गुन्हेगारी रोखण्यात नवी मुंबई पोलिसांना यश
गुन्हे उघडकिस आणण्याच्या प्रमाणात 3 टक्क्यांनी वाढ
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस दलातील पोलिसांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करुन विविध उपक्रम राबविण्यात आल्याने शहरातील ग्न्हेगारीत चांगलीच घट झाली आहे. 2024 या वर्षामध्ये खुन, खुनाचा प्रयत्न, दुखापत, मालमत्ता विषयक, महिला अत्याचार यासारख्या गुह्यात घट झाली असली तरी सायबर गुह्यांचा आलेख चढताच राहिला आहे. गत वर्षात वेगवेगळे उपक्रम राबवून पोलिसांच्या कार्यपद्धतीत सुधारणा केली, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी एकही घटना घडली नाही. 2025 मध्ये सुद्धा अशाच पद्धतीने कार्यपद्धती ठेवून नागरीकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
या वार्षिक पत्रकार परिषदेप्रसंगी सहपोलीस आयुक्त संजय येनपुरे, नवी मुंबईचे अपर पोलिस आयुक्त दीपक साकोरे, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमित काळे, परिमंडळ-2चे पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते, मुख्यालय उपायुक्त संजयकुमार पाटील, वाहतुक विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे, विशेष शाखेच्या उपायुक्त रश्मि नांदेडकर व इतर अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 2024 मध्ये शरीराविरुद्धच्या एकुण 797 दाखल गुह्यापैकी 785 (98टक्के) उघडकीस आले आहेत. तसेच मालमत्ता विषयक दाखल 2250 गुह्यापैकी 1176 गुन्हे (52 टक्के) गुन्हे उघडकीस आले आहेत. सन 2024 मध्ये आर्थिक फसवणूकिचे 823 गुन्हे घडले असून त्यापैकी 421 गुन्हे (51टक्के) उघडकिस आले आहेत. तसेच महिलांविषयक दाखल 626 ग्ह्यांपैकी 616 (98टक्के) गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच इतर 1510 गुह्यांपैकी 1317 (87 टक्के) गुन्हे त्याचप्रमाणे अंमलबजावणीचे 1363 दाखल गुह्यांपैकी 1362 गुन्हे (100टक्के) गुन्हे उघडकीस आले आहेत. या एकुण आकडेवारीवरुन नवी मुंबई पोलिसांची 2023 वर्षाच्या तुलनेत 2024 मध्ये गुन्हे उघडकिस आणण्याच्या प्रमाणात 3 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांचा जनजागृतीवर भर
सायबर गुह्यात दिवसेंदिवस वाढ होत असून सन 2024 या वर्षामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकुण 436 सायबर गुन्हे (आयटी ऍक्ट) दाखल झाले असून यात तब्बल 150.97 कोटी रुपयांची सायबर ग्न्हेगारांनी फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. सायबर पोलिसांनी त्यापैकी फक्त 79 गुन्हे उघडकीस आणुन 41.32 कोटीची रक्कम गोठविली आहे. तसेच त्यातील 6.92 कोटी रुपयांची रक्कम फसवणुक झालेल्या तक्रारदारांना परत दिली आहे. वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी नवी gमुंबई पोलिसांनी सायबर ग्ह्यांसंर्भात जनजागृती करण्यासाठी डीजीटल माध्यमातून नाविण्यपुर्ण उपक्रमांना सुरुवात केली आहे.
महिलांविषयक घटनांमध्ये घट
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सन 2024 मध्ये महिलांविषयक गुह्यांमध्ये 104 गुह्यांची घट झाल्याचे दिसून येत आहे. बलात्कार-180, विनयभंग-222, विनयभंगाचा प्रयत्न- 53, छळवणुक-152, महिला आत्महत्या -19 असे एकूण 626 गुन्हे दाखल झाले आहेत. सन 2023 मध्ये महिलांविषयक एकूण 730 गुन्हे दाखल झाले होते.
नवी मुंबईत अमली पदार्थाच्या कारवाईत वाढ
सन 2023 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दाखल असलेल्या अमली पदार्थाच्या दाखल गुह्यांच्या तुलनेत 2024 मध्ये 171 ने अंमली पदार्थ विरोधी कारवाईमध्ये वाढ झाली आहे. 2024 मध्ये अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 113 गुन्हे दाखल झाले असून या कारवायांमध्ये एकूण 150 भारतीय नागरीक तसेच 56 परदेशी नागरीक असे एकुण 206 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ मुक्त नवी मुंबई या अभियानांतर्गत नवी मुंबई पोलिसांनी गत वर्षभरामध्ये एकाचवेळी पाच ठिकाणी कारवाई करुन 13 आफ्रिकन नागरिकांची धरपकड करुन त्यांच्याकडुन तब्बल 11.86 कोटी रुपये किंमतीचे अमली पदार्थ जफ्त केले आहे.
दोषसिध्दीच्या प्रमाणात वाढ
सन 2023 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील दोषसिध्दीचे प्रमाण 36 टक्के होते. मात्र नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या एम पोलीस मधील यथार्थ, ई पैरवी व आय बाईकचा प्रभावी वापर केल्यामुळे सन 2024 मध्ये दोषसिध्दीच्या प्रमाणात 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे. उत्कृष्ट दोषसिध्दीमध्ये खारघर पोलिस ठाण्यातील हत्या प्रकणातील आरोपीला ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा, तसेच रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलात्कार आणि पोक्सोतील आरोपीला ठोठावण्यात आलेली 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा. कळंबोलीतील बलात्कार आणि पोक्सो ग्ह्यातील आरोपीला ठोठावण्यात आलेल्या आजन्म कारावासाची शिक्षा, या प्रमुख गुह्यांचा समावेश आहे.
वाहतुक विभागाच्या कारवाईत वाढ, अपघाती मृत्यूमध्ये वाढ
सन 2024 मध्ये नवी मुंबई वाहतुक पोलिसांनी मोटार वाहन कायद्यांतर्गत 8 लाख 87 हजार 770 केसेस दाखल करुन तब्बल 18 कोटी 19 लाख इतका दंड वसूल केला आहे. त्याशिवाय लोकअदालत मध्ये दाखल केसेसच्या माध्यमातून 13 कोटी 81 लाखांचा दंड देखील वाहतुक पोलिसांनी वसूल केला आहे. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमाच्या उल्लंघन करणाऱया वाहन चालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून वॉच ठेवून तब्बल 1.42 लाख अधिक केसेस केल्या आहेत. त्यामुळे सन 2024 मध्ये नवी मुंबईच्या हद्दीत रस्ते अपघातातील मृत्यूचे 287 गुन्हे दाखल झाले आहेत. सन 2023 च्या तुलनेत अपघातातील मृत्यूच्या घटनेत 44 ने वाढ झाली आहे.