‘पनवेल'मध्ये लवकरच क्रिकेट प्रशिक्षण अकादमी -दिलीप वेंगसरकर

पनवेल : पनवेलमध्ये लवकरच क्रिकेट प्रशिक्षण अकादमी सुरु होणार आहे. या अकादमी मधून पनवेल मधील खेळाडू आयपीएल तसेच भारतीय संघामध्ये खेळतील, असा विश्वास भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांनी येथे व्यक्त केला. दरम्यान, सदरचे प्रशिक्षण विनामूल्य असणार असून आमदार प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर यांच्या मेहनतीमुळे शक्य झाले आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी आणि देशाचा झालेला विकास याबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात ‘नमो चषक' स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.  त्या अनुषंगाने आ. प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य क्रीडा-सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पनवेल विधानसभा मतदार संघात पार पडलेल्या ‘नमो चषक स्पर्धा'मध्ये १.१३ लाख स्पर्धकांनी सहभाग घेऊन महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकाविला आहे. या ‘महोत्सव'चा पारितोषिक वितरण समारंभ पनवेल मधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात २ मार्च रोजी पार पडला. ‘महोत्सव'मध्ये नमो खारघर मॅरेथॉन, नमो खारघर हिल ट्रेकींग, नमो सायक्लोथॉन, दिवस-रात्र टेनिस क्रिकेट, चित्रकला, वक्तृत्व, फुटबॉल, कुस्ती, कबड्डी, बुध्दीबळ, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, ज्युडो, किक बॉक्सिंग, कॅरम, तायक्वांदो, खो-खो, रस्सीखेच, रांगोळी, गायन, नृत्य, अशा २१ प्रकारात स्पर्धा झाल्या. त्यानुसार सहभागी स्पर्धकांमधून २,४२० विजेत्यांना रोख १३.६७ रुपये तसेच सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याच कार्यक्रमात कर्नल दिलीप वेंगसरकर बोलत होते.

मेहनतीला पर्याय नाही. त्यामुळे शॉर्टकट घेऊ नका, तरच मेहनतीचे फळ गोड मिळेल, असा सल्लाही वेंगसरकर यांनी नवोदित खेळाडूंना दिला. माझी सदर चौथी ॲकॅडमी आहे. यापूर्वीच्या ॲकॅडमीतून दर्जेदार क्रिकेटपटू तयार होऊन आयपीएल तसेच इतर स्पर्धेमध्ये खेळत आहेत. त्याचप्रमाणे ‘पनवेल'च्या ॲकॅडमी मध्येही खेळाडुला प्रशिक्षित प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात येईल, आणि ते सुध्दा विनामूल्य. यावेळी ‘नमो चषक स्पर्धा'च्या भव्य आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक करतानाच एका स्पर्धेत एक लाखाहून अधिक स्पर्धक सहभाग घेतात, ते माझ्या ऐकवात पण नाही. अप्रतिम असा महोत्सव झाला असल्याची पोचपावती दिलीप वेंगसरकर यांनी आयोजकांना दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनसमर्पित कार्याला अभिवादन करण्यासाठी तसेच नवोदित खेळाडू आणि कलाकारांना वाव मिळण्यासाठी ‘नमो चषक क्रीडा-सांस्कृतिक महोत्सव'चे आयोजन करण्यात आले. पनवेल विधानसभा मतदार संघात झालेल्या या महोत्सवात स्पर्धकांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला. त्यामुळे राज्यात २८८ असलेल्या विधानसभा मतदार संघात ‘पनवेले'ने चौथा क्रमांक पटकाविला आहे. ‘महोत्सव'ला मिळालेला सहभाग प्रेरणादायी असल्याचे सांगत खेळाडू आणि कलाकारांच्या पाठिशी यापुढेही कायम राहण्याचे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिले.

यावेळी ‘भाजपा'चे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल विधानसभा ‘नमो चषक महोत्सव'चे प्रमुख संयोजक परेश ठाकूर यांनीही आपले मनोगर व्यवत केले. ‘युवा मोर्चा'चे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी स्पर्धेचा आढावा मांडला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन वैभव बुवा आणि धनश्री यांनी केले.

याप्रसंगी ‘भाजपा'चे शहर अध्यक्ष अनिल भगत, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल घरत, ज्येष्ठ कार्यकर्ते सी. सी. भगत, ‘रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन'चे अध्यक्ष डॉ. अरुणकुमार भगत, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, अमर पाटील, विकास घरत, नरेश ठाकूर, सुशीला घरत, मोनिका महानवर, भूपेंद्र पाटील, ‘ओबीसी सेल'चे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, डिजीटल क्रिएटर यशश्री राव, डायनी पंडीत, शिवानी कांबळे, पालवी कदम, भाग्यश्री, तायक्वांदोपटू सुभाष पाटील, डॉ. संतोष आगलावे, प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे, साधना पवार, क्रीडा सेलचे जिल्हाध्यक्ष विनोद नाईक, ॲड. चेतन जाधव, अभिषेक पटवर्धन, विद्या तामखेडे, मंदार पनवेलकर, सचिन चौधरी, अभिषेक भोपी, दिनेश खानावकर, रोहित जगताप, आनंद ढवळे, सुमित झुंझारराव, तेजस जाधव, नितेश पाटील, गौरव नाईक, देवांशू प्रभाळे, कोमल कोळी यांच्यासह पदाधिकारी, खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read Previous

6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान नवी मुंबई कोपरखैरणे येथे रंगणार एनएमपीएलचा थरार