पंचनामा

व्यसनाधीन व्यक्ती प्रसंगी आपल्या कुटुंबियांना, घरातील ज्येष्ठांना वेळप्रसंगी मारहाण करत असल्यामुळे अनेक कुटूंबे उध्वस्त झाली आहेत. अनेक माता-पित्यांना तरुण-मुलाची अंत्ययात्रा काढण्याचे दुःखही वाट्याला येते. समाजातील साधूसंत मंडळी, समाजसेवक, सुधारणावादी मंडळी आपापल्या परीने लोकांना समुपदेशनही करतात, पण व्यसनी मंडळींच्या डोक्यावरुन उपदेश जातो. व्यसनाची लत ज्यांना लागते, ती सुटणे वा सोडणे अशक्यप्राय गोष्ट बनते. दुष्परिणामाचे भान या लोकांना येते, तेव्हा गोष्ट आवाक्याबाहेर गेलेली असते.

गेल्या अनेक वर्षापासून केंद्र सरकार व राज्य सरकारे, आपापल्या राज्यात व्यसन मुक्तीसाठी विविध उपाययोजनासह समुपदेशनासारखे प्रयत्नही करत आहे. पण, तरीही देशात आणि जगात व्यसनी व्यवितंची संख्या वाढत आहे. केवळ वयस्कर व्यक्तीच नाही, तर मध्यमवयस्कासह तरुणाई व नाबालिक मुलंही व्यसनाच्या आहारी जाऊ लागली आहेत.

सध्या बहुतेक घरातील आणि समाजातील वातावरण किशोरवयीन मुलांना मादक पदार्थ मिळवण्याचे आणि वापर करण्याचे धडे मिळतात. नुकतेच तारुण्यात येणारी मुले प्रथम गोंधळात पडतात. कारण त्यांना शाळेत व घरात सांगितले जाते की, व्यसन (मग ते कोणतेही असो) शरीराला व मानसिकतेला धोकादायक असते. पण त्यांच्यासमोर व्यसनी व्यक्ती असे काही हाव-भाव करतात, नाचून नाचून धिंगाणा घालतात व आपण किती आनंदात व सुखात असल्याचा भाव दाखवतात. अशावेळी ही मुलंही उत्सुकतेपोटी नशापाणी करतात. त्यात त्यांना तात्पुरता आनंद मिळतो. तोच खरा आनंद मानून पुढे ही मंडळी नियमितपणे व्यसनाच्या आहारी जातात, त्यांना भल्या-बुऱ्याचे भान राहात नाही व पुढे कट्टर नशेखोर बनतात.

नशेखोर बनल्यावर त्यांचे लक्ष ना कामात असते, न कुठल्या गोष्टीत, थोरामोठ्यांशी त्यांची वागण्याची रितही बदलते आहे. व्यसनाची सुरुवात ‘बीडी' सिगारेटपासून सुरु होऊन, दारु व अंमली मादक पदार्थ, जसे आफिम, चरस, गांजा, मॅश, कोकेनसह इतर घातक पदार्थ सेवन केले जातात, ज्यामुळे व्यसनकर्त्याच्या मनाला तात्पुरती शांती व समाधान तर मिळते, पण त्यामुळे मोठ्या प्रमाणात शारीरिक हानी होते, त्यामुळे तरुण वयातील मुले/मुली वेळेच्या आधीच वयस्कर दिसू लागतात. ते विविध प्रकारच्या आजाराचे शिकारी होतात.

अलिकडे अंमली पदार्थाच्या सेनाचा ट्रेंड मुलांबरोबरच मुलींमध्येही तितकाच वाढत आहे. मादक पदार्थांच्या वापरांमुळे किशोरवयीन किंवा पौगंडावस्थेतील मुले एकापेक्षा जास्त पार्टनरबरोबर लैंगिक संबंध ठेवतात. हे अतिधोकादायक होऊ शकते.

