महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
माणदेशी एक्सप्रेस
‘अनंत आमुची ध्येयासक्ती, अन अनंत आशा किनारा तुला पामराला'
ध्येय, जिद्द, चिकाटी, अमर आशावाद यांचा संगम आणि एक अलौकिक आविष्कार म्हणजे ‘माणदेशी एक्सप्रेस ललिता बाबर.' आंतरराष्ट्रीय धावपटू, भारताची सुवर्णकन्या आणि मोहिची वायुकन्या असा त्यांचा नावलौकीकच नव्हे, तर हे आपल्या देशाचे वैभव आहे. प्रतिकुल परिस्थितीवर मात करत तिमिराकडून तेजाकडे जाण्याची जिद्द खरोखरच वाखाणण्याजोगी आणि यशोशिखराला ललामभूत ठरणारी असून, "श्रम एव जयते” हाच त्यांचा ध्यास असावा. आंतरराष्ट्रीय धावपटू ते महाराष्ट्र शासनाच्या सेवेत उप जिल्हाधिकारी पर्यंतचाप्रवास खरोखरच प्रेरणादायी ठरला आहे.
सातारा जिल्ह्यातील मोहीगांव अतिशय अल्पवस्तीचे गाव, पण या गावाने ललिता बाबर यांच्या माध्यमातून क्रिडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. सर्व परिस्थितीचा सामना करताना त्यांचे आई बाबा निरक्षर असल्याचा लवलेशही पुढे कधी सरसावला नाही. मात्र सर्व भावंडाचे शिक्षण, त्यांच्या अंगभुत गुणांना वाव देतत्यांना पाठबळ देणे, यातच खरी साक्षरता, हे त्यांच्या आई-बाबांनी त्यांच्या कृतीतून सिध्द़ करुन दाखवले.शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ललिता बाबर यांनाआई वडिलांच्या कष्टाची जाणिव होती. आई बाबा आपल्यासाठी अपार मेहनत घेत आहेत, हे आकलन शालेय जीवनात होणे ही सामंजस्याची उपलब्धी म्हणजे दैवदत्त़ देणगी त्यांना लाभली. यामुळे आई वडीलांसोबत शेती आणि अनुषंगिक कामे करणे, जनावरांना वैरणपाणी करणे याची सवय त्यांनी स्व़तःला लावून घेतली. या नंतर शाळेत वेळेत पोहचण्यासाठी अनवाणी धावत जाणे, हे नित्याचे होते. त्यांच्यातील वक्त़शीरपणा सत्यांनी कुठेही बाधा येऊ दिली नाही हे विशेष करुन नमुद करण्याजोगे! त्यात देशाच्या नावलौकिकाचा एक अविभाज्य भाग होणे हे तर दिवास्वप्ऩच. कदाचित ललिता यांना जागेपणी स्वप्ऩ बघण्याचा छंद असावा हेही तितकेच खरे.
प्रतिकुल परिस्थितीला सामोरे जातांना ललिता यांचा धावण्याचा सराव, त्यासाठीची आवड आणि समर्पणाची भावना ललिता यांना स्वस्थ़ बसू देत नव्हती, ही बाब सूर्यप्रकाशाइतकी सत्य आहे. रोज धावत येणाऱ्या ललिता यांना त्यांच्या शाळेतील शिक्षकांनी हेरले आणि त्यांच्या गुणांना प्रोत्साहन देत त्यांना तालुका, जिल्हा,राज्य अशा विविध स्तरावर धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी उर्जा आणि प्रोत्साहित करता करता अनेकवेळा त्यांचे नातलग ललिता यांना आर्थिक पाठबळ देत असत. बक्षिसरुपातून मिळणाऱ्या रकमेच्या माध्यमातून घरखर्च भागवणे आणि स्पर्धेसाठी लागणारे साहित्य ़इत्यादी स्वत़ःच्या मेहतीने घेणे हा धडा त्यांनी गिरवला.
