‘एनडीटीव्ही'चे वरिष्ठ कार्यकारी संपादक, पत्रकार रविश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा

प्रसारमाध्यमांसाठी धोक्याची घंटा?

जनसामान्यांचे प्रश्न सातत्याने ‘एनडीटीव्ही' वरील ‘प्राइम टाइम' या कार्यक्रमाद्वारे मांडणारे ‘एनडीटीव्ही'चे वरिष्ठ कार्यकारी संपादक, पत्रकार रविश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तब्बल २६ वर्षांची ‘एनडीटीव्ही'ची साथ त्यांनी सोडली. रविश कुमार अखेर ‘एनडीटीव्ही' मधून बाहेर पडल्यानंतर कंपनीकडून त्यांचा राजीनामा देखील मंजूर करण्यात आल्याने पत्रकारिता क्षेत्रात खळबळ माजणे स्वाभाविक आहे. ‘न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड' एनडीटीव्ही या वृत्त प्रसारण वाहिनीचे संस्थापक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी प्रवर्तक कंपनी ‘आरआरपीआर होल्डिंग्ज' म्हणजेच आरआरपी आरएचच्या प्रवर्तक (प्रमोटर) पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दोनच दिवसांनी ‘एनडीटीव्ही'चे वरिष्ठ कार्यकारी संपादक, पत्रकार रविश कुमार यांनीही पदाचा राजीनामा दिला. जनसामान्यांचे प्रश्न सातत्याने एनडीटीव्ही वरील ‘प्राइम टाइम' या कार्यक्रमाद्वारे रविश कुमार यांनी मांडले आहेत. त्यानिमित्त रविश कुमार यांना २०१९ मध्ये सर्वोच्च रॅमन मॅगसेसे पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. रविश कुमार यांनी अथक प्रयत्नानंतर यशाचे शिखर पटकावले होते. रविश कुमार १९९६ पासून एनडीव्हीमध्ये होते. सामान्य माणसाशी थेट संवाद साधण्याची त्यांची कला वाखाणण्यासारखी होती. हम लोग, रवीश की रिपोर्ट, देश की बात आणि प्राईम टाईम या कार्यक्रमांद्वारे जनसामान्यांना भेडसावणारे प्रश्न मांडण्याबरोबरच समाजाच्या समस्या, देशातील परिस्थिती त्यांनी सातत्याने मांडली. रविश कुमार यांनी थेट ग्राऊंड झिरोवर उतरुन माध्यमांमध्ये दुर्लक्षित होणाऱ्या विषयांना ‘टीव्ही'च्या पडद्यावर आणले. रविश कुमार यांना त्यांच्या पत्रकारितेतील कामाबद्दल दोन वेळा रामनाथ गोयंका या पत्रकारितेतील मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रविश कुमार यांना २०१९ मध्ये आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला. गरीब आणि सामान्य जनतेचा आवाज सार्वजनिक मंचावर उठवल्याबद्दल, पत्रकारिता क्षेत्रामधील त्यांच्या सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. रविश कुमार यांना हिंदी भाषेतील प्रसारण श्रेणीसाठी रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम अवॉर्ड (२०१७ आणि २०१३) दोन वेळा त्यांना देण्यात आला. पत्रकारितेसाठी त्यांना गौरी लंकेश पुरस्कार, पहिला कुलदीप नायर पत्रकारिता पुरस्कार (२०१७), हिंदी पत्रकारिता आणि सर्जनशील साहित्यासाठी गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कार (२०१०, २०१४ मध्ये प्रदान करण्यात आला) इत्यादी पुरस्कार प्राप्त आहेत. ‘द इंडियन एक्स्प्रेस'ने १०० सर्वात प्रभावशाली भारतीयांच्या (२०१६) यादीत त्यांचा समावेश केला होता. तसेच ‘मुंबई प्रेस क्लब' द्वारे त्यांना वर्षातील सर्वोत्कृष्ट पत्रकार म्हणूनही निवडण्यात आले होते. रविश कुमार यांच्यासारखे लोकांवर प्रभाव टाकणारे कमी पत्रकार आहेत. एनडीटीव्हीमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. एनडीटीव्ही या वृत्तसमुहाची मालकी आता गौतम अदानी यांच्याकडे गेली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रविश कुमार राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. मात्र, १ डिसेंबर रोजी त्यांनी अधिकृतपणे राजीनामा दिला. एवूÀणच एकापाठोपाठ विविध नामांकित पत्रकारांचे प्रसारमाध्यम विश्वातील मुख्य प्रवाहांपासून दूर जाणे धोकादायक आहे. भांडवलदारी समुहांकडे देशाची बडी प्रसारमाध्यमे एकवटली आहेत. सरकारच्या चुका दाखवणारे, रोखठोक लिहिणारे, बोलणारे वुÀणी उरले नाही. त्यामुळे पत्रकारितेतील भाटगिरी वाढीला लागण्याची तसेच वस्तुनिष्ठ, सत्य, वास्तववादी वार्तांकन न होता केवळ स्तुतिपाठकांचा मेळा भरण्याची शवयता नाकारता येणार नाही. पत्रकारिता क्षेत्रात भाटगिरी वाढीला लागल्यास असत्य, अवास्तव,खोटेनाटे, वाढवून-चढवून देण्यात आलेले कोणतेही वृत्त दर्शक आणि वाचकांच्या माथी मारले जाण्याचा मोठा धोका आहे. पत्रकारिता क्षेत्रात भांडवलशाहीचा शिरकाव झाल्यास सरकारच्या चुका दाखवणारे कोणी पत्रकार प्रसार माध्यमांमध्ये यापुढे दिसणार नाहीत, याचा गांभीर्याने विचार होण्याची नितांत आवश्यकता आहे. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

 अभिनव संकल्पना