लाखो कुटुंबांसाठी दिलासादायक

महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी यावर्षी जुलै महिन्यात सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात घरगुती गॅस सिलेंडरसंदर्भात केलेली घोषणा राज्यातील लाखो कुटुंबांसाठी दिलासादायक ठरणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांना वर्षातून तीन गॅस सिलेंडरचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. अन्नपूर्णा योजना विशेषतः बीपीएल (दारिद्रय रेषेखालील) रेशनकार्डधारक आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांसाठी लागू असणार आहे. या माध्यमातून सरकार गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.सरकारी आकडेवारीनुसार अन्नपूर्णा गॅस योजनेचा लाभ राज्यातील सुमारे ५६ लाख १६ हजार कुटुंबांना मिळणार आहे. या निर्णयामुळे मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. अन्नपूर्णा योजना विशेषतः महिलांना लक्ष्य करुन आखण्यात आली आहे. कारण बहुतांश घरांमध्ये महिला या स्वयंपाकघराचा खर्च व्यवस्थापित करतात.

गॅस सिलेंडरच्या किंमतीत होणारी वाढ थेट महिलांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम करते. या योजनेमुळे महिलांना आर्थिक तणाव कमी करण्यास मदत होणार असून, त्यांना कुटुंबाच्या इतर गरजांसाठी पैसे वाचवण्याची संधी मिळणार आहे. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर पडणारा आर्थिक बोजा अन्नपूर्णा योजनेमुळे कमी होणार आहे. या योजनामुळे घरगुती खर्चात बचत झाल्याने महिलांना इतर महत्त्वाच्या गरजांसाठी पैसे खर्च करण्याची संधी मिळणार आहे. या योजनामुळे अप्रत्यक्षपणे महिलांच्या सशक्तीकरणास हातभार लागणार आहे. मोफत गॅस सिलेंडरमुळे कुटुंबांना इतर आवश्यक गोष्टींवर खर्च करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे महिलांच्या एकूण जीवनमानात सुधारणा होऊ शकणार आहे. अन्नपूर्णा गॅस योजनेमुळे अधिक कुटुंबे एलपीजी गॅसचा वापर करण्यास प्रोत्साहित होणार असून, ते पर्यावरणदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. अर्थात या योजनेची अंमलबजावणी करताना योग्य लाभार्थ्यांची निवड करणे आणि त्यांच्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचवणे एक मोठे आव्हान ठरणार आहे, याचा देखील विसर पडून चालणार नाही. महाराष्ट्र सरकारची मोफत गॅस सिलेंडर योजना राज्यातील लाखो कुटुंबांसाठी, विशेषतः महिलांसाठी, एक महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. या योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. एकंदरीत, मोफत गॅस सिलेंडर योजना महाराष्ट्रातील महिला सशक्तीकरण आणि कुटुंबांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

आता ‘मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना'