महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
एसटीबस प्रवासातील विचित्र अनुभव
काही क्षणातच मागील टायरचें रिमोल्डिंग निखळून पडले होते! सिटखालचा लोखंडी पत्रा फाडून खूप मोठे भोक पडलं होतं! रस्त्यावरील माती-खडे आत बसमध्ये उधळून पडले होते! एका प्रवासी महिलेच्या डोळ्यावरील भुवईतून रक्त येत होतं! त्या महिलेने स्वतःजवळील हातरूमाल धरून जखम दाबली होती! टायर फुटल्याच्या भीतीने बसमध्ये एकच हलकल्लोळ माजला होता! प्रवासी घाबरले होते! ड्रायव्हरने बस नियंत्रित करीत रस्त्याच्या कडेला घेतली! लोक घाबरून खाली उतरले होते!
लालपरी एसटी बस आपल्या लहानपणापासून श्वासात, धमनीत, मनात येऊन बसली आहें, राज्य करीत आहें! आपण आपल्या गावी स्टँडवर उभे असतो! दुरून एसटी येतांना नजरेस दिसते तेव्हा मनात भावभावनांचीं उसळी आनंद लहरींवर असतें!
लालपरी, एसटी गाडी गाव शहराच्या वाहिन्या आहेत! दळणवळणात आधुनिक तंत्रज्ञान वापरणारें देश अन राज्य प्रगत समजलें जातात! लाल परी हृदयातलीं स्पंदन आहे, धडकन आहें! गाव-खेडे शहरं जोडणारी लालपरी प्रत्येक व्यक्तीला आपली वाटतें! ही शासकीय दळवळण सेवा नसती तर दुर्गम भाग जोडला गेला नसता! खेडं शहराशी जोडलें गेलें नसतें! लहान लहान पाडे खेड्याशी जोडलें गेलें नसतें! लालपरी प्रत्येकाला आपली वाटतें! गरिबांची, श्रीमंतांची, माया-बहिणींची, महिलांची, जेष्ठांची, दूरवर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीर्नीचीं, पासष्टीपार जेष्ठांची, पंच्याहत्तरीपार वरींष्ठांची, तरुण-तरुणींची जवळची वाटणारी लालपरी सुख-दुःखाचीं साक्षीदार आहें!
एसट गाडी गावं जोडत असतें! विखूरलेल्या माणसांना एकत्र आणून निश्चित ठिकाणी सोडत असतें, पोहचवत असतें! लालपरी माणसं गोळा करीत असतें! प्रवासात नवे चेहरे भेटत असतात! काही क्षणांचीच भेट असतें ती! प्रवासात संवाद सुरू होतो! कधी हास्यकल्लोळ असतो, कधी भावुक प्रसंगानी डोळे पाणावतात! प्रवासात सुख-दुःखाची देवाण होते! शब्द देणे - घेणे सुरू राहात! कधी सीटवर बसण्यासाठी भांडणं सुरू होतात! कधी मारामारीदेखील पहायला मिळते! कधी मख्ख चेहरा करुन प्रवास करणारे प्रवासीदेखील भेटतात! कंडक्टर प्रवाशांचा दुवा असतो! कधी भांडणे सोडवणे सुद्धा असतं! कंडक्टर शांत, संयमी आवाजात बोलून भांडणे सोडवत असतात! सरकत सरकत प्रवाश्यांचें तिकिटं काढण्यास पुढे निघून जातात! तेवढ्यात बस थांबा येतो! सिंगल बेल वाजतें! गाडी थांबते! भांडणारे खाली उतरतात, बोलणारे, हास्य कल्लोळात बुडालेले एसटीच्या एकाच दरवाज्यातून बाहेर पडतात! उतरणारे-चढणारे गर्दी करू लागतात! नवीन प्रवासी एसटीत येऊन बसतो! डबल बेल होते! बस पळू लागते! चढ उतरच्या प्रवासात प्रत्येकजन आपल्याचं विश्वात गुंग असतो!बसस्टॉप मागे राहून जातं! स्टँडवर शांत निरव शुकशुकाट होऊन जातो! लालपरी वेळ काळा सोबत घेऊन पळत असतें!
