या उपायांनी रेल्वे प्रवाशांना दिलासा देता येऊ शकेल

रेल्वे लोकल ही वेळेत चालवणं, त्याचा मेंटेनन्स वेळेत करणं गरजेचे आहे, मुंबई उपनगरीय रेल्वेला एक दर्जा देणं वेगळं बजेट असणं आणि विशेष लक्ष या मुंबई रेल्वेकडे देणे गरजेचे आहे, लोकल ट्रेनचे दरवाजे बंद करून प्रवासी संख्या ही कमी होणारी नाहीये. आत्ताच एसीचे भरमसाठ तिकीट असताना जर जनरल ट्रेनचे दरवाजे बंद केले तर कदाचित हे काही अंशी घुसमट करणारे ठरणार आहे; त्याऐवजी खाली दिलेले उपाय केल्यास रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळू शकेल..

 मुंबईची रेल्वे ही सर्वसामान्य माणसाची लाईफ लाईन आहे, सर्वात वेगवान स्वस्त व परवडणारी अशी वाहतूक व्यवस्था म्हणजेच रेल्वे,  मुंबई आणि उपनगरात खोपोली, कर्जत, पनवेल, कसारा,आसनगाव, वसई, विरार पासून चाकरमानी हा आपल्या उदरनिर्वाहासाठी मुंबई उपनगरात दररोज प्रवास करत असतो; त्यातच स्थानिक तसेच बाहेरून येणारा प्रचंड लोंढा हा सर्व मुंबई उपनगरात कामानिमित्त रेल्वेने प्रवास करत असतो अशावेळी भारतातील ऐतिहासिक रेल्वे जी १७२  वर्षांपूर्वी चालू झालेली आजही ती अपुरीच आहे, मुंबई ही रेल्वेला सगळ्यात जास्त इन्कम देणारी देणारी भारतातील आर्थिक नाडी आहे; तरीही मुंबई रेल्वेकडे दुर्लक्ष केलं जातं. दररोज रेल्वेच्या अनेक समस्या आपल्याला पाहायला मिळतात...जसे की ओव्हरहेड वायर तुटणे, रेल्वे ट्रॅकला तडा जाणे, सिग्नल यंत्रणा बंद पडणे, पावसामुळे ट्रॅक्ट मध्ये पाणी भरणे अशा अनेक कारणाने लोकल ट्रेन या उशिराने धावत असतात. वेस्टर्न लाईनला दर तीन मिनिटांनी गाडी आहे. परंतु सेंट्रल आणि हार्बरला पाच ते दहा मिनिटांच्या अंतराने गाडी आहे. त्यामुळे जर दहा मिनिटे गाडी लेट झाली तर दोन गाड्यांची गर्दी प्लॅटफॉर्म फुल करून टाकते आणि गाडीत चढण्यासाठी, वेळेवर पोहोचण्यासाठी, ऑफिसचा लेट मार्क टाळण्यासाठी, प्रत्येकाची धावपळ सुरू होते. दररोज लेटमार्क  घेऊन पगार कापला जातो आणि त्याच्यामुळे जो तो आपला जीव मुठीत धरून त्या रेल्वेच्या डब्यात चढण्यासाठी प्रयत्न करत असतो, सर्वप्रथम रेल्वे प्रशासनाने हे लक्षात घ्यायला हवं त्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रेल्वे लोकल ही वेळेत चालवणं, त्याचा मेंटेनन्स वेळेत करणं गरजेचे आहे, मुंबई उपनगरीय रेल्वेला एक दर्जा देणं वेगळं बजेट असणं आणि विशेष लक्ष या मुंबई रेल्वेकडे देणे गरजेचे आहे, लोकल ट्रेनचे दरवाजे बंद करून प्रवासी संख्या ही कमी होणारी नाहीये. आत्ताच एसीचे भरमसाठ तिकीट असताना जर जनरल ट्रेनचे दरवाजे बंद केले तर कदाचित हे काही अंशी घुसमट करणार आहे त्या ऐवजी उपाय म्हणून

 १) दर तीन मिनिटांनी एक ट्रेन चालवायला हव्यात.

२)कामकाजाच्या वेळा या बदलायला हव्यात गव्हर्मेंट सेक्टर ची कामकाजाची वेळ स. ११ वाजताची आणि प्रायव्हेट सेक्टरची कामकाजाची वेळ स.९ची  किंवा दुपारी १ ची असायला हवी या दोघांच्या वेळात जर तीन तासापेक्षा जास्त अंतर असेल तर ही गर्दी नियंत्रणात येईल.

