सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा 2023 -24

पनवेल महानगरपालिका जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेला सुरुवात

पनवेल  : क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत पनवेल महानगरपालिका व जिल्हा क्रिडा अधिकारी रायगड अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मा.आयुक्त  गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा 2023 -24 कामोठे येथील इंडो स्कॉट शाळेमध्ये  14 मुले व 17 वर्षे मुली यांच्या फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. आज दिनांक 1 ऑगस्ट रोजी क्रिडा व सांस्कृतिक विभागचे सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे व  विभाग प्रमुख नामदेव पिचड यांनी  या ठिकाणी  भेट देऊन स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळांचे  अभिनंदन करत, स्पर्धेकरिता आलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

 यावेळी क्रीडा शिक्षक समीर रेवाळे व विशाल यादव , रोहित म्हस्के, शाळेचे क्रिडा विभाग प्रमुख हर्षा उल्लाल, इतर क्रिडा शिक्षक, शाळेचे सर्व शिक्षक  व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 अतिरीक्त आयुक्त 2 भारत राठोड यांनी या स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळांचे अभिनंदन केले. पनवेल महानगरपालिका जिल्हा स्तरीय शालेय जिल्हा क्रिडा स्पर्धांना स्पर्धकांचा मोठा प्रतिसाद लाभत असून सुमारे 60 शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी आलेले विद्यार्थीं देखील मोठ्या उत्साहात असल्याचे यावेळी दिसून येत होते.  

14-17 वयोगटातील मुले व मुलींसाठी होणाऱ्या या स्पर्धेअंतर्गत  पनवेल महानगरपालिका हद्दीतील  विविध शाळा व कनिष्ठ विद्यालयातील सुमारे 60 संघानी सहभाग घेतला आहे.दिनांक 18 जुलै रोजी  सीकेटी महाविद्यालयात या स्पर्धांचा शुभारंभ झाला होता. आज या स्पर्धांचा शेवटचा सामना इंडो स्कॉट शाळेमध्ये घेण्यात आला. याठिकाणी 14 वर्षाखालील मुले, 17  वर्षा खालील मुली, अशा दोन गटात या स्पर्धा घेण्यात आल्या. या फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये 14 वर्षाखालील मुलांच्या गटात बालभारती शाळेने पहिला नंबर पटकाविला. या स्पर्धेतील विजेते संघ पुढे  विभागीय स्तर ,राज्य स्तर आणि राष्ट्रीय स्तरावरती खेळावयास जाणार आहेत.

Read Previous

लीग सामन्यांव्दारे पालिका शाळांतील फुटबॉल खेळाडू विद्यार्थिनींना क्रीडा प्रदर्शनाची संधी

Read Next

फादर ॲग्नेल शाळेच्या फुटबॉल संघाचे अभिनंदन