सीकेटी कॉलेज तर्फे रौप्य महोत्सव निमित्त आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा संपन्न

फुटबॉल स्पर्धेत ‘रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल'चे सुयश

पनवेल ः जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था संचालित खांदा कॉलनी मधील चांगू काना ठाकूर आर्टस्‌, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज तर्फे रौप्य महोत्सव निमित्त आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत खारघर येथील ‘रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल' मधील विद्यार्थ्यांच्या तीन संघांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या तीनही संघांनी चमकदार कामगिरी करत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.

या तीनही संघाचे ‘जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था'चे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, ‘रयत शिक्षण संस्था'चे उपाध्यक्ष आमदार चेतन तुपे, पश्चिम विभाग चेअरमन राम कांडगे, जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, पुणे विभाग सहाय्यक अधिकारी शंकर पवार, प्राचार्या राज अलोनी, क्रीडा प्रशिक्षक मंदार मुंबईकर, विशाल फडतरे यांनी विशेष कौतुक करुन अभिनंदन केले.

Read Previous

लॉरेम इप्सम म्हणजे काय??