नवी मुंबईतील ‘छावा प्रतिष्ठान'च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

राज्य स्तरीय कराटे स्पर्धेत नवी मुंबई मधील स्पर्धकांचा डंका

वाशी ः सातारा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धा-२०२३ मध्ये नवी मुंबईतील ‘छावा प्रतिष्ठान'च्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत ३ सुवर्ण पदकांसह एकूण १३ पदकांना गवसणी घातली  आहे.

विनर कराटे असोसिएशन मार्फत सातारा येथे राज्य स्तरीय कराटे स्पर्धा-२०२३ नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्य भरातून २५० स्पर्धकांनी भाग घ्ोतला होता. या स्पर्धेत नवी मुंबई मधील ‘छावा प्रतिष्ठान'च्या प्रशिक्षक अमृता गडाकुंश यांच्या नेतृत्वाखाली १० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात त्यांनी चमकदार कामगिरी करत दोन प्रकारात एकूण १३ पदकांची लयलूट केली आहे. विविध गटातील काटा आणि कुमाईट या दोन प्रकारात या स्पर्धकांनी ३ सुवर्ण,५ सिल्व्हर आणि ५  ब्राँझ अशी १३ पदके जिंकली आहेत.

राज्यस्तरीय कराटे स्पर्धा-२०२३ मधील पदक विजेते स्पर्धक

- आर्या राजपुरे ः काटा प्रकार - सुवर्ण, कुमाईट प्रकार - कांस्य पदक, - पुर्वी दुरे ः काटा प्रकार - कांस्य, कुमाईट प्रकार -कांस्य पदक, - मिसबा शेख ः कुमाईट प्रकार - सिल्व्हर पदक, - तनुजा गंजे ः कुमाईट प्रकार - सिल्व्हर पदक, - अक्षया रामदुराई ः कुमाईट प्रकार-  सुवर्ण, काटा प्रकार - सिल्व्हर पदक, - अर्जुन आकसाळी ः कुमाईट प्रकार - सिल्व्हर पदक, - मनोज आकसाळी ः कुमाईट प्रकार - कांस्य पदक, - तेजस सुर्वे ः कुमाईट प्रकार - सिल्व्हर पदक, - संस्कृत माने ः कुमाईट प्रकार - सुवर्ण पदक, - कौस्तुभ पाटील ः कुमाईट प्रकार - कांस्य पदक.
 

Read Next

किक बॉक्सिंग स्पर्धेत जासईच्या शुभम म्हात्रेला दोन सुवर्णपदक