अमेरिकेत दररोज ३००० नवीन मुले धुम्रपान करण्याच्या तुलनेत भारतात २० दशलक्ष मुले आणि दररोज सुमारे ५५००० मुले तंबाखूच्या व्यसनाच्या आहारी जातात. हे धोकादायक नाही का? पालक, भावंड आणि समवयस्कांच्या मादक पदार्थांच्या वापरामुळे मुलांमध्ये इच्छा आणि कुतूहलता निर्माण होतेच, त्याचबरोबर चित्रपट, टेलिव्हिजन, संगीत, व्हिडिओंमध्ये दाखवण्यात येणाऱ्या ख्यातनाम व्यवितच्या मॉडेलिंगद्वारे प्रगल्भ होते. लैंगिक किंवा शारीरिक शोषण एडीएचडीचा आजार कंडवट डिसॉर्डर (आचरण विकार) पालकांचे व्यसन, गुन्हेगारी प्रवृत्ती, स्व्रÀीनचा जास्त वापर, पॅथॉलॉजिकल इंटरनेट वापर, पालकांच्या समस्या जसे की, परवानगी देणारे, हुकूमशाही, दुर्लक्षित पालकत्व, कौटुंबिक समस्या आणि यासारख्या प्रतिकूल जीवनातील घटनांमुळे अंमली पदार्थाचा वापर लवकर सुरु होतांना दिसतो आहे, आणि तो जीवनभर टिकतानाही दिसतो आहे.

सध्या शाळा कॉलेजातील वातावरण जे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवते. जे विद्यार्थी शाळेत जात नाहीत. ज्यांच्या घरची आर्थिक स्थिती खूप चांगली असते, अशी मुले ड्रग्जच्या आहारी जाऊन नापास होतात, त्यांची व्यसनाधिनता अधिक होते, अशीच मुले चांगल्या व संस्कारी मुलांनाही आपल्या टोळीत सामील करुन घेण्याचा प्रयत्न करतात त्यात अनेक मुले आपसूकपणे अडकतात, काहीच मुले अशी असतात की ते स्वतःला या सर्वांपासून मैलो दूर ठेवण्यात यशस्वी होतात, आणि आपले करिअर बनवतात. आज देशात, समाजाने आणि सरकारने अशी स्थिती निर्माण केली आहे की, ज्यामुळे व्यसनाधिनतेत वाढ होऊ शकते.

आपल्या देशात एकतर व्यवसायिक शिक्षणाची कमतरता, दुसरे म्हणजे इतर घटकामध्ये मुलांना/मुलींना, छोटे-मोठे काम मिळून पोटापुरते उत्पन्न देण्याची साधने सरकारने आपल्या चुकीच्या धोरणाने कमी केली आहेत. ज्यामुळे बेरोजगारांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. तरुण/तरुणींना एकतर रोजगार मिळत नाहीत, वर घरच्यांसह समाजातील इतरांचे टोमणे ऐकून तरुणाईसह इतर मंडळी व्यसनाच्या जास्त जवळ जाऊ लागली आहे  आणि सरकार रोजगारांच्या संधी उपलब्ध करण्याऐवजी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी मद्यावर, बिडी, सिगारेट, तंबाखू यासारख्या पदार्थावरील टॅवसमध्ये वाढ करत आहे. पूर्वी स्वस्तात होणारे व्यसन सध्या खूपच महागले आहे. त्याचा परिणाम व्यसनाधिन लोकांवर न होता त्यांना सांभाळणाऱ्या लोकांवर होत आहे. मग त्यात आई-वडील असतील किंवा त्याची धर्मपत्नी असेल. अविवाहीत मुले आपली व्यसनाची गरज भागवण्यासाठी आई-वडिलांकडून पैसा घेतात, तर विवाहित पुरुष आपल्या पत्नीकडून पैशाची अपेक्षा ठेवतात. वेळप्रसंगी तीला मारहाण केली जाते, तिचा छळ केला जातो.

जेव्हा व्यसनी व्यक्तिंना घरातून पैसे मिळत नाहीत किंवा दिले जात नाहीत तेव्हा ही मंडळी चोऱ्या, मारामाऱ्या करुन पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात. प्रसंगी अशी माणसे खून करण्यासही मागेपुढे पहात नाहीत.

