मतदारांच्या नावांवर ‘फुली’

नवी मुंबई शहरातील ऐरोली आणि बेलापूर या दोन विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमधील दुबार नावे, फोटो नसलेली आणि नमूद पत्यावर राहत नसलेल्या ५७ हजार मतदारांची नावे वगळण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घतल्याचा फटका अनेक राजकीय मंडळींना बसल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. ऐरोली आणि बेलापूर या दोन विधानसभा मतदारसंघातील ५७ हजार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. नवी मुंबई शहरातील बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये मोठया प्रमाणात तोतया मतदार, दुबार मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत, अशी तव्रÀार नवी मुंबई मधील अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी कोकण विभागीय आयुक्त तसेच राज्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती. त्या तव्रÀारीच्या अनुषंगाने संबंधित मतदारांच्या घरोघरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी गृह भेटी दिली असता मतदार यादीत छायाचित्र नसलेल्यांपैकी काही मतदार त्यांच्या नमूद असलेल्या निवासी पत्त्यावर राहत नसल्याचे निदर्शनास आले होते. तसेच, मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्यांपैकी जे मतदार त्यांच्या मतदार यादीत नमूद असलेल्या निवासी पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून येत असल्यास, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० आणि मतदार नाेंदणी अधिनियम नियम १९६० मधील तरतूद आणि भारत निवडणूक आयोगाच्या दिलेल्या मार्गदर्शन सूचनानुसार निवासी पत्त्यावर राहत नसल्याबाबत पंचनामे केले होते. याशिवाय मतदार यादीमध्ये दुबार नाव असलेल्या मतदारांचे एक नाव ठेवून दुसरे नाव वगळण्याबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी जबाब घतले होते. त्यानुसार मतदार याद्यांमधील दुबार नावे, फोटो नसलेली आणि नमूद पत्यावर राहत नसलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघातील ३० हजार आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघातील २०,०१५ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघातील ५७ हजार १५ अपात्र मतदारांची वगळण्यात आली आहेत. दुसरीकडे आता वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची मतदार यादीमध्ये नाव नाेंदणी झाली आहे. नवी मुंबई मधील बेलापूर आणि ऐरोली विधानसभा क्षेत्रातील मतदारयाद्यांमध्ये दुबार नावे, फोटो नसलेली आणि नमूद पत्यावर राहत नसलेल्या मतदारांची नावे होती. सदर नावे काही ठराविक राजकीय लोकांनी नाेंदविली असून, त्याद्वारे निवडणुकीत बोगस मतदान केले जात असल्याचा आरोप नेहमीच होत होता. त्यामुळे मतदारयाद्यांमधील दुबार नावे, फोटो नसलेली आणि नमूद पत्यावर राहत नसलेल्या मतदारांची नावे वगळण्याची मागणी जोर धरु लागली होती. त्यानुसार आता ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघातील ५७ हजार १५ अपात्र मतदारांची नावे वगळण्यात आल्याने या मतांवर नवी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये आपले पारडे जड करणाऱ्या उमेदवारांच्या मनात मतदार याद्या प्रसिध्द होताच धडकी भरणार, इतके नक्की!. 

Read Previous

 ‘कोरोना रुग्णांचे हाल’