महिलांना ‘शक्ती’ 

पुरोगामी समजल्या महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने मंजुर केलेले ‘शक्ती विधेयक’ म्हणजे सामाजिक बांधिलकी आणि महिलांचे मानसिक आरोग्य जपत महिलांना जलदगतीने न्याय देणारे, महिलांना निर्भयपणे जगण्यास बळ देणारे ‘विधेयक’ अर्थात कायदा आहे, यात वाद नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेच्या चौकटीत राहूनच कायदे करणे, कायद्याबाबत दृष्टी डोळस करणे गरजेचे आहे. पीडित महिला आणि बालकांसाठी समाजाने प्रेमाचा आणि संरक्षणाचा हात पुढे करणे, पीडित महिला आणि बालकांना मानसिक आधार देणे काळाची गरज आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांमुळे मुली-महिलांना न्याय मिळत आहे. मात्र, त्यासाठी दीर्घ काळ प्रतिक्षा करावी लागल्यास महिलांच्या मानसिकतेवर, आरोग्यावरही परिणाम होतो. महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या इतर कायद्यांना मजबूत करण्यासाठी ‘शक्ती विधेयक’ आहे. शक्ती विधेयकामुळे महिलांना न्याय मिळण्यास आणि दोषींना शिक्षा होण्यासाठी कमी वेळ लागणार आहे. ॲसीड हल्ल्यासारख्या प्रकरणांमध्ये महिलांच्या उपचारावर होणारा खर्च दोषीस देणे शक्ती विधेयकामुळे सक्तीचे असणार आहे. शक्ती विधेयकामुळे पोलिसांच्या कार्यपध्दतीतही बदल करण्यात येणार आहे. खोटी तक्रार करणाऱ्या महिला अथवा त्यांचे नातेवाईकही शिक्षेस पात्र ठरणार आहेत. पीडित महिलेची इन कॅमेरा चौकशी करणे सक्तीचे होणार आहे. पीडित महिलांना सुरक्षा, न्याय आणि मनोबल वाढविण्यासंदर्भात विविध तरतुदी शक्ती विधेयकामध्ये करण्यात आल्या आहेत. सध्याच्या युगात ऑनलाईन पध्दतीने सर्व माहिती उपलब्ध असून, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कायद्याबाबत अधिक ज्ञान घण्याची आवश्यकता आहे. ११२ व्रÀमांकाची महिलांसाठी आणि १०९८ व्रÀमांकाची बालकांसाठी हेल्पलाईन उपलब्ध आहे. शक्ती विधेयक मध्ये प्रत्येक महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये पोलीस प्रतिनिधी असण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. शक्ती विधेयकामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनी, पोलीस प्रतिनिधींचा व्हॉट्‌स ॲप ग्रुप तयार करुन विद्यार्थी-विद्यार्थिनींना वैयक्तिकरित्याही पोलिसांशी संपर्क साधता येणार आहे. महाविद्यालयात ‘सेफ कॅम्पस’ अभियानही उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या मदतीने राबविण्यात येणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्क्रिंगिण विकासासाठी शासन कार्यरत आहे. मात्र, समाजाच्या सर्क्रिंगिण विकासामध्ये सामाजिक सुरक्षितताही महत्वाची असून, त्यासाठी शासनासोबत नागरिकांनीही सहभागी होणे गरजेचे आहे. एकूणच ‘शक्ती विधेयक’मुळे मुली, महिलांना निर्भयपणे जगण्यास बळ मिळणार आहे. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

 मतदारांच्या नावांवर ‘फुली’