वाहतुक शिस्तीची गरज

 वाहतुक शिस्तीची गरज
आजकाल अतिवेगाने वाहन चालविण्याचे, विना हेल्मेट वाहन चालविण्याचे, विना सीट बेल्ट वाहन चालविण्याचे, सिग्नल तोडण्याचे, धोकादायक वाहन चालविण्याचे, दारु पिऊन वाहन चालविण्याचे, वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण करण्याचे तसेच वाहतुकीच्या इतर नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावणे आवश्यक झाले आहे. याशिवाय नवी मुंबई पोलीस आयुवतालय हद्दीतील विविध महामार्गावर असलेल्या ब्लॅक स्पॉटचा शोध घ्ोऊन त्यांची सुधारणा करणे, महामार्गावरील चौकात वाहतुक कोंडीमुळे होणारे अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी अनावश्यक बाह्यमार्ग, सिग्नलचे आधुनिकीकरण, तांत्रिक अडचणी दुर करणे, साईड पट्टया भरणे, खड्डे भरणे आदी उपाययोजना करणे देखील गरजेचे झाले आहे. नवी मुंबई वाहतुक पोलिसांकडून रस्ते अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करतानाच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांमध्ये प्रबोधन देखील करण्यात येत असल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत प्राणांतिक अपघातामध्ये आणि त्यातील मृतांमध्ये सुमारे गेल्यावर्षी २५ टक्क्यांनी घट झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बेशिस्त वाहनचालकांमुळेच विविध मार्गावर प्राणांतिक अपघाताच्या घटना घडत आहेत. या घटनांमध्ये निष्पाप जीवांचा बळी जात आहे. नवी मुंबई वाहतुक पोलिसांद्वारे विशेष मोहीम राबवून बेशिस्त वाहन चालकांवर जोरदार कारवाई करण्यात येत असली तरी या कारवाईमध्ये सातत्य नसल्याने बेशिस्त वाहनचालक बेफाम होत असल्याचे चित्र दिसते. रस्ते अपघातात मु्‌त्यू होण्याबरोबरच निष्पाप व्यवती जखमी देखील होत आहेत. राज्यात दैनंदिन घडणाऱ्या वाहन अपघातांमध्ये सर्वात जास्त अपघात दुचाकीस्वारांचे असल्याचे तसेच यात हेल्मेट न घातल्याने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम १२८ आणि त्याअनुषंगाने बनविण्यात आलेल्या इतर तरतुदीनुसार दुचाकीस्वाराने तसेच त्याच्या मागील सीटवरुन प्रवास करणाऱ्या व्यक्तीने हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हेल्मेट सक्तीचे आदेश असताना आजही अनेक दुचाकी वाहन चालक नियम धुडकावून विना हेल्मेट प्रवास करत असल्याचे निदर्शनास येत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील रस्ते अपघातांचे आणि अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याबरोबरच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात वाहतुक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय वाहन चालकांचे प्रबोधन देखील करण्यात येत आहे. वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन वाहन चालवले तर काय बिघडणार आहे?. नवी मुंबई पोलीस आयुवतालय हद्दीतील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी वाहन चालकांचे प्रबोधन करण्याचे तसेच बेशिस्त वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याचे दिलेले निर्देश स्वागतार्ह असले तरी या निर्देशांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याची देखील गरज आहे. अन्यथा नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांचे निर्देश म्हणजे ‘व्ोÀला इशारा जाता जाता', असेच ठरण्याची शवयता अधिक राहणार आहे. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

 समाजासाठी चिंतादायी