संपादकीय

सिडको तर्फे ३३२२ सदनिकांची संगणकीय सोडत अखेर १९ जुलै रोजी काढण्यात आल्याने स्वतःच्या हवकाच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना निश्चितच दिलासा मिळाला आहे. सिडकोतर्फे २६ जानेवारी २०२४ रोजी महागृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात येऊन नवी मुंबईतील तळोजा आणि द्रोणागिरी नोड येथे परवडणाऱ्या दरातील ३३२२ घरे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली होती. या ३३२२ सदनिकांची संगणकीय सोडत कधी निघणार?, याची प्रतीक्षा सिडको सदनिकेसाठी अर्ज केलेल्या प्रत्येक अर्जदाराला होती. मात्र, संगणकीय सोडतीची तारीख सिडको तर्फे वारंवार बदलण्यात येत होती. साहजिकच ३३२२ सदनिकांच्या संगणकीय सोडतीची अर्जदार चातकासारखे वाट पहात होते.अखेर  ३३२२ सदनिकांची संगणकीय सोडत १९ जुलै रोजी ‘सिडको'चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या उपस्थितीत  सीबीडी-बेलापूर येथील सिडको भवन मधील सिडको सभागृहामध्ये यशस्वीरीत्या पार पडल्याने ‘सिडको'चे घर मिळण्यासाठी अर्ज केलेल्या आणि सोडतीमध्ये नंबर लागलेले रहिवाशी आनंदी तर दुसरीकडे ३३२२ सदनिकांच्या संगणकीय सोडतीमध्ये नंबर न लागलेले अर्जदार नाराज होणे स्वाभाविक आहे. विशेष म्हणजे ३३२२ सदनिकांच्या संगणकीय सोडत प्रक्रियेवर देखरेख करण्याकरिता सिडकोतर्फे पर्यवेक्षक म्हणून मोईझ हुसेन आणि अर्जदारांपैकी ३ अर्जदार पंच म्हणून उपस्थित असल्याने या सोडतीच्या पारदर्शकतेबद्दल कोणालाही शंका घेता येणार नाही.सिडको तर्फे वेगाने विकसित होत असलेल्या तळोजा आणि द्रोणागिरी नोडमध्ये ३३२२ घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सर्वसाधारण गटातील नागरिकांकरिता उपलब्ध करुन देण्यात आली होती. तळोजा या नोडला सिडको तर्फे सुरु करण्यात आलेल्या नवी मुंबई मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. द्रोणागिरी नोड जेएनपीटी बंदरालगतचा नोड असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाणिज्यिक संधी निर्माण होत आहेत. द्रोणागिरी नोडला नेरुळ-उरण रेल्वेद्वारे कनेक्टिव्हिटी लाभली आहे. याशिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पासून द्रोणागिरी नोड नजिकच्या अंतरावर आहे.सिडकोतर्फे गृहनिर्माण योजनेच्या संगणकीय सोडतीसाठी वापरण्यात येणारी प्रणाली (सॉपटवेअर) पूर्णतः मानवी हस्तक्षेपविरहित आहे. तसेच भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई येथील संगणक विभागाकडून या प्रणालीची तपासणी करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे काढण्यात येणाऱ्या सोडत प्रक्रियेमध्ये अर्जदारांमधील निवडक प्रतिनिधींना पंच म्हणून सहभागी करुन घेण्यात आले होते. याशिवाय सोडती दरम्यान पात्र अर्जदारांच्या आणि सदनिकांच्या यादीची यादृच्छिक पद्धतीने सरमिसळ करण्यात आली. पारदर्शक आणि निष्पक्ष अशा या प्रक्रियेद्वारे सर्व अर्जदारांना समान संधी सुनिश्चित करण्यात आली होती.त्यामुळे सिडको महागृहनिर्माण योजना जानेवारी - २०२४ मधील ३३२२ सदनिकांच्या संगणकीय सोडतीमध्ये अयशस्वी ठरलेल्या अर्जदारांनी निराश होण्याचे काहीएक कारण नाही. एकूणच ३३२२ सदनिकांच्या संगणकीय सोडतीमध्ये घर लाभलेल्या अर्जदारांचे ‘सिडको'मुळे  नवी मुंबईसारख्या सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या शहरात स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न एकदाचे पूर्ण झाले आहे. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

 खड्ड्यांतून प्रशासनाची नियोजनशून्यता समोर