पाऊले चालती पंढरीची वाट

वारीचे वर्णन बिगेस्ट वॉकिंग इव्हेंट म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे. वारीच्या चैतन्याच्या परावलीचा शब्द म्हणजे माऊली. सर्व वारकऱ्यांचा असा भाव आहे की आईप्रमाणे विठ्ठल माऊली सर्वांचा प्रेमाने सांभाळ करते. वारी म्हणजे शारीरिक, मानसिक, व अध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहे. ज्यांना वारीला जाता येत नाही ते वारीला जाऊन आलेल्या वारकऱ्यांच्या पाया पडतात. असे केल्याने त्यांना देखील वारीचे पुण्य मिळते असा भाव असतो. वारीची हीच महानता आहे.

आषाढी एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक संतांच्या पालख्या विविध ठिकाणाहून येतात. या पालख्यांबरोबर अनेक जण, लहान-मोठे, अबाल वृद्ध, स्त्री पुरुष चालत येतात. चालत येणाऱ्या माणसांच्या समूहाला दिंडी असे म्हणतात. जर वारीत सहभागी व्हायचं असेल तर दिंडीत नाव नोंदवावे लागते. वारीच्या मार्गाचे, विश्रांतीचे, भोजनाचे व कार्यक्रमाचे ठिकाण याचे पूर्व नियोजन केलेले असते त्याप्रमाणे वारी मार्गक्रमण करत असते. सर्व वारकरी भगवंताच्या अनुसंधानात असल्याने त्यांना ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची पर्वा नसते. माऊलीच्या गजर करत ते शेकडो किलोमीटर चालत असतात.

ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासे कळस. भागवत धर्माची स्थापना  संत ज्ञानेश्वर माऊलींनी केली व त्याची पूर्णता संत तुकाराम महाराजांनी केले म्हणूनच सर्व वारकरी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांना मानतात. वारकरी संप्रदायाचे एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व लहान थोर माणसांना माऊली म्हणून नमस्कार करतात.

स्वच्छ  पांढरे धोतर व सदरा, डोक्यावर टोपी, हातात टाळ चिपळ्या एकतारी, गळ्यात तुळशीची माळ,  कपाळावर गंधाचा टिळा असा पुरुषांचा वेष असतो तर स्त्रियापण अंगभर वस्त्र नेसून डोक्यावर तुळशी वृंदावन किंवा हातात  रुक्माईची मूर्ती घेतात. सर्वजण आनंदाने नाचत गात मजल दरमजल करीत पंढरपूरला पोहोचतात.

१६८५ साली तुकाराम महाराजांच्या तिसऱ्या मुलाने म्हणजेच नारायण महाराज यांनी पहिली वारी केली. तेव्हा ते आळंदीहून संत ज्ञानेश्वर यांच्या आणि देहूहुन संत तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन पंढरपूरला गेले होते. यावर्षी वारीचा ३४० वा पालखी सोहळा आहे. सातारा जिल्ह्यातील अरफळ गावचे देशमुख हैबत बाबा यांनी आजच्या पालखीची रचना केली आहे. त्यांनी लावलेल्या शिस्तीनुसार त्या काळाच्या २७ दिंड्या पालखीच्या पुढे चालतात आणि त्यानंतर अस्तित्वात आलेल्या दिंड्या पालखी मागे चालतात. आज एकूण २०० पेक्षा जास्त नोंदणी केलेल्या दिंड्या आहेत. दोन लाख भाविकांनी सुरू होणारा पालखी सोहळा आषाढी एकादशीला दहा लाख वारकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होतो.

 दिवसेंदिवस वारकऱ्यांची वाढत जाणारी संख्येमुळे एका पालखीत सर्वांचे नियोजन करणे अश्यक्य झाल्याने संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वेगवेगळ्या पालख्या देहू व आळंदी होऊन निघतात आणि वारीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांची भेट होते. वारीत महाराष्ट्राबरोबरच गोवा, गुजरात, कर्नाटक मधील दिंड्या सहभागी होतात.

धावा म्हणजे धावत जाणे असे मानले जाते की पंढरपूरला पायी चालत जात असताना संत तुकाराम महाराजांना वेळापूर येथील छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओळीने ते तेथून पंढरपूरपर्यंत धावत गेले याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूर पासून पंढरपूर पर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात.

वारीचे वर्णन बिगेस्ट वॉकिंग इव्हेंट म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे. वारीच्या चैतन्याच्या परावलीचा शब्द म्हणजे माऊली. सर्व वारकऱ्यांचा असा भाव आहे की आईप्रमाणे विठ्ठल माऊली सर्वांचा प्रेमाने सांभाळ करते.

अशी ही भक्तिमय, चैतन्यमय असणारी वारी ला देखील अनेक वाईट गोष्टींना किंवा अपप्रचाराला बळी पाडावे लागते. काही दिवसापूर्वी एका नेत्याने वारीमुळे ट्रॅफिक जाम होतो त्याची तक्रार केल्यावर प्रशासन लक्ष देत नाही; याउलट रस्त्यावर नमाज पडताना ट्राफिक जाम झाल्यावर तक्रार केल्यास ताबडतोब कारवाई केली जाते. त्यानंतर त्यांनी आपले विधान मागे घेतले. पुण्यासारख्या शहरात वारीवरील एका महिलेच्या अंगावर मासाचा तुकडा फेकला गेला. संतांच्या अभंगांचे चुकीचे दाखले देऊन लोकांची दिशाभूल केली जाते; तसेच वारीबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी लोकांना सांगितल्या जातात. वारी म्हणजे शारीरिक, मानसिक, व अध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहे. ज्यांना वारीला जाता येत नाही ते वारीला जाऊन आलेल्या वारकऱ्यांच्या पाया पडतात. असे केल्याने त्यांना देखील वारीचे पुण्य मिळते असा भाव असतो. वारीची हीच महानता आहे.
राम कृष्ण हरी.
-लीना गाडगीळ, पनवेल 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

समानतेची पताका उंचावणारी आषाढी वारी