ध्येयवेडया लोकांना जागेपणी स्व़प्ऩ बघण्याचीसवय असते, असे म्हणतात. असेच काही ललिता यांच्या बाबतीत घडणे स्वाभाविक आहे. यशाचा पल्ला गाठायचा हे प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीचे स्वप्न असते. मग ललिता त्यात वेगळया कशा असू शकतात ? यशाचा एक एक टप्पा गाठत ऑलम्पिकमध्ये खेळाचे स्वप्न त्यांनीत्यांच्या स्व़तःच्या मेहनतीने साकार केले. घरची परिस्थिती अगदी बेताची असल्याने हा प्रवास अतिशय जिकरीचा असला तरीही स्व़तःसाठी स्व़तःचा मार्गशोधला, तोही राष्ट्रीय महामार्ग. हा निर्णय खऱ्या अर्थाने धाडसाचा असला तरी देखील साहसाला एक प्रभावळ असते, असे म्हणतात ते उगाचच नाही.
आर्थिक स्थिती, सामाजिक प्रथा परंपरा यांच्या गर्तेत न अडकता ललिता यांच्या उज्ज्व़ल भवितव्यासाठी आई बाबा खंबीरपणे उभे राहिले. अनेक आव्हाने, टिका टिप्पणीला सामोरे जात असतांना अनेक कठिण प्रसंगाचा सामना त्यांना करावा लागला. याकडे कानाडोळा करत मुलीला खेळण्यासाठी प्रोत्साहन देणे, हेच आपले ध्येय आई बाबांनी मानले. खऱ्या अर्थाने ललिता यांच्या क्रिडा प्रवासातील कणा आई बाबा ठरले आणि यानंतर मात्र मागे वळून न बघता ललिता मार्गक्रमण करत राहिल्या. ललिता यांना आपल्याला कोणत्या रस्त्याने प्रवासकरायचा, हा मार्ग तर सापडला, मात्र प्रवास खडतर होता. त्यांची आपल्या कामावरची निष्ठा, त्या प्रती असलेले प्रेम, समर्पणाची भावना लक्षात घेता, मेहनत करणाऱ्यास परमेश्वऱ नाकारत नाही, ही बाब ललितायांच्या मनावर कोरली गेली. त्याचे फलित म्हणून शिखर शिंगणापूरची स्पर्धा अनवाणी पायांनी जिंकली आणि त्यांचा आत्म़विश्वास दृढ झाला. येथूनच आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी कोणते क्षेत्र निवडावे यासाठीची त्यांची दिशा निश्चित झाली.
विविध राज्यस्तरीय, आतंरराष्ट्रीय स्पर्धांच्या माध्यमातून अव्वल क्रमांक गाठत नॅशनल फेडरेशन यांनी घेतलेल्या स्पर्धेत ललिता पहिल्या पाच क्रमांकात गणल्या गेल्या. या नंतर छत्तिसग़ड येथील स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. अशा प्रकारे विविध स्पर्धांत दैदिप्य़मान यश मिळवत पुणे येथील संपन्ऩ झालेल्या क्रॉस कंन्ट्री स्पर्धेत सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या. त्यांना मिळत असलेल्या बक्षिसांच्या रोख रकमेच्या माध्यमातून घरखर्च भागत असे. यामुळे पोषक आणि सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली.
ललिता यांच्या विविध स्तरावरील कामगिरीची दखल भारतीय ॲथेलेटिक्स महासंघ यांनी घेतली आणि प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली. चेन्ऩई येथे नॅशनल स्पर्धेच्या अनुषंगाने मैदानावर त्यांना दुखापत झाल्यामुळे दोन वर्षे त्यांना यापासून वंचित रहावे लागले; मात्र त्यांच्यातील महत्वाकांक्षी स्वभाव त्यांना स्वस्थ बसू देत नसल्यामुळे गावापासून राष्ट्रपतींपर्यंत त्यांच्या कामगिरीची प्रशंसा आणि कौतुकाचा वर्षाव त्यांच्यावर भरभरुन करण्यात आला. म्हणूनच जिद्द व महत्वकांक्षा असेल तर मार्गातील अडथळे आपोआपच यशाच्या पायघडया घालतात हे अनुभवांती ललिता यांनी सिध्द केले. सुवर्ण कन्या पि.टी. उषा नंतरची पहिलीच दीर्घपल्ल्याची धावपटू ठरत तब्बल बत्तीस वर्षानंतर ॲथेलेटिक्स़ ट्रॅक ॲन्ड फिल्ड़ ऑलंपिकची अंतिम फेरी यशस्वीरित्या ललिता यांनी गाठली. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इडस्ट्रीने आणि भारताच्या युवक कल्याण आणि क्रिडा मंत्रालयाने सन २०१५ सालचे क्रीडा पुरस्कार प्रदान करतांना ललिता बाबर यांचा उल्लेख ‘स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर' अशाप्रकारे केला. त्यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार केंद्र शासनाचा अर्जुन पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे नामांकित वृत्त समुह-प्रसारमाध्यमांद्वारे देखील विविध पुरस्कारांनी ललिता यांना गौरविण्यात आले. तसेच सन २०१६ च्या रिओ ऑलंपिकमध्ये ३००० मिटर ‘स्टेपल चेस' या क्षेत्रातील स्पर्धेच्या अंतिम फेरीत पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला म्हणून त्यांनी इतिहास रचला. आशियाई अजिंक्यपद आणि दक्षिण आशियाई खेळांमध्ये ही अनेक पदके जिंकली आहेत. ललिता यांचा क्रिडाक्षेत्रातील प्रवास देशभरातील इच्छूक धावपटूंना प्रेरणा देत आहे. एकेकाळी ललिता यांच्याकडे धावण्यासाठी बुट नव्हते. या क्षेत्रासाठीची अनुकूलता नसतांना किंवा उपलब्धी नसताना स्व़तःच्या कर्तृत्वाने पोषक वातावरण निर्माण करत सुवर्ण पदकांना गवसणी घालणे ही बाब खरोखरच मेहनत आणि नशिब यांची गोळाबेरीजच म्हणावी लागेल. त्याचबरोबर सदृढ मनाची मशागतदेखील याच वेळी झाली असावी. धावपटू म्हणून ललिता यांची कामगिरी अविस्मरणीय आहे. त्यांच्या कामगिरीचा राज्य शासन, केंद्र शासन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेत त्यांना शिवछत्रपती पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी क्रीडा पुरस्कार अशा एक नाही अनेक विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.
कोमल मनाची जडणघडण असलेल्या ललिता संवेदनशील आहेत. त्या प्रयत्नवादी असल्या तरी त्यांच्या हृदयाचा हळवा कोपरा तसाच ओला आहे. क्रीडा क्षेत्रात त्यांनी मिळविलेल्या नैपुण्याने यशाची शिखरे पादाक्रांत करत असतांना समाजातील विविध घटकांचे आशीर्वाद, शुभेच्छांची मांदियाळी या समवेत काम करत असते. याची जाणीव त्यांना आहे. म्हणुनच स्व़तःची क्रीडा प्रबोधिनी स्थापन करुन त्या माध्यमातूनसमाजातील गरजू आणि विविध घटकांना प्रशिक्षण देता यावे यासाठी त्या प्रयत्ऩशील असून त्यांच्या या कृतीतून माणुसकीचे प्रतिबिंब दिसते.
"मनाची कवाडं जेव्हा उघडी राहतात,
जगण्याची नवी वाट तेव्हाच दिसते
दुसऱ्याच्या दुःखाने जेव्हा हृदय कळवळते,
माणुसकीचा झरा तेव्हाच वाहतो”
ऑलिम्पिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहचणा-या भारतातील पहिल्या धावपटू ललिता बाबर यांच्या नावावर विविध राष्ट्रीय विक्रमांची नोंद आहे. अशा विक्रमी खेळाडू ललिता बाबर यांच्याजीवनावर आधारीत चित्रपट ललिता शिवाजी बाबर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ख्यातनाम अभिनेत्री अमृता खानविलकर ललिता बाबर यांची भूमिका साकारणार आहे. यास अनुसरुन तत्कालीन मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री मा.ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ललिता शिवाजी बाबर' या चित्रपटाच्या टिझरचे अनावरण करण्यात आले. सुवर्णपदक, कांस्य़पदक, रौप्यपदक यासह कौतुकाचा वर्षाव ललिता यांच्यावर सर्व स्तरावर होत असतांना त्यांच्या यशोशिखराची दखल घेत त्या शासनाच्या सेवेत उप जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत असून, शासकीय सेवेतदेखील त्यांनी आपली मातब्बऱी दाखवत त्या आत्म़विश्वासाने, एकाग्रतेने, आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन काम करता करता त्यांचे पाय मात्र जमिनीवरच आहेत. ख्यातनाम कवी विंदा करंदीकर म्हणतात की..
पाय असावे जमिनीवरती,
कवेत अंबर घेतांना हसू असावे ओठांवरती,
काळीज काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे,
आता या बेहत्तऱ
नजर रोखूनी नजरेमध्ये
आयुष्याला द्यावे उत्तर
- सौ. चित्रा बाविस्कर