'खारघर मॅरेथॉन २०२३' च्या अनुषंगाने  मॅरेथॉन प्री इव्हेंट सायकलिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद

'खारघर मॅरेथॉन २०२३'  प्री इव्हेंटला परिसरातील नागरीकांचा उदंड प्रतिसाद 

पनवेल : रामशेठ ठाकूर इंटरनॅशल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडेन्सी वेल्फेअर असोसिएशन यांच्या वतीने आणि  सहआयोजक अदिम जाती मीना विकास असोसिएशन यांच्या सहकार्याने रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या 'खारघर मॅरेथॉन २०२३' च्या अनुषंगाने आज (शनिवार, दि. २१) खारघर येथे मॅरेथॉन प्री इव्हेंट म्हणून १५ किलोमीटर सायकलिंग स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले होते. यामध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेत सायकलिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  

        रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल येथून  या स्पर्धेला पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते तथा मॅरेथॉन प्रमुख परेश ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात झाली. यावेळी माजी नगरसेवक हरेश केणी, बाळासाहेबांची शिवसेनेचे रामदास शेवाळे, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, निलेश बाविस्कर, अरुणकुमार भगत, शत्रुघ्न काकडे, रामजी बेरा, नरेश ठाकूर, गुरुनाथ गायकर, माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय, अनिता पाटील, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे,  खारघर रेसिडेन्सी वेल्फेअर असोसिएशन अध्यक्ष अमर उपाध्याय,  कीर्ती नवघरे, भाजप तळोजा मंडळ युवामोर्चा अध्यक्ष विनोद घरत, सुशील महाडिक, गीता चौधरी, मोना अडवाणी, मधुमिता जिना, चांदणी आवघडे, निलेश पाटील, शशांक त्रिपाठी, नरेंद्र त्रिपाठी, अक्षय पाटील, संजय घरत, डॉ.संतोष आगलावे उपस्थित होते. या प्री इव्हेंटला परिसरातील नागरीकांचा उदंड प्रतिसाद लाभला. दरम्यान रविवारी होणारी ही यंदाची १३ वी मॅरेथेन स्पर्धा आहे. त्या अनुषंगाने  प्री इव्हेंट सायकलिंग आयोजित करण्यात आली होती.
Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

‘खारघर युथ कौन्सिल'तर्फे व्हॉलीबॉल स्पर्धेत पुरुष गटात नवी मुंबईतील स्पाईकर गट प्रथम