उद्यापासून पुन्हा किलबिलाट

महाराष्ट्र राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळा उद्या १५ जून पासून सुरु होणार असून, शाळांतील वर्गांमध्ये अध्ययन, अध्यापनाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याने बंद झालेली शाळांची घंटा पुन्हा वाजणार आहे. शाळा-कॉलेज मध्ये पुन्हा मुले-मुलींचा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे. ७ जुलै २०२१ आणि १० ऑगस्ट २०२१ रोजीच्या महाराष्ट्र राज्य शासन परिपत्रकान्वये राज्यातील शाळा, विद्यालयातील वर्ग सुरु करणेबाबत शासनाकडून यापूर्वीच मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आली होती. २४ सप्टेंबर २०२१ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळांचे वर्ग ४ ऑवटोबर २०२१ पासून सुरक्षितपणे सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली होती. तसेच २९ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी तसेच शहरी भागातील पहिली ते सातवी इयत्ताचे वर्ग १ डिसेंबर २०२१ पासून सुरक्षितपणे सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली होती. त्यानुसार नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील इयत्ता आठवी ते बारावीच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळा आणि विद्यालये ४ ऑवटोबर २०२१ पासून आणि पहिली ते आठवी इयत्ताचे वर्ग १ डिसेंबर २०२१ पासून दक्षता घ्ोऊन सुरु करण्याचे आदेश निर्गमित केले होते. ‘कोरोना'ची लाट ओसरत असताना ४ ऑक्टोबर २०२१ पासून महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शाळा सुरु झाल्यानंतर राज्य शासनाने १ डिसेंबर २०२१ पासून प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहिर केला होता. मात्र, दक्षिण आफ्रिका मधून आलेल्या ओमायक्रॉन या ‘कोरोना'च्या नव्या प्रकारामुळे दक्षता घ्ोण्याच्या दृष्टीने नवी मुंबई शहरातील शाळांमधील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग १५ डिसेंबर २०२१ पासून सुरु करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घ्ोतला होता. त्यानुसार नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील प्राथमिक शाळांची घंटा १५ डिसेंबर पासून वाजण्यास सुरुवात झाली होती. मात्र, कोरोना बाधीतांची वाढती संख्या आणि ओमायक्रॉन या नवीन कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घ्ोऊन ‘कोरोना'चा विषाणू रोखण्यासाठी टेस्टींगमध्ये वाढ करण्याचे आणि लसीकरण कार्यवाहीतही अधिक गतीमानता तसेच व्यापकता आणण्याचे निर्देशित करीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दहावी आणि बारावी इयत्ताचे वर्ग वगळता अन्य वर्गांसाठीच्या (इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावी) सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळा ३० जानेवारी २०२२ पर्यंत अध्यापनासाठी प्रत्यक्ष बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य सरकारने शाळा आणि विद्यालयातील वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करुन राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार नवी मुंबई मधील शाळा आणि कॉलेज मधीले वर्ग पुन्हा भरणार आहेत. उद्या १५ जून पासून राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळा सुरु करण्याच्या निर्णयामुळे शाळा आणि कॉलेज मधील विद्यार्थी-विद्यार्थिनींची ऑनलाईन शिक्षणापासून सुटका होणार असून,  विद्यार्थी-विद्यार्थिनींना दिलासा मिळणार आहे. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

 चिमुरड्यांची काळजी घेण्याची आवश्यकता