मार्शल आर्ट स्पर्धेत छावा प्रतिष्ठान, नवी मुंबईच्या संघास जनरल चॅम्पियनशिप
युध्दकला स्पर्धेच्या विजेतेपदावर छावा प्रतिष्ठान नवी मुंबईची मोहर
नवी मुंबई : कोपरखैरणे येथे नवी मुंबई ओपन ऑल महाराष्ट्र कराटे चॅम्पियनशीप २०२३ व नॅशनल लेव्हल ओपन मार्शल आर्ट्स चॅम्पियनशीप २०२३ चे आयोजन १ ऑक्टोबर करण्यात आले होते. या चॅम्पियनशीपमध्ये छावा प्रतिष्ठान, नवी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी काता, फाईट आणि वेपन या इव्हेन्टमध्ये ३० गोल्ड व ३ सिल्वर मेडल्स पटकावुन प्रथम क्रमांकाची जनरल चॅम्पियनशीप पटकावली.
सदर चॅम्पियनशीप विजेत्या छावा प्रतिष्ठानच्या संघाचे आमदार संदीप नाईक व मुंबई पोलीस डी. सी. पी. पुरुषोत्तम कराड यांनी कौतुक केले. या स्पर्धेतील विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे : कौस्तुभ पाटील - काता - सुवर्णपदक, कुमीते - सुवर्णपदक, वेपन - सुवर्णपदक, मिसबा शेख - कुमीते - रौप्य पदक, वेपन - सुवर्णपदक, बेनी तगाराम - वेपन - सुवर्णपदक, तेजस तगाराम - वेपन - सुवर्णपदक, आयुष खारवार - वेपन - सुवर्णपदक, श्रेयांश खारवार - वेपन - सुवर्णपदक, विनीत शीद - वेपन - सुवर्णपदक, कुमीते - रौप्य पदक, तेजस रामचंद्र सुर्वे - वेपन - सुवर्णपदक, कुमीते - सुवर्णपदक अक्षया रामदुराई - वेपन - सुवर्णपदक, मनोज अकासाली - वेपन - सुवर्णपदक, कुमीते - रौप्य पदव। अर्जुन अकासाली - वेपन - सुवर्णपदक, कुमीते - सुवर्णपदक, सेजल शीद - वेपन - दुहेरी सुवर्णपदक, अनया थोरात - वेपन - सुवर्णपदक, श्रवण सणस - वेपन - सुवर्णपदक विरेन पोहेकर-काता - सुवर्णपदक, आदित्य कासारे - काता - सुवर्णपदक, अलिन दास - वेपन - सुवर्णपदक अथर्व सुर्यवंशी - वेपन - सुवर्णपदक, काता - सुवर्णपदक, अवनी गायकवाड - वेपन - सुवर्णपदक आर्या रांजणे - वेपन - सुवर्णपदक, आर्यन जाधव - वेपन - सुवर्णपदक, हितांशू पाटील - वेपन - सुवर्णपदक, अथर्व जाधव - वेपन - सुवर्णपदक, आर्या राजपुरे - वेपन - सुवर्णपदक. सर्व विजेत्या खेळाडुंचे छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वस्ताद अमित गडांकुश यांनी अभिनंदन केले आहे.