जगात विविध नावांने ‘दिन' साजरे करतात त्याच धर्तीवर २६ जून हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ आणि अवैध तस्करी विरोधी ‘दिन' म्हणून पाळला जातो. याचा उद्देश चांगला असला तरी परिणाम शुन्य आहे. वर्षाचे १२ महिने व्यसन पाळायचे आणि फवत १ दिवस विरोध दर्शवायचा हे कुटूंबाला समाजाला आणि देशाला फार घातक आहे. पण लक्ष कोण देणार? या व्यसनाधिनतेवर नजर ठेवण्यासाठी सरकारने अबकारी खाते कार्यरत केले आहे. पण खरोखरच या खात्याचे अधिकारी, मंत्री देशात चाललेल्या या जीवघेण्या व्यवसायावर नियंत्रण ठेवतात का? मंत्री, अधिकारी या व्यवसायातून स्वहित साधण्याच्याच कारवाया करताना दिसून येतात. दारु महागल्याने, लोक भेसळयुवत दारु पितात व आपला जीव गमावतात. तर ‘ड्रग्ज'ची तस्करी करणाऱ्या मंडळीचे धागेदोरे संबंधित अधिकारी वर्गासह संबंधीत मंत्रालयाशीही जोडलेले असतात. या मंडळींना कोण रुठे, कसे मेले यांच्याशी काहीही देणे-घेणे नाही. त्यांना फवत धन कमवायचे आहे.

सद्याची तरुणाई विविध कारणाने चिंताग्रस्त व तणावात वावरत असल्याने बरीचशी मंडळी, तणाव कमी करण्यासाठी दारु, सिगारेटच्या नादाला लागला आहे. खरं तर या वयातील मंडळी (पूर्वीची) शारीरिक व्यायाम व मैदानी खेळावर लक्ष देऊन आपली ताकद व मनस्थिती सुधारण्याकडे लक्ष देत असे, पण आता ते राहिलेले नाही. तणावग्रस्त स्थितीत व्यायाम वा शारीरिक कसरती तरी कशा करणार? परिणाम स्वरुप या पिढीतील मंडळी वयाच्या आधीच वृद्धत्वाकडे झुकू लागली आहे. वयोमान परत्वे माणसाला ५०-६० वर्षानंतर वृद्धत्व येते, पण सध्या पस्तीशी नंतर वृद्धत्व येऊ लागले आहे.

एका सर्वेनुसार, विविध व्यसनांचे शरीर, मनावर अत्यंत वाईट परिणाम होतात. ३६ व्या वर्षापासूनच शरीरावर वाईट परिणाम दिसू लागतात. वयाच्या पस्तिशीनंतर शरीराची नैसर्गिकरित्या आरोग्य सुधारण्याची क्षमता कमी होऊ लागते. त्यासाठी तरुणाईने किंवा व्यसनाधीन व्यक्तींनी स्वतःला यापासून दूर ठेवण्याची गरज आहे. काळजी म्हणून त्यांनी या सवयी लावूनच घेऊ नयेत. पण प्रत्यक्षात तसे होत नाही. कारण व्यसनाधीन मित्र मंडळी, व्यसनी ठरवण्यासाठीच असतात.

व्यसनाधीन व्यक्ती प्रसंगी आपल्या बायकोसह मातापित्याला पैशासाठी छळत असतात. वेळप्रसंगी मारहाणही करतात, त्यामुळे अनेक कुटूंबे उध्वस्त झाली आहेत. अनेक माता-पित्यांना तरुण-मुलाची अंत्ययात्रा काढण्याचे दुःखही वाट्याला येते. समाजातील साधू संत मंडळी, समाजसेवक, सुधारणावादी मंडळी आपापल्या परीने लोकांना समुपदेशनही करतात, पण व्यसनी मंडळींच्या डोक्यावरुन उपदेश जातो. व्यसनाची लत ज्यांना लागते, ती सुटणे वा सोडणे अशवयप्राय गोष्ट आहे. काही लोकांना या गोष्टीच्या दुष्परिणामाचे भान येते, तेव्हा गोष्ट आवावयाबाहेर गेलेली असते.

परिणामस्वरुप व्यसनी व्यक्तिंना आपले आयुष्य वेळे आधीच गमवावे लागते, तरीही दिवसें-दिवस व्यसनी व्यक्तिंचे प्रमाण सतत वाढत आहे. त्यामुळे अंमली पदार्थ विकणाऱ्यांचे फावत आहे. ते धनदांडगे तर होतातच, पण, समाजाला रसा-तळाला नेतात. त्यामुळे देशाच्या प्रगतीतही अडथळा निर्माण होत आहे. आज दुध डेअरीपेक्षा, मद्याच्या दुकानासमोर मोठ्या रांगा दिसतात. यावर कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे. - भिमराव गांधले 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राचा लोकोत्सव!