फादर ॲग्नेल शाळेच्या फुटबॉल संघाचे अभिनंदन

नवी मुंबई जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेमध्येे वाशीतील फादर ॲग्नेल शाळेचा संघ विजयी

नवी मुंबई : नवी मुंबई जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेमध्येे १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अथर्व पंगेरकर याच्या नेतृत्वाखाली वाशीतील फादर ॲग्नेल शाळेच्या संघाने विजेतेपद पटकावले.

क्रीडा-युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार नवी मुंबई महापालिका क्रीडा-सांस्कृतिक विभागामार्फत सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेचे नेरुळ, सेवटर-१९ मधील यशवंतराव चव्हाण स्टेडीयम येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेअंतर्गत १७ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धा २४ जुलैपासून सुरु झाल्या आहेत. या स्पर्धेत नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ३२ शाळांच्या संघांनी १७ वर्षांखालील मुलांच्या गटात दोन गटात सहभाग घेतला.

यामधून फादर ॲग्नल स्कूल-वाशी, सेंट झेवियर्स हायस्कूल-नेरुळ, रायन-नेरुळ आणि एनएचपी स्कूल-ऐरोली चार शाळांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर सेमीफायनल मध्ये फादर ॲग्नल स्कूलच्या संघाने रायन स्कूलचा तर एनएचपी संघाने सेट झेविअर्स संघाचा पराभव करुन अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीच्या सामन्यात फादर ॲग्नेल स्कूलने सेंट झेवियर्स संघाचा २-० गोलने पराभव करुन गटाचे अंतिम विजेतेपद मिळविले.

या विजयाबद्दल फादर ॲग्नल स्कूलचा संघ आता विभागीय आणि त्यानंतरच्या स्तरावरील नवी मुंबई महापालिका जिल्ह्याचा संघ म्हणून सहभागी होणार आहे. या विजेत्या संघाचा कर्णधार अथर्व पंगेरकर, गोलरक्षक स्टॅलीन प्लॅचेरी यांच्यासह सर्व खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक सुप्रीत, हरी आणि जोराम यांचे फादर ॲग्नल स्कूल व्यवस्थापनाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. 

 

Read Previous

लीग सामन्यांव्दारे पालिका शाळांतील फुटबॉल खेळाडू विद्यार्थिनींना क्रीडा प्रदर्शनाची संधी

Read Next

रायगड जिल्हास्तरीय शालेय तसेच खुल्या गटातील 23 वी द्रोणागिरी वर्षा मॅरेथॉन स्पर्धा व राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा