मार्शल आर्ट स्पर्धेत शेतकरी शिक्षण संस्था, घणसोलीचे विद्यार्थी चमकले

नवी मुंबईस्तरीय मार्शल आर्ट स्पर्धेत शेतकरी शिक्षण संस्थेच्या खेळाडूंचे सुयश

नवी मुंबई : शेतकरी शिक्षण संस्था इंग्रजी माध्यम, घणसोली शाळेतील विद्यार्थ्यांनी नवी मुंबई अंतर्गत आयोजित मार्शल आर्ट स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनी ७ सुवर्ण, ४ रजत आणि २ ताम्र पदकांची कमाई केली आहे.  

शाळेला ललामभूत ठरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या कामगिरीबद्दल विद्यालयाचे अध्यक्ष डी.बी. म्हात्रे, सेक्रेटरी पी.के.म्हात्रे, . प्रभाकर पाटील, सुविध म्हात्रे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे पी. टी. चे शिक्षक राजेश चंद्रकांत शेळके यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना  प्रोत्साहन आणि प्रेरणा देणाऱ्या विद्यालयाच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा पाटील आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली पाटील, विद्यालयातील शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचेही यानिमित्त अभिनंदन करण्यात आले.

पदकविजेत्या विद्याथ्यांची नावे आणि त्यांची कामगिरी पुढीलप्रमाणे ः रोहित तायडे, भूमिका गोलियात, विवेक ईरोहिले, रितिका पूनार, आदित्य संगारे, सम्यक उबाळे, निखिल गोवळकर - सर्व सुवर्णपदक विजेते; मयूर वुÀंभार, सर्वेश पवार, पियुश म्हात्रे, अभिजित उज्जल - सर्व रजत पदक विजेते; प्रथमेश बोंबावडे, अंडाप्पा झालाकी - दोघेही ताम्रपदक विजेते. 

Read Previous

नवी मुंबईतील ‘छावा प्रतिष्ठान'च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

Read Next

उरण व पनवेल गोशीन रियू कराटे विद्यार्थ्यांची मलेशियाला निवड