महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
जीवन आणि विराम चिन्हे
कसंय जीवनाची प्रत्येक टप्याची सुरूवात एक विरामचिन्हासारखीच असते. जसे की एखादी नविन योजना सुरू करणे अथवा नविन संबंध जोडणे, करिअरमध्येे बदल करणे वगैरे.
आपल्या जीवनात अनेक प्रश्नही उद्भवत असतात !जे आपल्याला विचार करायला भाग पाडतात,तर (?) प्रश्न चिन्ह हे त्या विचारांना दर्शावित असते.असे तुम्हाला नाही का पटत ? तर आयुष्यात आलेले आनंद , दुःख किंवा आश्चर्य चकीत होणारे क्षण आपण उरवाचक म्हणजेच (!) आपण दर्शवीत असतोच ना ! अनेक टप्यांवर किंवा काही तरी पुर्ण झाल्यावर आपण पुर्णाविराम (.) लावतोच की!
आपल्या या ”जीवन प्रवासात आपल्या सोबत अनेक जण आपल्या सोबत असतात, पण काहींना आपण काळानुरूप, गरजेनुसार स्वल्पविरामा द्वारे (,) अर्धविराम द्वारे (;) वेगळे ही करत असतोच की ! तसे पाहू जाता, आपले जीवन व विरामचिन्हे हे एकमेकांशी जोडलेली तर आहेतच आणि म्हणूनच कवीकल्पनेने असे म्हणावेसे वाटते...
काही तुमची
काही माझी
आयुष्याच्या
लेखामधली
विरामचिन्हे.
जिथे न सुचले
शब्द समर्पक
अथवा होते
रुतले, फसले.
जिथे मनाचे
विचारचक्रच..
तिथे मांडली
आहे काही
आयुष्याच्या
लेखामधली
विरामचिन्हे
अवखळ, अल्लड
हळवी, कातर
उदासीन वा
अनवट, अवघड
फक्त निरर्थक
असती काही
आयुष्याच्या
लेखामधली
विरामचिन्हे.. ..
विरामचिन्हे
वगळुन बघता
आयुष्याला
व्यापुन उरते
अर्थहीनता
आणि व्यर्थता
तेव्हा मग मी
पुन्हा एकदा
पेरत बसतो
मीच जी कधी
अभावितपणे
वेचली जरा..
आणि लपवली
होती काही
आयुष्याच्या
लेखामधली
विरामचिन्हे..
- अनिल देशपांडे