‘र्निबंधमुक्ती’ची गुढी

मार्च-२०२० मध्ये महाराष्ट्र राज्यात आलेल्या कोविड-१९ अर्थात ‘कोरोना’मुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमध्ये सारेच व्यवहार ठप्प झाल्यानंतर जनजीवन कोलमडले होते. कोरोना काळात  ‘आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायदा’ या कायद्यान्वये ‘कोरोना’चा वाढता संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांवर अनेक र्निबंध लादण्यात आले होते. या र्निबंधांमध्ये नागरिकांना ताेंडावर मास्क लावणे, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, हात सॅनिटाईझ करणे आदी बंधने घालण्यात आली होती. ‘कोविड’चा संसर्ग रोखण्यासाठी लागू र्निबंधांमुळे नागरिकांना सण, उत्सव साजरे करता येत नव्हते. परिणामी गेल्या दोन वर्षात नागरिकांना मोकळेपणाने सण, उत्सव साजरे करता आले नाहीत. परंतु, आता दोन वर्षानंतर ‘कोरोना’चे सावट दूर होताना दिसत आहे. त्यामुळे ‘एक नवीन सुरुवात करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात राज्यात लावण्यात आलेले र्निबंध ‘गुढीपाडवा’ पासून (२ एप्रिल २०२२) पूर्णपणे रद्द करण्यात येत आहेत’, असे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ३१ मार्च रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित केल्याने गेली दोन वषे ताेंडाला मास्क लावून फिरणाऱ्या नागरिकांना आता विना ‘मास्क’ मोकळा श्वास घता येणार आहे. गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. गुढीपाडवा म्हणजे जुने ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करण्याचा दिवस. याच गुढीपाडवा दिवसापासून राज्य सरकारने साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये लागू असलेले सर्व र्निबंध रद्दबातल केल्याने नागरिकांना मोठाच दिलासा मिळाला आहे. ‘कोरोना’बाबतचे सर्व र्निबंध राज्य सरकारने पूर्णपणे उठवल्याने राज्यातील विविध जाती-धर्म आणि पंथाच्या नागरिकांना तब्बल ७३८ दिवसानंतर त्यांचे सण, उत्सव तसेच समारंभ र्निबंधमुक्त वातावरणात साजरे करता येणार आहेत. ‘मास्क’मुक्तीचा निर्णय घणारे महाराष्ट्र राज्य देशातील पहिलेच राज्य ठरले असून, राज्य सरकारच्या निर्णयामुळे नागरिकांना आता गुढीपाडवा, रमजान ईद आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती धुमधडाक्यात साजरी करण्यासही परवानगी मिळाली आहे. ‘कोरोना’बाबतचे सर्व र्निबंध रद्द करण्यात आल्याने बस, लोकल आणि रेल्वे मधून प्रवास करण्यासाठी आता कोविड प्रतिबंधक लस घतल्याचे प्रमाणपत्र दाखविण्याची गरज भासणार नाही. मात्र, ‘कोरोना’ प्रतिबंधक सर्व र्निबंध रद्द करण्यात आले असले तरी ‘कोरोना’चा भविष्यात धोका उद्‌भवू नये यासाठी नागरिकांनी ताेंडावर मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, कोरोना प्रतिबंधक लस घणे, आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घणे आवश्यक आहे, असे आवाहन देखील राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनाचा विसर पडून चालणार नाही. एकूणच राज्य सरकारच्या निर्णयामुळे आज नागरिकांना ‘र्निबंधमुक्ती’ची गुढी उभारता येणार आहे. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून ‘कोरोना’च्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला करणाऱ्या नागरिकांनी यापुढे ‘कोरोना’ला विसरुन देखील चालणार नाही. ‘कोरोना’ अद्याप संपलेला नाही, याची जाणीव आज गुढीपाडवा निमित्त गुढी उभारणाऱ्या प्रत्येक नागरिकाने ठेवण्याची गरज आहे. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

 महिलांना ‘शक्ती’