‘खारघर युथ कौन्सिल'तर्फे व्हॉलीबॉल स्पर्धेत पुरुष गटात नवी मुंबईतील स्पाईकर गट प्रथम

 ‘खारघर युथ कौन्सिल'तर्फे व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न

खारघर ः खारघर युथ कौन्सिल सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाविद्यालयीन स्तरावरील व्हॉलीबॉल स्पर्धेत महिला गटात मुंबईतील अली गर्ल संघाने तर पुरुष गटात नवी मुंबईतील स्पाईकर गटाने प्रथम क्रमांक प्राप्त केला.  

शहरात खेळाचे मैदान नसल्यामुळे मुले फावल्या वेळेत मोबाईलवर व्यस्त असतात. मुलांचे शरीर तंदुरुस्त असावे यासाठी  खारघर युथ कौन्सिल सामाजिक संस्थेच्या वतीने मोबाईल टू मैदान असा उपक्रम हाती घ्ोवून मुला-मुलींसाठी व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या यावेळी मुलींच्या स्पर्धेचे उद्‌घाटन माजी नगरसेविका तथा ‘खारघर फोरम'च्या अध्यक्षा लीना गरड यांच्या हस्ते तर मुलांच्या स्पर्धेचे स्पर्धेचे उद्‌घाटन पनवेल महापालिव्ोÀचे माजी विरोधी पक्षनेता प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते पार पडले.

सदर स्पर्धेत पनवेल, नवी मुंबई तसेच मुंबईतील महिला आणि पुरुष संघ सहभागी झाले होते. महिला गटात प्रथम क्रमांक  मुंबईतील अली गर्ल संघाने द्वितीय क्रमांक खारघर युथ कौन्सिल संघाने पटकावला. तर पुरुष गटामध्ये नवी मुंबईतील स्पाईकर संघाने प्रथम तर द्वितीय क्रमांक खारघर घरकुल येथील स्पाईकर संघाने पटकावले.

सदर स्पर्धेत रेप्रÀी म्हणून प्रवीण जाधव, बंटी, सुभाष नायर, लाईन रेफ्री म्हणून अनिकेत, आफताब, श्रीकांत, बेनीप्रतीक यांनी काम पाहिले. समालोचकाची भूमिका मंदार, मनिष सिंह, एस.पी.सिंग, दिलीप मस्के यांनी पार पाडली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी  खारघर युथ कौन्सिलचे पदाधिकारी ज्ञानेश्वर सोरटे, संदीप गोरे, दत्तात्रय पाटील, कुमार बंटी, दिलीप मस्के, एस.पी. सिंग, कुंडलिक सरगर, अशोक गोळे, पांडुरंग घुले, नंदू वारुंगसे, आप्पा वाळुंज, अनिल शेटे, भास्कर साळुंखे, सुभाष नायर, रवी थोरपुझा, अक्षय घुले, संतोष मोरे, बिरेंद्र भाविन यांनी मेहनत घेतली. स्पर्धासमयी खारघर आणि आसपासच्या विभागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 

 

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