माणसाचं जीवन देखील एसटी प्रवासासारखंच असतं नाही का! जन्मापासून एकेकजण भेटत जातात! काळ आखलेल्या तक्त्याप्रमाणे निघून जात असतो! प्रत्येकानें तिकिटं घेऊन निघून जायचं असतं! एसटी प्रवासासारखं देणं घेणं करीत जगणं सुरूच राहातं! माणसं जात येत असतात! एसटी गावोगावी जात असतें! रस्ता तसाच आपल्या स्थळी पडून असतो!.....
माझ्या आवडत्या लालपरीतून मी नेहमीचं प्रवास करीत असतो! अजून अर्धे तिकिट नसलं तरी एसटी नावाचं गजबजलेलं जग मला आवडत असतं! तिथला समृद्ध अनुभव वेगळाचं असतो! माणसांचा समुद्र पाहावा तर एसटी स्टँडवरच! नवनवीन माणसं चढ-उतार करीत आपल्या निश्चित ठिकाणी निघून जात असतात! सुख-दुःखाच्या अनेक घटना आपल्या स्मृती पटलावर कोरल्या गेलेल्या असतात! त्यातीलचं एक ताजी घटना सांगतो...दिनांक ३ जून २०२५ रोजी प्रवासाचा वेगळा अनुभव देणारा ठरला! माझ्या मनपटलावर कोरला गेलेला तो अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही.....
आम्हाला लग्नाला धुळ्याला जायचं होतं! पूण्यातल्या खराडी बायपासहून सकाळी ५-४० ला ‘पुणे-चोपडा' लाल एसटी बसमध्ये बसलो होतो! तो सूर्योदयापूर्वीचा अंधार होता! नगररोडला गर्दी होती! एसटीतील लाईट चमकत होती! एसटी कंडक्टर त्यांच्या जागेवरून उठून आमच्याकडे आले अन् पैसे घेऊन त्यांनी आम्हाला धुळ्याचं तिकिट दिलं होतं! आम्ही सीटवर जाऊन बसलो अन बसच्या काचेतून बाहेरील दृश्य पाहण्यात दंग झालो होतो! लालपरी वेगाने पळत होती! माझं मनही त्याचं वेगाने पळत होतं! हळूहळू सूर्योदयापूर्वीचा उजेड काचेतून आत येत होता! बसमधले प्रवासी अर्धवट झोपेत होते! ड्रायवर वेगाने गाडी चालवीत होते! वेळ आणि वेगाचं काहीतरी जवळचं नातं असावं, गणित असावं! दोघेही महत्वाचे असतात! दोघेही पळत असतात! ड्रायव्हर वाहनांची गर्दी टाळत अतिकुशलतेने ड्रायव्हिंग करीत होते!
लालपरीचे रबरी चाकं गोलगोल फिरत होती! एकेक गावं मागे जात होती! बसच्या इंजिनचा आवाज कानी येत होता! प्रवासी आपापल्या सीटवर अर्धवट झोपेअधीन बसले होते! स्पीड ब्रेकरचां झटका सहन करीत रबरी टायर त्यांच्याचं नादात उधळत पळत होती!शिरूर मागे गेलं! अहिल्यादेवी नगरही गेलं होतं! सकाळी नऊच्या सुमारास राहुरीच्या दिशेने बस पळत होती! लालपरीचा वेग पाहता धुळ्याला वेळे आधीच पोहोचणार असं वाटलं होतं! अन अचानक खालून ‘धढाम धूम, धढाम धूम' असा आवाज आला होता! प्रवासी आवाजामुळे अतिशय घाबरले होते! काही क्षणातच मागील टायरचें रिमोल्डिंग निखळून पडले होते! सिट खालचा लोखंडी पत्रा फाडून खूप मोठे भोक पडलं होतं!
रस्त्यावरील माती-खडे आत बसमध्ये उधळून पडले होते! एका प्रवासी महिलेच्या डोळ्यावरील भुवईतून रक्त येत होतं! त्या महिलेने स्वतःजवळील हातरूमाल धरून जखमदाबली होती! टायर फुटल्याच्या भीतीने बसमध्ये एकच हलकल्लोळ माजला होता! प्रवासी घाबरले होते! ड्रायव्हरने बस नियंत्रित करीत रस्त्याच्या कडेला घेतली! लोकं घाबरून खाली उतरले होते! मागील टायरजवळ पाहिले असता, रिमोल्डिंग टायरचा वरचा स्तर टायरसोबत गोल गोल फिरत खालून धडका देत पत्रा फाटून, तुटून माती खडे बसध्ये आलें होते! रिमोल्डचा तुकडा टायरलाच लटकला होता!
वातावरण भयभीत होतं! घाबरेघुबरे होतं! बसमधील अतिजागरूक एका तरुणप्रवाशाने ड्रॉयव्हरसोबत भांडणं सुरू केलं होतं! डेपो मॅनेजरचां मोबाईल नंबर घेत काहीतरी बोलत होता! ड्राइव्हरने शांत संयमी राहात भांडणाऱ्या अग्रेसीव्ह तरुणाला समजावून सांगितले!रबरी टायरचां फाटलेला रिमोल्ड तुकडा बाजूला काडुन फेकला!पून्हा सर्व प्रवाशांना बसमध्ये बसायला सांगितले!बस निघाली होती!जेमतेम एखादा किलोमीटर बस गेली असेल पून्हा तसाच ‘धढामं धूम,धढामं धूम' आवाज कानी आला होता! आधीच फुटलेल्या आतील लोखंडी पत्र्यातून पून्हा माती-खडे आत आले होते!लोकं खूप घाबरली होती! पून्हा रिमोल्ड टायरचा दुसरा स्तर तुटला असावा! ड्रायव्हरनें गाडी पून्हा रस्त्याच्या कडेला घेतली! सर्व प्रवासी बस खाली उतरले! कंडक्टरनें पूण्याहून अमळनेरकडे निघालेली ‘पुणे-अमळनेर' बस थांबवली! प्रवासी त्यात जागा मिळेल तिथे बसले होते!
आमची ‘पुणे-चोपडा' एस्टीबस मागे राहिली होती! आम्ही ‘पुणे-अमळनेर' बसने निघालो होतो! प्रवास बदलत असतो! कधी परीक्षाही घेत असतो! बस आपल्याचं नादात निघाली होती! येणाऱ्या प्रत्येक बस स्टँडमध्ये प्रवासी उतरत होते! नवे प्रवासी बसत होते! राहुरी, बाभळेश्वर, राहाता, शिर्डी, कोपरगाव, येवला करीत साडेबारा वाजता एका ढाब्यावर जेवणाला थांबवली! आम्ही बसमधून खाली उतरत असतांना कंडक्टर बोलले, ‘अरेच्च्या!!चोपडा बस येथे कशी?' आम्हीदेखील चकित झालो होतो! जादूची कांडी तर फिरली नसावी नां? आम्ही खाली उतरत असतांना अवघ्या पाच मिनिटात ‘पुणे-चोपडा' बस निघाली! मी पळत जाऊन विचारले, ‘आम्ही या बसचं तिकीट घेतलं आहें! आलो तर चालेल नां? कंडक्टर हो म्हटला! तसं पळत जाऊन ‘पुणे अमळनेर' बसमधून आमचं सामान घेतलं! अन पुन्हा ‘पुणे -चोपडा' बसमध्ये प्रवास सुरू झाला होता! एकातून उतरून पुन्हा त्याच ठिकाणी आल्यासारखं झालं होतं! पृथ्वी गोल आहे याचा परिचय पुन्हा करुन घेत होतो!
बस आधी खूप आधी पोहचल्याचं गौड बंगाल विचारले असता कंडक्टरकडून सस्पेन्स कळले होते.....अवघ्या पाच-दहा मिनिटात टायर बदली करुन आपल्याचं गतीने बस निघाली होती! अन ढाब्यावर येऊन जेवण उरकून पून्हा निघाली देखील होती! गतीचा, मतीचा, मातीचा अनुभव घेत आम्ही दुपारी बरोबर २-४०ला धुळे स्टँडवर पोहचलो होतो! हा नवीन अनुभव स्वप्नवत होता! माणसं माणसाला निरखीत पूढे निघाला आहें! मी देखील अनुभवांच्या भांडारात जीवंत अनुभव साठवीत होतो! लालपरीचा वेगळा अनुभव सोबतीला घेत प्रवास करीत निघालो आहें! दररोज नवीन अनुभव सोबतीला घेत प्रवास सुरूच आहें! जीवन असंच असतं नाही का!!!! - नानाभाऊ माळी