लोकसंख्येला घाला आळा
शासनाने इच्छा मरणाची व्यवस्था कायद्याने सुरू करावी. नाहीतरी भारत देशाची लोकसंख्या १५० कोटी झाली आहे. वृद्ध माणसांचे वाचलेले अन्न इतरांना उपयोगी येईल. लोकसंख्या कमी होण्यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलावी. तरुणांना लग्नानंतर दोन मुले झाल्यावर ऑपरेशन करण्याचा सक्त कायदा करावा. त्याहुन अधिक झालेल्या मुलांना शाळेत खाजगी/सरकारी शाळेत प्रवेश देऊ नये. मुला-मुलींना अठरा वर्षानंतर खाजगी अथवा सरकारी नोकरी न मिळण्याची कायद्याने व्यवस्था करावी.
मुलांना शाळेत प्रवेश नाही म्हटले की बरोबर आई-वडील मुलांना दोन मुलांच्यावर जन्म देणार नाहीत. त्यामुळे लोकसंख्या कमी होण्यास मदत होईल. मुलांना शिक्षण नाही म्हटले तर मुलांचे भवितव्य काय, अशी चिंता पालकांना लागेल.
दोन मुलांनंतर मुला-मुलींची नावे रेशन कार्ड वर टाकू नये . रेशन कार्डवर मुला मुलींची नावे नाही; तर शाळेत प्रवेश मिळणार नाही. लोकसंख्येत भारत देश जगात नंबर एक आहे; पण ते उपयोगाचे नाही. लोकसंख्या वाढीमुळे तरुणांना रोजगारीचा प्रश्न उपलब्ध होतो. लोकसंख्या वाढीमुळे आर्र्थिक प्रश्न वाढतात. कमी लोकसंख्या असेल तर भारत देश चीन, रशिया, अमेरिका, जपान आणि इतर देशांपेक्षा जगात एक नंबर होईल, जगात सर्वश्रेष्ठ भारत होईल. भारत देशाने खूप प्रगती केलेली आहे, ती कमी लोकसंख्या असती तर अजून प्रगती झाली असती. भारत देशाने विज्ञानात आताही खूप प्रगती केली आहे, ती यापेक्षा अधिक झाली असती.
लोकसंख्या कमी झाली तर बेरोजगारीचा प्रश्न सुटेल. त्यांना जिवंत ठेवून काय उपयोग? देशाला केवळ ओझे. सर्व देशाच्या जातीच्या धर्माच्या पंथाच्या लोकांना एकच नियम लागू करावा. कुटुंबाची प्रगती तर देशाची प्रगती. - सुभाष जैन