समाजासाठी चिंतादायी

 समाजासाठी चिंतादायी
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतून २०१९ पासून नोव्हेंबर-२०२३ या पाच वर्षाच्या कालावधीत तब्बल १५४५ अल्पवयीन मुले-मुलींचे अपहरण झाल्याची विविध पोलीस ठाणे मध्ये झालेली नोंद एवूÀणच समाजाची चिंता वाढविणारी आहे. यात अपहरण झालेल्या मुलींची संख्या ११३७ इतकी आहे. गत पाच वर्षात अपहरण झालेल्या १५४५ गुन्ह्यातील १४७० मुले-मुलींचा शोध घ्ोण्यात तसेच ११३७ मुलींपैकी १०८३ मुलींना विविध भागातून शोधून आणण्यात पोलिसांना यश आले असले तरी या बाबीकडे दुर्लक्ष करुन चालणारे नाही. विशेष म्हणजे अपहरण झालेल्या मुलींपैकी बहुतेक मुली १४ ते १७ या वयोगटातील असून, बहुतांश मुलींना प्रेम प्रकरणातून तसेच लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेण्यात आल्याचे तसेच यातील अनेक मुलींनी प्रेम प्रकरणातून लग्न देखील केल्याचे पोलिसांना तपासात आढळून आल्याने समाजाची काळजी वाढणे स्वाभाविक आहे. अर्थात व्ोÀवळ मुलीच बेपत्ता होत आहेत, असे नाही तर मुलींप्रमाणेच मुले देखील बेपत्ता होण्याच्या घटना वाढत असून, गत पाच वर्षांमध्ये ४०८ मुले बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. यातील ३८७ मुलांचा अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष तसेच स्थानिक पोलिसांनी शोध घ्ोऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. यातील बहुतांश मुले घरी आई-वडील अभ्यासावरुन रागावल्यामुळे, काही मुले इतर किरकोळ कारणावरुन रागाच्या भरात घर सोडून जात असल्याचे तर काही मुले मौज-मस्ती म्हणून घर सोडून निघून जात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने गेल्या पाच वर्षामध्ये दाखल झालेल्या अपहरणाच्या अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास करुन अपहरण झालेल्या मुले-मुलींचा शोध घ्ोतला आहे. अपहरण झालेल्या आणि परराज्यात जाऊन राहणाऱ्या मुले-मुलींची कुठल्याच प्रकारची माहिती नसताना, त्यांचा ठावठिकाणा शोधणे जिकरीचे असल्याने या अपह्रत मुले-मुलींचा शोध घ्ोण्याचे मोठे आव्हान नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षासमोर आहे. गेल्या चार-पाच वर्षामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणे मध्ये दाखल झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्यांतील शंभरपेक्षा अधिक गुन्हे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने अल्पावधीतच उघडकीस आणुन अपह्रत मुले-मुलींना शोधण्याचे काम केले आहे. अपहरण झालेल्या मुले-मुलींचे समुदेशन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने शोध घ्ोण्यात आलेल्या मुले-मुलींचे समुपदेशन देखील पोलिसांनाच करावे लागत आहे. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने गेल्या ११ महिन्याच्या कालावधीत दाखल झालेल्या एकूण ३६५ अपहरणाच्या गुन्ह्यांपैकी ३२३ गुन्हे उघडकीस आणून त्यातील २२९ मुली तर ९४ मुलांना शोधून काढले आहे. तसेच त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. गेल्या वर्षातील उर्वरीत ४४ अपहरणांच्या गुन्ह्यातील अपह्रत मुले-मुलींचा शोध घ्ोण्याचे काम अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाकडून सुरु आहे. वेगवेगळ्या कारणामुळे अल्पवयीन मुले-मुली घर सोडून निघून जात आहेत. यातील बहुतेक घटना या प्रेम प्रकरणातून घडल्या आहेत. अल्पवयीन मुले-मुलींनी घरातून जाऊ नये यासाठी पालकांनी मुले-मुलींसोबत संवाद साधण्याची तसेच त्यांचे समुपदेशन करण्याची गरज आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतून गेल्या पाच वर्षामध्ये तब्बल १५४५ अल्पवयीन मुले-मुलींचे अपहरण झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यापैकी १४७० मुले-मुलींना शोधण्यात नवी मुबंई पोलिसांना यश आले असले तरी अल्पवयीन मुलींना विशेषतः वयात आलेल्या मुलींना लग्नाचे अमिष दाखवून त्यांना पळवून नेण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पोलिसांसह सर्वच स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे. एवूÀणच अल्पवयीन मुले-मुलींचे होणारे अपहरण समाजासाठी चिंतादायक तसेच विचार करायला लावणारे आहे. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

 आपणच अधिक दक्ष होण्याची गरज