ठाणे पोलीस आयुक्तालयात चोरी, घरफोडी, वाहन चोरीची भरमार

ठाणे : चोरी घरफोडी, जबरी चोरी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांची भरमार सन २०२४ मध्ये झाल्याचे विविध पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यावरुन स्पष्ट होत आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चोरट्यंनी धुमाकूळ घातलेला आहे. मागील वर्षभरात एकूण ३५६२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे. तर १४७३ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलेले आहे. तर सदर गुन्ह्यांमध्ये ठाणे पोलिसांनी १४२८ आरोपींना अटक केली आहे. या विविध चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी चोरट्यांकडून १० कोटी ४२ लाख ८७ हजार ९९ रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ५ परिमंडळ अंतर्गत ३३ पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या घरफोडी, जबरी चोरी, इतर भुरट्या आणि वाहन चोरीची मोठी भरमार असून हजारोच्या घरात गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे. तर १० कोटीच्या आसपास मुद्देमालाची वसुली करण्यात पोलिसांना यश लाभलेले आहे. तर दीड हजाराच्या आसपास गुन्हेगारांना कारागृहाच्या रस्ता दाखविण्यात आलेला आहे. तसेच १४७३ गुन्ह्यांची उकल पोलिसांकडून करण्यात आली असून चोरीच्या गुन्ह्यात सरासरी ठाणे पोलिसांची गुन्हे उघड करण्याची टक्केवारी ५० टक्के एवढी असल्याचे स्पष्ट झाले आहे  ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बहुतांश ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले असून या कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिसांना गुन्हेगारांची ओळख होण्यास मदत होते. तर तांत्रिक अभ्यासामुळे पोलीस गुन्हेगारापर्यंत पोहोचत आहेत.

सन २०२४ वर्षातील गुन्ह्यांचा तपशीलः
प्रकार दाखल उघड अटक टक्केवारी गेला मुद्देमाल हस्तगत मुद्देमाल
घरफोडी ७८० ३१५ २३५ ४० २०.२२ कोटी २.९१ कोटी
जबरी चोरी २४६ १६५ २७५ ६७ १.५६ कोटी ६०.७६ लाख
भुरट्या चोऱ्या ११८५ ४९० ४०२ ४१ १४.४६ कोटी ३.७४ कोटी
वाहन चोरी १३५१ ५०३ ५१६ ३७ ८.१२ कोटी ३.१६ कोटी
एकूण ३५६२ १४७३ १४२८ १८५ ३६.२५ कोटी १०.४२ कोटी

चोरीचा मुद्देमाल, वाहने फिर्यादींकडे परत...
ठाणे पोलीस दलाकडून वर्षातून अनेकवेळा वेगवेगळ्या कारवाई करून जप्त केलेला सोन्या-चांदीचा मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना संपर्क करुन परत केला जातो. तर चोरीला गेलेली वाहने पोलिसांनी जप्त केल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ती वाहन मालकांना सोपविण्यात येतात. तर जे मालक वाहनावर दावाच करीत नाहीत, अशी वाहने बेवारस म्हणून ठेवण्यात येतात. ठाणे पोलिसांनी वाहन चोरीत ३ कोटी १६ लाख ७३ हजार ५०० रुपयांची वाहने जप्त केली. यात मोटारसायकल ९९४, तीन चाकी वाहने २३१, चार चाकी ८५, अवजड वाहने ३३५ अशी एकूण १३४५ वाहने चोरट्यांच्या तावडीतून हस्तगत करण्यात आली आहेत.

बेपत्ता वाहनाचे होते काय?
चोरट्यांनी चोरलेली वाहने चोरटे नंबरप्लेट बदलून किंवा नष्ट झालेल्या गाडीच्या नंबर प्लेट लावून ग्रामीण भागात वापरतात. चोरट्यांनी चोरलेल्या चारचाकी आणि अवजड वाहने गुन्हेगारांना पोलिसांच्या जाळ्यात अडकण्यासाठी पुरेपूर असल्याने चोरटे अशी वाहने बाजारात वाहनाचे सुट्टे पार्ट करुन त्याची विक्री करतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

घरफोडी चोरी करुन नवी मुंबईत धुमाकुळ; सराईत गुन्हेगार कर्नाटकात जेरबंद