महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
मला सांगा.. सुख म्हणजे नक्की काय असतं?
सुखाची वाट पाहत काहीही कष्ट न करता अडचणी न सोसता आराम करत बसलो तर सुख मिळणार नाही. सुख मिळण्यासाठी काहीतरी प्रयत्नपण करावे लागतील. देवाने जे दिलं आहे ते सुख असो किंवा दुःख असो, जे दिलंय ते आनंदाने स्वीकारायचे. देवाने द्यायचं ठरवलं तर देव भरभरून देतो.
प्रशांत दामले यांनी गायलेलं हे एक चित्रपटांमधलं आणि नाटकांमधील गाणं आहे. हे गाणं लंडनच्या कार्यक्रमात प्रशांत दामलेंनी गावे असा त्यांना तिथे आग्रह करण्यात आला. रसिकांच्या मागणीला मान देऊन ते गायले आणि त्या गाण्याचा व्हिडिओ सध्या सगळीकडे वायरल होत आहे.
खरंतर सुख म्हणजे नक्की काय असतं ? हा किती गहन प्रश्न आहे.पण सहजतेने हसत खेळत आणि विनोदी भावाने प्रशांत दामले यांनी आपल्याला तो प्रश्न सोडवून जरी नाही तरी प्रश्नाचा नक्की अर्थ काय आहे ते समजावून सांगितले आहे असं म्हणायला हरकत नाही.
शब्द
मला सांगा सूख म्हणजे नक्की काय असतं?
काय पुण्य असलं की ते घरबसल्या मिळतं!
दान घेतानाही झोळी हवी रिकामी
भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली
आपण फक्त घेताना लाजायचं नसतं
देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो
हवंय ? नको ! ते म्हणणं प्रश्नच नसतो
आपण फक्त दोही हात भरून घ्यायचं असतं
मला सांगा सूख म्हणजे नक्की काय असतं?
कवी लेखक : श्रीरंग गोडबोले
मुंबई पुणे मुंबई भाग दोन मधल्या या गाण्याने खळबळ माजवली. सुख म्हणजे काय असतं ? याबद्दल लोकांना विचार करायला लावणं सोपं नसतं. मोठे मोठे संत साधू धर्मगुरू यांनी देखील सुख म्हणजे नक्की काय असतं, ते लोकांना समजवायचा प्रयत्न करत भरपूर प्रयत्नांती आपापल्या प्रगल्भ भावाने निष्कर्ष काढले. पण प्रशांत दामले यांनी मात्र सुखाची सहज सोपी व्याख्या केली.
आम्ही लहान असताना म्हणायचे, ‘५०००० रुपीज जॉब अँड अ सन, नथिंग इज लेपट इन लाइफ टू बी डन!'
आजही ते थोड्याफार फरकाने मत सारखेच आहे. पण ह्या गाण्यातले तत्त्वज्ञान तर मला फार आवडते. घरबसल्या काहीच मिळत नसतं किंवा गुहेत जर सिंह बसून राहिला की शिकार माझ्याकडे चालत येईल आणि मी खाईन. तर जंगलचा राजा असूनही सिंहाला उपाशी मरायची वेळ येते.
असे सुखाची वाट पाहत काहीही कष्ट न करता अडचणी न सोसता आराम करत बसलो तर सुख मिळणार नाही. सुख मिळण्यासाठी काहीतरी प्रयत्नपण करावे लागतील. देवाने जे दिलं आहे ते सुख असो किंवा दुःख असो, जे दिलंय ते आनंदाने स्वीकारायचे. देवाने द्यायचं ठरवलं तर देव भरभरून देतो. हे आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे. आपले हात रिकामी असले तर देव ते भरतो. आपली झोळी रिकामी असेल तर देव त्यात भरायला काहीतरी देतो. एखादी गोष्ट आयुष्यातून निघून जाते, तेव्हा त्या जागेवर रिप्लेसमेंट म्हणून दुसरं काहीतरी येत असत. असे बऱ्याच प्रकारचे अर्थ, तुम्हाला हवे तसे अर्थ लावा. अलगद जगात काहीच मिळत नसतं जे दान पडतं ते स्वीकारावे लागते. तसं जो अर्थ आपल्या मनाला भावतो तो आपण आपल्या हृदयाशी धरून ठेवावा आणि सुखी व्हावं.
सुख म्हणजे दुसरं काय असतं?
-शुभांगी पासेबंद