हाच विचार आणि हीच परंपरा चालू राहावी, यासाठी सरकारने टाकलेले  हे महत्वपूर्ण पाऊल आहे. गणेशोत्सव हा केवळ आनंदाचा नाही, तर एकोप्याचा, सामाजिक बांधिलकीचा आणि संस्कृती जपणारा सण आहे. कोणतीही गैरप्रकाराची घटना घडू नये, उत्सव शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडावा यासाठी आपण सर्वांनी सजग राहणे आवश्यक आहे. गणेशोत्सवाचे पावित्र्य राखणे ही सामूहिक जबाबदारी गणेशोत्सव मंडळांची आणि गणेश भक्तांची आहे.

       अतिशय योग्य आणि सर्व घटकांचा विचार करून शासनाने घेतलेला हा निर्णय आहे. पीओपी मूर्तीवरील बंदी हटवली आहे, त्याचप्रमाणे सजावटीच्या विविध पुन्हा वापरात  येणाऱ्या वस्तू धर्माकोल, प्लास्टिक, फोम इत्यादींवरील वरील निर्बंध शासनाने हटवावेत, जेणेकरून सजावट करणाऱ्या कलाकारांच्या कलाकृती रसिकांपर्यंत पोहोचतील. असे काही कलाकारांचे मत आहे. ती सध्याच्या स्थितीस अनुसरून आहे, परंतु  गणेशोत्सव किंवा कोणत्याही सणाबाबत सजावट करताना कायमस्वरूपी पर्यावरणस्नेही उपाययोजना मंडळानी आणि भक्तांनी करायला हवी म्हणजे सर्व प्रकारचे प्रदूषण टाळता येईल. - शिवाजी गावडे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

आई प्रथम गुरु