आ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते ‘दारावे गांव प्रीमियर लीग'चे उद्‌घाटन

नेरुळ : दारावे गावातील समाजसेवक महेंद्र नाईक आणि समाजसेविका रविता नाईक यांच्या सौजन्याने दारावे गांव येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे ‘दारावे गांव प्रीमियर लीग'चे आयोजन करण्यात आले आहे. ‘दारावे गांव प्रीमियर लीग'चे उद्‌घाटन ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. तसेच ठाणे येथील दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथे पार पडलेल्या ‘इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन-२' या स्पर्धेमध्ये दारावे गावातील अष्टपैलू खेळाडू विकी भोईर याची सर्वोकृष्ट महागडा खेळाडू म्हणून निवड झाली होती. त्याबद्दल आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते विकी भोईर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

राजकारणात कधी कधी क्रिकेट खेळणे मनाला आनंद देणारा असतो. ज्यावेळी खेळाडू चौकार, षटकार मारतो किंवा एखादी विकेट  घेतो त्यावेळी लोकांमध्ये आनंद वेगळा असतो. प्रेक्षकांकडून टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. आज मी देखील ‘दारावे गांव प्रीमियर लीग'च्या उद्‌घाटनानिमित्त क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे म्हणाले.

याप्रसंगी पोलीस पाटील दिलीप पाटील, माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, जयवंत तांडेल, सत्यवान पाटील, गणेश नाईक, अनंता नाईक, महादेव म्हात्रे तसेच दारावे गावातील नागरिक आणि मोठ्या संख्येने युवा खेळाडू उपस्थित होते.

पक्षविरोधी काम न करता संघटना वाढवा...
नुकतेच ‘तुतारी'मधून ‘भाजपा'मध्ये पुन्हा पक्षप्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांची आता घरवापसी झालीच आहे. ‘कल कां भूला वापस दुबारा घरं मे आता है तो उसे भुला नहीं कहते' या उवतीनुसार ‘भाजपा'ने पुन्हा एकदा त्यांना संधी दिली आहे. आता त्यांनी मिळालेल्या संधीचा चांगला वापर करावा. पक्षविरोधी कामे करण्यासाठी संधीचा वापर न करता पक्ष संघटना वाढवावी, एवढंच माझे म्हणणे आहे, अशा शब्दात आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्याविरोधात आरोपांची राळ उठवविलेल्या लोकप्रतिनिधींच्या पुन्हा भाजपा प्रवेशाबाबत प्रतिक्रिया देताना टोला लगावला. 

Read Previous

6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान नवी मुंबई कोपरखैरणे येथे रंगणार एनएमपीएलचा थरार

Read Next

नमुंमपा चषक ४०प्लस क्रिकेट स्पर्धेत दिवा कोळीवाडा, युनायटेड स्पोर्टस्‌ विजयी