३) कॉर्पोरेट ऑफिस आहेत ते जर बघितले तर सीएसटी - चर्चगेट बीकेसी आणि अंधेरी या परिसरात सर्वात जास्त आहेत जर ते ऑफिस ठाणे किंवा डोंबिवली परिसराच्या पुढे हलवले तसेच बेलापूर पनवेल बाजूला किंवा बोरिवली वसई साईडला जर हलवले तर नक्कीच गर्दी ही विभागली जाईल आणि काहीसा प्रवाशांना दिलासा मिळेल.

४) एसी लोकल ही सर्वांना न परवडणारी आहे म्हणून रेल्वे प्रशासनाने जनरल रेल्वे आहे त्याच तिकीट दरामध्ये जर सर्व लोकल गाड्या एसी जर दिल्या तर दरवाजे बंद होतील आणि सर्वांना दिलासा मिळेल. 

५) रेल्वे सेवेवर प्रचंड तणाव येत असताना जर गर्दीवर नियंत्रण मिळवायचे असेल तर रेल्वेलगत समांतर रस्ता असायला हवा.

 ६) बदलापूरपासून ते सीएसटीपर्यंत बेस्ट बसेस या दर अर्धा तासांनी असायला हव्यात.

७) वृद्ध वयस्कर गरोदर माता-भगिनी व विद्यार्थी यांना रेल्वे डब्यात सकाळच्या सत्रात चढणे शक्य नाही, अशावेळी स्वतंत्र डब्बा असायला पाहिजे.

८) संपूर्ण मुंबईत बस, रेल्वे व मोनो रेल्वे, मेट्रो रेल्वे यांचं एक संयुक्त असं तिकीट असावं; जेणेकरून एकाच तिकिटांमध्ये सर्व वाहतूकमध्ये त्यांना प्रवास करता येईल अशी जर व्यवस्था केली तर थोड्या प्रमाणात गर्दीवर नियंत्रण ठेवता येईल.

९) परप्रांतीय हे मोठ्या प्रमाणात मुंबई उपनगरात कामासाठी येत असतात जर त्या त्या राज्यामध्ये त्या सरकारने तिथे रोजगार कसा निर्मिती करता येईल यासाठी प्रयत्न करावेत जेणेकरून सगळे मुंबईत येणार नाहीत व गर्दीवर नियंत्रण मिळेल.

१०) कर्जत कसारा या मार्गावर तिसऱ्या चौथ्या लाईनचे काम अजूनही पूर्ण झालेले नाहीये कित्येक वर्ष ते रखडलेल आहे त्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे कित्येक वेळा लांब पल्ल्याच्या गाड्या वेळेत सोडण्याच्या नादामध्ये आपल्याकडे लोकल ट्रेन ह्या उशिराने धावतात त्यांच्यासाठी स्वतंत्र लाईन ही असायला हवी जेणेकरून ट्रेन लेट होणार नाही,

११)सर्व लोकल ट्रेन या १५ डबा करण्यात याव्यात त्यासाठी सर्व स्थानकांची लांबी ही वाढवण्यात यावी,

१२)सुरक्षेसाठी GRP व RPF यांची प्लॅटफॉर्म वर वर्दळ असावी.

१३) सध्या रॅक आणि ट्रॅक वाढवणे सर्वात महत्त्वाचे आहे दररोज मुंबई उपनगरात आठ ते दहा प्रवासी मृत्युमुखी पडतात हे अपघात जर रोखायचे असतील तर लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे जीव वाचवायचे असतील तर वरील मुद्द्यांचा विचार व्हावा व लटकणाऱ्या प्रवासांची जीव कसा वाचेल यासाठी रेल्वे प्रशासनाने,लोकप्रतिनिधी यांनी केंद्र व राज्य यांचा समन्वय साधून यावर मार्ग काढावा एवढी मुंबई उपनगरातल्या प्रवाशांची माफक अपेक्षा आहे.

- सुधाकर श्रीराम पतंगराव, अध्यक्ष कोकण रेल्वे प्रवासी संस्था,  मुंबई. 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

फ्लाईंग शीख मिल्खा सिंग!